ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण षष्ठीविश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.००
मेष (Aries):
आजचा दिवस धकाधकीचा असेल. कामात प्रगती दिसेल पण थोडा ताणही जाणवेल. पैशाचे नियोजन नीट करा. प्रवास करताना काळजी घ्या. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. वैवाहिक जीवनात काही गैरसमज दूर होतील. आरोग्य थोडं नाजूक राहू शकतं.उपाय: हनुमानचालीसा पठण करा.
वृषभ (Taurus):
नवीन संधी येतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. व्यवसायिकांसाठी दिवस लाभदायक. आरोग्य उत्तम राहील. पण अति आत्मविश्वास टाळा.उपाय: देवीला गुलाब अर्पण करा.
मिथुन (Gemini):
महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. मन अस्थिर राहील. काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. नोकरीत अडचणी येतील पण प्रयत्नांमुळे मार्ग सापडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल.उपाय: विष्णु भगवानाला तुळशीपत्र अर्पण करा.
कर्क (Cancer):
घरात शुभकार्याची चर्चा होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कामात यश मिळेल. प्रेमप्रकरणात गोडवा वाढेल. स्त्रियांसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील. संध्याकाळी आनंददायक घडामोडी होतील.उपाय: दुर्गासप्तशतीचा एक अध्याय वाचा.
सिंह (Leo):
कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक लाभ होतील. मित्रांबरोबर वेळ आनंदात जाईल. प्रेमसंबंधात काही तणाव येऊ शकतो. आरोग्याबाबत काळजी घ्या, विशेषतः डोळे आणि पोट.उपाय: सूर्याला जल अर्पण करा.
कन्या (Virgo):
व्यवसायात सुधारणा होईल. नवीन संपर्क जुळतील. कामात नियोजनबद्धता ठेवा. कुटुंबात शांती राहील. आरोग्याबाबत कोणताही त्रास जाणवणार नाही. विद्यार्थ्यांना यशाचे संकेत.उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा.
तुला (Libra):
खूप दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत. नोकरीत प्रगती. मित्रांकडून मदत मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रवासाची शक्यता आहे.उपाय: महालक्ष्मीची आरती म्हणा.
वृश्चिक (Scorpio):
आज भावनांवर नियंत्रण ठेवा. नातेसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. कामात अडथळे येतील पण संयम ठेवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. रात्री चांगली बातमी मिळू शकते.उपाय: शिवलिंगावर दूध अर्पण करा.
धनु (Sagittarius):
भाग्यप्राप्तीचा दिवस. नव्या योजना यशस्वी होतील. दूरवरून शुभवार्ता येईल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रवास फायद्याचा ठरेल. आरोग्य उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल.उपाय: विष्णु नामस्मरण करा.
मकर (Capricorn):
कामाचा ताण वाढेल. जबाबदाऱ्या वाढतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांकडून मदत मिळेल. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव राहू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या.उपाय: शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करा.
कुंभ (Aquarius):
आज मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात ऐक्य वाढेल. नवीन मित्र जोडले जातील. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस.उपाय: शनि मंत्राचा जप करा.
मीन (Pisces):
मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता. आर्थिक दृष्ट्या दिवस लाभदायक. प्रिय व्यक्तीशी भेट होईल. घरात शुभवार्ता मिळेल. प्रवासातून फायदा. आरोग्य आणि मानसिक शांतता दोन्ही टिकतील.उपाय: विष्णु सहस्रनाम पठण करा.
(Marathi Rashi Bhavishya कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य सोमवार, १३ ऑक्टोबर २०… […]