आजचे राशिभविष्य – शुक्रवार, ११ जुलै २०२५

११ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
आषाढ कृष्ण प्रतिपदा | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर
🕒 राहुकाळ : सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🌑 चंद्रनक्षत्र : पूर्वा आषाढा
📛 आज वैधरुती योग वर्ज्य आहे
👶 आज जन्मलेली बालके : धनु/मकर राशी (१२.०९ नंतर)

(Marathi Rashi Bhavishya Today)

🔥 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आर्थिक लाभाची संधी. प्रवासातून यश मिळेल. इच्छा पूर्ण होण्याचा योग.
टीप: सकाळी शांत राहा, दुपारनंतर सक्रिय व्हा.

🌿 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
दिवसाची सुरुवात थोडी संमिश्र. दुपारनंतर नवी दिशा सापडेल.
टीप: दानधर्म करा, शुभ फळ मिळेल.

🌬️ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह)
सकाळी महत्वाची कामे उरकून घ्या. नवे अनुभव येतील. सासरकडून साथ मिळेल.
टीप: सकाळी प्रार्थना करा, दिवस भरगच्च जाईल.

🌊 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कौटुंबिक सौख्य. शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती.
टीप: घरातील वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या.

🔥 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
व्यवसायात वृद्धी. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस.
टीप: मौन पाळा – काही रहस्ये उघड होऊ शकतात.

🌾 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
रासायनिक, तांत्रिक क्षेत्रात यश. प्रवास लाभदायक.
टीप: लवकर उठून दिनचर्या सुरू करा.

⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
धावपळ वाढेल, पण परिणाम सकारात्मक. स्पर्धेत यश.
टीप: दिवसाची योजना ठरवून काम करा.

🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
बुद्धिमत्ता कामी येईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
टीप: शांतता ठेवा, संवादात संयम ठेवा.

🎯 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
संपत्ती वृद्धी. जमिनीशी संबंधित लाभ. नोकरदार वर्गासाठी उत्तम दिवस.
टीप: मातीचा स्पर्श करा, सकारात्मक ऊर्जा मिळेल.

🪨 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
दुपारनंतर योग चांगले. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
टीप: अहंकार टाळा – संवाद साधा.

🌪️ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
प्रगतीचा दिवस. बोलण्यात प्रभाव असेल. कौटुंबिक लाभ.
टीप: पांढरे कपडे परिधान करा, यश लाभेल.

🌊 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
नवीन संधी मिळतील. छंद जोपासण्याचा दिवस.
टीप: सामाजिक कार्यात सहभाग घ्या, नाव कमवाल.

११ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यामध्ये एक अद्भुत शक्ती आहे आणि त्याच्यातून विद्युत शक्ती प्रमाणे स्पंदन बाहेर पडत असतात. त्यामुळे इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण वाटते. तुमची कल्पनाशक्ती अफाट असते. तुम्हाला सणासमारंभात मानाचे स्थान मिळते. तुम्ही एक प्रामाणिक मित्र असतात. तुम्हाला तत्त्वज्ञान, शास्त्र आणि गुढविद्या याबद्दल आकर्षण असते. तुम्ही अतिशय संवेदनशील आहात आणि लहान लहान गोष्टींवरून अस्वस्थ होतात. तुम्हाला झटपट निर्णय घेणे आवडते. इतरांना सल्ला देणे, स्फूर्ती देणे तुम्हाला उत्तम प्रकारे जमते. तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही कोणतेही दिव्य करण्यास तयार असतात. जीवनामध्ये तुम्हास जे काय मिळवायचे असते त्याबद्दल तुम्ही मोठ मोठे स्वप्न रंगवत असतात. तुमच्या प्रत्येक कामाबद्दल तुम्ही उत्साही असतात आणि इतरांनी देखील आपले अनुकरण करावे असे तुम्हाला सतत वाटत असते. तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडते. तुमच्यात नेतृत्व गुण आहेत. एकच गोष्ट सतत करणे तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला नाविन्याची आवड आहे. व्यवहारिक जीवन चा दृष्टिकोन काहीसा अपुरा असतो. स्वतःच्या स्वप्नांमध्ये रंगायला तुम्हाला अधिक आवडते. तुमचे जीवन एककल्ली असते. तुमच्या वैचारिक पातळीमध्ये इतरांना तुम्ही स्थान देत नाहीत मात्र तुम्ही उदार असल्यामुळे इतरांना प्रिय असतात. लोकांना नाराज करणे तुम्हाला जमत नाही. इतराने तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही चांगल्या कामात रूपांतर करू शकतात. रम्य विषयांमध्ये, निसर्गामध्ये, समुद्र, आकाश यामध्ये रमणे तुम्हाला आवडते. आकाशाकडे, समुद्राच्या लाटांकडे तासनतास बघत बसण्यात तुमचा वेळ जातो. तुमचा स्वभाव काहीसा भित्रा असतो. तुम्ही मनातून अस्वस्थ असतात आणि सतत बदल करण्याचे वृत्ती असते.

व्यवसाय:- संगीतकार, कथालेखक, नेपथ्य, पेंटिंग्स, नाट्यकृती, कविता, करणे, द्रव पदार्थांचा व्यवसाय, केमिस्ट, प्रयोगशाळा, दंतरोगतज्ञ, सर्जरी.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, क्रीम.
शुभ रत्न:- मोती, हिरा, चंद्रमणी, गोमेद.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

🌐 अधिक माहिती आणि वैयक्तिक राशी विश्लेषणासाठी संपर्क करा:
🔭 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
📘 “राशीभाव” Facebook Page ला Like करा – तुमची खरी रास जाणून घ्या!

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!