आजचे राशीभविष्य –शनिवार, १२ जुलै २०२५
१२ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
🌙 आषाढ कृष्ण द्वितीया | नक्षत्र – उत्तरा षाढा
राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०
“आज उत्तम दिवस आहे!”
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर.
(Marathi Rashi Bhavishya Today)
🔥 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
भाग्यलक्ष्मीचा आशीर्वाद आहे. व्यवसायात बदल संभवतो. अचानक एखाद्या बातमीमुळे उत्साह वाढेल. मौल्यवान खरेदी संभवते.
✅ टिप: आजची गुंतवणूक भविष्य सुरक्षित करेल.
💎 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
नात्यांमधून लाभ होईल. मन प्रसन्न राहील. भौतिक सुखसुविधा वाढतील. कलाकारांना विशेष यश.
✅ टिप: कौटुंबिक वेळ गुंतवणूक ठरेल.
✨ मिथुन (का, की, कु, घ, ग, छ, के, को, ह)
संमिश्र दिवस. खर्च वाढू शकतो. आर्थिक आवक चांगली. स्त्रियांचे सहकार्य लाभेल.
✅ टिप: बोलताना संयम ठेवा, गैरसमज टाळा.
🌊 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कामात यश, पैशाचा लाभ. गूढ विषयांमध्ये रस वाढेल. बुद्धिचातुर्य फळाला येईल.
✅ टिप: ध्यानधारणा आज लाभदायक ठरेल.
🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
धनलाभ, व्यापारात वाढ. मोबाईल किंवा संगणक खरेदीचा योग.
✅ टिप: गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा.
🌿 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
शुभ काळ सुरू आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य. वस्त्र किंवा सौंदर्यसामग्रीची खरेदी संभवते.
✅ टिप: कामाच्या संधींना होकार द्या.
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
नोकरी आणि घरगुती जबाबदाऱ्या यांच्यात समतोल राखावा लागेल. जमीन व्यवहारातून यश.
✅ टिप: निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
धनप्राप्ती, सौख्य, प्रिय व्यक्तीची भेट. प्रवासाचे योग. विवाहाची शक्यता.
✅ टिप: मनातल्या भावना व्यक्त करा.
🏹 धनु (ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे)
अचानक लाभ. आरोग्य सुधारेल. अडचणी दूर होतील.
✅ टिप: खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
🏔 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
आत्मविश्वास वाढेल. प्रेमात यश. वादात विजय. चांगली बातमी मिळेल.
✅ टिप: नवे कार्य सुरू करण्यासाठी उत्तम वेळ.
🌬 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
व्यवसायात फायदा. घरगुती कामांवर लक्ष केंद्रित. अपेक्षित मोबदला मिळेल.
✅ टिप: जोखीम घेण्याआधी विचार करा.
🌊 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
नात्यांमधून आनंद. कलाकारांसाठी शुभ दिवस. आर्थिक अंदाज अचूक ठेवावेत.
✅ टिप: व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्या.
१२ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला जीवनात अधिकार व मान मिळतो. पैसा कसा मिळवावा याचे तुम्हाला कला अवगत असते. आयुष्यात तुम्हाला सतत बदल आवडतो. तुम्ही शंकेखोर असतात. मनाने तुम्ही मोकळे असतात आणि तुमच्या कृतीमध्ये एक मुक्तपणा असतो. बालपणापासून तुम्ही आनंदी आणि उत्साही आहात मात्र तुमच्या भावनांना तुम्ही आवर घातला पाहिजे. तुमच्या वागणुकीतून इतरांना स्फूर्ती मिळते. आपल्या स्वतःच्या घराबद्दल आणि देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास आणि इतर देशांचा अभ्यास करून तुम्ही स्वतःचे ज्ञान वाढवतात. जीवनाकडे तुम्ही एका उच्च पातळीवरून बघतात. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो. संशोधन करण्यात तुम्हाला अधिक रस असतो. एकाच वेळी तुम्ही दोलायमान मनस्थितीमध्ये असतात. खंबीरपणा आणि भित्रेपणा अनुभवतात. तुमच्या विचारात आणि वागण्यात स्वतंत्र पण आहे. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना स्वतंत्र असतात. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुम्ही कायदा प्रेमी आहात. बालपणापासूनच खेळ आणि इतर कलांमध्ये तुम्ही सहभागी होतात. तुमचा जनसंपर्क मोठा असतो. अनेक लोकांचे तुम्ही कल्याण करतात. दुसऱ्याने केलेले टीका तुम्ही फार मनाला लावून घेतात.
व्यवसाय:- आयात – निर्यात, दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, वैद्यकीय क्षेत्र, सरकारी अधिकारी, शिक्षण क्षेत्र, जाहिरात, अभिनय.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा, अंजीरी.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट, लसुन्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
🪔 विशेष टीप:
तुमच्या जन्मतारीखीनुसार सविस्तर कुंडली, भाग्योदय, आरोग्यदृष्टी, पती/पत्नी स्वभाव, शुभ रत्न, यशाचे स्रोत यासाठी संपर्क साधा.
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521
🌐 राशीभविष्य पाहण्यासाठी फेसबुकवर “राशीभाव” पेजला जरूर भेट द्या.
