आजचे राशिभविष्य – मंगळवार,१५ जुलै २०२५
१५ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
🧘♂️ ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक, (Marathi Rashi Bhavishya Today)
🔷 आषाढ कृष्ण पंचमी/षष्ठी
🔷 शके १९४७ | संवत २०८१
🔷 नक्षत्र – शततारका / पूर्वा भाद्रपदा
🔷 राहुकाळ – दुपारी ३.०० ते ४.३०
🔷 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ
🔷 “आज चांगला दिवस आहे”
(Marathi Rashi Bhavishya Today)
🔥 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
लेखन, पत्रकारिता व प्रकाशन व्यवसायात प्रगती. चंद्र-रवी त्रिकोण योग. आर्थिक प्राप्ती होईल. शेअर बाजारात मात्र नुकसान संभवते. संयम ठेवा.
🌱 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
विदेशी शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस. शांत स्वभावातून समाजसेवा कराल. सामाजिक कामातून थोडासा त्रास होऊ शकतो.
🌬️ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
नोकरीत स्थिरता. नेतृत्वाचे कौशल्य उजळून निघेल. भावंडांशी वाद टाळा. प्रवास योग संभवतो.
🌊 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
चंद्र अष्टम स्थानी, रवी व्ययस्थानी – आज काळजी घ्या. कर्जाची जबाबदारी वाढेल. सरकारी कामात विलंब. घसा व आरोग्याची काळजी घ्या.
🔥 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
सप्तम चंद्र. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. रवीचा अनुकूल योग लाभदायक. आक्रमकतेवर संयम ठेवा.
🌾 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
सकारात्मक सुरुवात. आर्थिक प्रगती. वरिष्ठांची स्तुती मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
पंचम चंद्र, मंगळाचा अनुकूल योग. घरगुती कामात वेळ द्या. वृद्धांचा आधार मिळेल. यशप्राप्तीसाठी योग्य वेळ.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
सरकारी लाभ संभवतो. इतर मार्गानेही आर्थिक लाभ. कामाचा ताण वाढेल. संयम आवश्यक.
🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
उत्तम आर्थिक दिवस. कौटुंबिक सुख. शेअर्समधून लाभ. व्यवसाय व सरकारी कामात प्रगती.
🐊 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कोर्ट-कचेर्यात यश. भागीदारीत लाभ. वाहन जपून चालवा. शत्रूंवर विजय संभवतो.
🌪️ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
चंद्र राशीत. उत्साहवर्धक दिवस. अभ्यास, संशोधनात प्रगती. विश्वासू व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात.
🌊 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
चंद्र व्ययस्थानी, परंतु समाजात नाव मिळेल. वेळेचे व्यवस्थापन आवश्यक. विनाकारण शत्रुत्व टाळा.
१५ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला शांत असले तरी कधीही तडजोड करत नाहीत. तुम्ही अति महत्वाच्या पदांवर यशस्वी होतात. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असतो. तुम्ही अनाठायी काळजी करतात.घर, संसार मित्र यांचा बद्दल आपुलकीची नाती जोडली जातात. भाषणे, लेखन, रेडिओ कार्यक्रम यात तुम्ही रस घेतात. बढाईखोर पणा टाळला पाहिजे.
तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुमचा सहवास नेहमीच उत्साह वर्धक असतो. तुम्हाला गायन, नृत्य किंवा इतर कलांची तसेच गूढ विद्यांची आवड असते. आईबद्दल विशेष प्रेम असते तर आई कडील नातेवाईकांशी तुमचे विशेष पटते. तुम्हाला सामाजिक रूढी आणि परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमची ही तारीख सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आकर्षण, आपुलकी दर्शवते. स्वभाव खर्चिक असतो. तुम्ही भावनाप्रधान आहात. तुम्हाला वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने पैसे मिळतो. तुम्ही खर्चिक छंद जोपासतात. श्रीमंती आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्ही व्यवस्थित घालतात. अचानक धनलाभ होणायची शक्यता असते. ज्याचे आकर्षण वाटते त्यावर पैसे खर्च करण्यास तुम्ही मागे पुढे बघत नाहीत.
व्यवसाय:- जमीन खरेदी विक्री, एजंट, शेअर ब्रोकर, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजर, मिठाई, संगीत.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
💬 अधिक माहिती व वैयक्तिक कुंडली विश्लेषणासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521
