ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
🪔 शयनी एकादशी, पंढरपूर यात्रा विशेष – चातुर्मास सुरू
📅 आषाढ शुक्ल एकादशी | चंद्र नक्षत्र: विशाखा
🕓 राहुकाळ: दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
📛 आजचा दिवस “विशाखा वर्ज्य” असल्याने महत्त्वाचे निर्णय थांबवा.
🪔आज जन्मलेल्या बाळाची राशी -तुळ/ (दुपारी ४.०१ नंतर) वृश्चिक. (विष्टी करण शांती)
Marathi Rashi Bhavishya Today
♈ मेष (Aries) – (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
भविष्य: अष्टम चंद्र आणि हर्षल योगामुळे धाडसी निर्णय टाळावेत.
टिप: आज मनोरंजनासाठी वेळ द्या पण व्यसने टाळा.
सावधगिरी: नोकरीत किंवा व्यावसायिक करारांमध्ये शांत राहा.
♉ वृषभ (Taurus) – (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
भविष्य: आर्थिक लाभाचे संकेत, कुटुंबात आनंद.
टिप: नवीन व्यवसायाच्या संधींकडे सकारात्मक नजर ठेवा.
विशेष: जोडीदारास वेळ दिल्यास नात्यांतील गोडवा वाढेल.
♊ मिथुन (Gemini) – (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
भविष्य: दिवस सुखद, नवीन संधी मिळतील.
टिप: आज घरात किंवा मित्रांसोबत वेळ घालवा.
लाभ: महिलांकडून सहकार्य मिळेल, व्यापार वृद्धिंगत होईल.
♋ कर्क (Cancer) – (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
भविष्य: मानसिक शांती मिळेल. वाद मिटतील.
टिप: आज बौद्धिक क्षेत्रात नाव मिळवता येईल.
विशेष: शेतीतून फायदा किंवा गृहसजावटीची संधी.
♌ सिंह (Leo) – (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भविष्य: दिवसाची सुरुवात फायदेशीर.
टिप: अनपेक्षित घडामोडींवर नियंत्रण ठेवावे लागेल.
सावधगिरी: नोकरीच्या ठिकाणी कटकटी संभवतात.
♍ कन्या (Virgo) – (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
भविष्य: मनासारखा दिवस, धार्मिक प्रवास शक्य.
टिप: मौल्यवान वस्तूंची खरेदी करताना तपासणी करा.
सल्ला: वाहन खरेदीचा विचार पक्का होईल.
♎ तुळ (Libra) – (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भविष्य: आत्मविश्वास व कुटुंब सुख उत्तम.
टिप: अनावश्यक शत्रुत्वापासून सावध राहा.
लाभ: स्वप्नपूर्तीची दिशा दिसेल.
♏ वृश्चिक (Scorpio) – (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
भविष्य: संमिश्र दिवस, विवेक वापरा.
टिप: आज संध्याकाळी शुभ वार्ता मिळू शकते.
सावधगिरी: चोरीपासून खबरदारी घ्या.
♐ धनु (Sagittarius) – (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भविष्य: उत्तम दिवस, स्वप्ने साकार करण्याचा योग.
टिप: सायंकाळी खर्चावर नियंत्रण ठेवा.
सल्ला: मालमत्तेच्या व्यवहारात विलंब अपेक्षित.
♑ मकर (Capricorn) – (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
भविष्य: आर्थिक संधी मिळतील.
टिप: लहान प्रवासातून मोठा लाभ होईल.
लाभ: घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
♒ कुंभ (Aquarius) – (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
भविष्य: प्रिय व्यक्ती भेटेल. ऐश्वर्य लाभेल.
टिप: कुटुंबासोबत सहल किंवा छोटा प्रवास घडेल.
सल्ला: मनात असलेले कार्य पूर्ण होईल.
♓ मीन (Pisces) – (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
भविष्य: संमिश्र दिवस. साडेसातीचा प्रभाव जाणवेल.
टिप: मोठे निर्णय टाळा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या.
सावधगिरी: अनावश्यक जोखीम टाळा.
६ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला भेटून लोकांना आनंद होतो. तुमचा सहवास नेहमीच उत्साह वर्धक असतो. तुम्हाला गायन, नृत्य किंवा इतर कलांची तसेच गूढ विद्यांची आवड असते. आईबद्दल विशेष प्रेम असते तर आई कडील नातेवाईकांशी तुमचे विशेष पटते. तुम्हाला सामाजिक रूढी आणि परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमची ही तारीख सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आकर्षण, आपुलकी दर्शवते. स्वभाव खर्चिक असतो. तुम्ही भावनाप्रधान आहात. तुम्हाला वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने पैसे मिळतो. तुम्ही खर्चिक छंद जोपासतात. श्रीमंती आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्ही व्यवस्थित घालतात. अचानक धनलाभ होणायची शक्यता असते. ज्याचे आकर्षण वाटते त्यावर पैसे खर्च करण्यास तुम्ही मागे पुढे बघत नाहीत.
व्यवसाय:- जमीन खरेदी विक्री, एजंट, शेअर ब्रोकर, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजर, मिठाई, संगीत.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
📿 विशेष माहिती व सेवा:
कुंडली परीक्षण, शुभ रत्न, भाग्योदय आणि नवदंपत्य यशस्वीतेसाठी मार्गदर्शन हवे आहे का?
संपर्क करा:
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
