
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
मार्गशीर्ष शुक्ल पंचमी. आज चांगला दिवस आहे.
आज नागपूजन. शके १९४७, संवत २०८१.
उत्तरा आषाढा
नक्षत्र – चंद्र मकर राशीत रवी लाभ योग
चंद्र – हर्षल (युरेनस) त्रिकोण योग
आजचा दिवस स्थिरता, प्रगती, अनपेक्षित लाभ आणि आत्मविश्वास देणारा आहे. चंद्र–हर्षल त्रिकोणामुळे अचानक शुभ घटना, नव्या संधी, नवीन कामांची सुरुवात आणि मानसिक शांतता मिळेल. रवी-लाभ योग आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रात फायदे आणतो.(Marathi Rashi Bhavishya)
मेष-आजचा दिवस धाडस आणि नवनिर्मितीचा आहे. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये वाढीची शक्यता. आर्थिक लाभ होईल. प्रवास योग शुभ.
वृषभ-कामातील ताण कमी होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. गुंतवणुकीत फायदा होईल. कुटुंबात आनंदाची घटना घडू शकते. नात्यांमध्ये मधुरता.
मिथुन-नवीन कल्पना साकार करण्यासाठी उत्तम वेळ. अचानक एखादे आर्थिक लाभ संभव. मित्रांकडून मदत मिळेल. बदलांचे स्वागत करा.
कर्क-घरगुती कामे सुरळीत होतील. धैर्य व आत्मविश्वास वाढेल. नोकरीत प्रमोशनची चर्चा होऊ शकते. सहकाऱ्यांशी संवाद सुधारेल.
सिंह-रवी-लाभ योगामुळे कामात चमक आहे. अनपेक्षित आर्थिक फायदा मिळू शकतो. व्यावसायिक भागीदारीत लाभ. आरोग्य चांगले राहील.
कन्या-नियमित कामात प्रगती. परदेशातून संधी मिळण्याची शक्यता. मैत्री व नातेसंबंधांमध्ये नवे अनुभव. अभ्यासात मोठी एकाग्रता प्राप्त होईल.
तुळ-चंद्र-हर्षल त्रिकोणामुळे अचानक नवीन काम मिळू शकते. व्यावसायिक लोकांसाठी उत्तम दिवस. आर्थिक निर्णय ठामपणे घेता येतील. वाहन योग शुभ.
वृश्चिक-स्वभावातील सकारात्मकता वाढेल. घर-परिवारात आनंद. ठप्प असलेले काम अचानक सुरू होईल. मनात नवीन योजना येतील.
धनु-नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील पण फायदा होईल. आर्थिक तरलता सुधरेल. एखाद्या मित्राकडून चांगली मदत. मानसिक समाधान.
मकर-चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास, नेतृत्व, प्रगती आणि भाग्याची साथ. नवे प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता. आरोग्य उत्तम.
कुंभ-अचानक फायदा, आर्थिक वाढ व नवे संपर्क तयार होतील. नोकरी-बिझनेस दोन्हीकडे लाभ. परदेशातून संधी. धाडसी निर्णय सफल.
मीन-आजचा दिवस शांत पण फलदायी. आर्थिक बाबतीत फायदा. गृहसजावटी किंवा मालमत्तेचे काम होईल. आवडते काम यशस्वी होईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



