
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
आश्लेषा नक्षत्र, कर्क राशीत चंद्ररवी त्रिकोण चंद्र, चंद्र त्रिकोण मंगळ
शके १९४७, संवत २०८२, विश्वावसु नाम संवत्सर
मार्गशीर्ष कृष्ण पंचमी/षष्ठी
आजचा दिवस चंद्र कर्क राशीत असून आश्लेषा नक्षत्राचे सूक्ष्म, ग्रहणशील आणि मानसिक परिणाम देणारा आहे. रवी–चंद्र त्रिकोण व चंद्र–मंगळ त्रिकोणामुळे आत्मविश्वास, ऊर्जा आणि कार्यगती उत्तम असेल.(Marathi Rashi Bhavishya
मेष –घरगुती कामे आणि भावनात्मक विषयांवर अधिक वेळ जाईल. चंद्र–मंगळ त्रिकोणामुळे प्रॉपर्टी, वाहन किंवा बांधकामाशी संबंधित कामात गती मिळेल. आईशी संबंधित कार्ये शुभ.
वृषभ –आज प्रवास, संवाद आणि व्यवहार यासाठी चांगला दिवस. लेखन, बोलणे, कागदोपत्री कामे सुरळीत होतील. नातेवाईकांशी सुसंवाद वाढेल.
मिथुन –आर्थिक निर्णयांसाठी अनुकूल वेळ. अचानक मिळकत वाढण्याचे योग. रवी–चंद्र त्रिकोणामुळे प्रतिष्ठा वाढेल. घरात सुखवृद्धी.
कर्क –चंद्र आपल्या राशीत. संवेदनशीलता वाढलेली. तरीही मंगळाचा त्रिकोण ऊर्जा देईल. नवी योजना सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस. आत्मविश्वास वाढेल.
सिंह –आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक. विश्रांती कमी पडू शकते. अध्यात्मिक कार्य, ध्यान, उपासना यासाठी उत्तम काळ. गुप्त योजना पुढे नेताना यश.
कन्या –मित्रपरिवार मदतीला येईल. नेटवर्किंग, ग्रुप वर्क, टीम प्रोजेक्टमध्ये उत्तम यश. आर्थिक लाभाचे संकेत. इच्छापूर्तीचे योग.
तुळ –करिअर क्षेत्रात नवी संधी. अधिकारी वर्गाकडून कौतुक. आत्मविश्वासाचा प्रभाव निर्णयांवर पडेल. कामातील अडथळे दूर होतील.
वृश्चिक –दीर्घकालीन योजना, अध्ययन, परीक्षा, परदेश व्यवहारासाठी उत्तम दिवस. चंद्र-रवी समन्वयामुळे सुदैव लाभेल.
धनु –आर्थिक व्यवहारात सावधगिरी. परंतु भागीदारीतून लाभाचे योग. मानसिक उलथापालथ कमी करण्यासाठी ध्यानयोग उपयुक्त. गुप्त लाभ संभव.
मकर –जोडीदाराकडून सहकार्य. पार्टनरशिपमधील अडथळे दूर. न्यायालयीन किंवा तडजोडीच्या विषयात समाधानकारक निकाल मिळू शकतो.
कुंभ –दैनंदिन कामात जोम. आरोग्य सुधारेल. कार्यक्षेत्रात कामाची उत्पादकता वाढलेली असेल. व्यस्ततेतूनही समाधान.
मीन –मनोरंजन, प्रेमसंबंध आणि सर्जनशील कामांसाठी सुंदर दिवस. सन्तती संबंधित शुभ घटना. चंद्र–मंगळ त्रिकोणाने उत्साह वाढेल.
आजचा एकूण दिवस
रवी–चंद्र त्रिकोण मानसिक शांतता व निर्णयक्षमता वाढवतो, तर चंद्र–मंगळ त्रिकोण धैर्य व कृतीयोग मजबूत करतो. म्हणून आजची पंचमी/षष्ठी यशदायी, सक्रिय आणि प्रगतीकारक दिवस ठरेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव‘ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)





[…] […]