

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
माघ पौर्णिमा.,माघ स्नान समाप्ती.,शिशिर ऋतू. उत्तरायण.,विश्वावसुनाम संवत्सर.,शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आजचा दिवस“आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे”(माघ पौर्णिमा, माघ स्नान समाप्ती)
चंद्रनक्षत्र – पुष्य
चंद्रराशी – कर्क
करण – विष्टी
ग्रहयोग –
रवी प्रतियुती चंद्र,
चंद्र प्रतियुती मंगल (Marathi Rashi Bhavishya)
मेष-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) आज संयम ठेवण्याची गरज आहे. अनावश्यक वाद टाळावेत. संध्याकाळनंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामात स्थैर्य येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. घरातील वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल. संध्याकाळनंतर मन प्रसन्न राहील.
मिथुन- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) कामात अडथळे येऊ शकतात, पण संयम ठेवल्यास मार्ग सापडेल. संवादात स्पष्टता ठेवा. नवीन निर्णय संध्याकाळनंतर घ्यावेत.
कर्क- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) चंद्र राशीत असल्याने भावनिकता वाढेल. घरगुती विषयांना प्राधान्य द्याल. संध्याकाळनंतर आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. आर्थिक व्यवहार जपून करा. संध्याकाळनंतर सकारात्मक बदल जाणवतील.
कन्या- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. नियोजन महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराशी सुसंवाद साधाल. संध्याकाळनंतर शुभ घटना घडू शकते.
तुळ – (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) सामाजिक संपर्क वाढतील. आर्थिक नियोजन करावे लागेल. आवडत्या कामात मन रमेल. संध्याकाळनंतर लाभाचे योग आहेत.
वृश्चिक – (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) मनात चिडचिड जाणवू शकते. बोलण्यात संयम ठेवा. गुप्त शत्रूंपासून सावध रहा. संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल.
धनु- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) धार्मिक व आध्यात्मिक विचार वाढतील. घरातील प्रश्नांवर तोडगा निघेल. मोठे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) व्यवसायात संमिश्र फल मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सूर्य उपासना लाभदायक ठरेल. संध्याकाळनंतर शुभ वार्ता मिळू शकते.
कुंभ – (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) साडेसातीचा प्रभाव जाणवेल. मानसिक तणाव संभवतो. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. संयम व श्रद्धा ठेवा.
मीन – (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) आजचा दिवस मध्यम आहे. नवीन संधी संध्याकाळनंतर मिळू शकतात. दीर्घकालीन योजना आखण्यास योग्य वेळ आहे.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


