ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
🔸 तारीख: आषाढ शुक्ल नवमी/दशमी
🔸 चंद्रनक्षत्र: चित्रा / स्वाती (दुपारी ४.५० नंतर)
🔸 राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🔸 आज जन्मलेल्या बालकाची रास: तुळ
🔸 आजचा दिवस: उत्तम आहे!
🔥 राशीभविष्य (Marathi Rashi Bhavishya Today)
🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
ग्रहमान अनुकूल आहे. नवीन संधी मिळतील. विवाहासाठी चांगली बातमी.
टीप: महत्त्वाचे निर्णय आजच घ्या.
🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
व्यवसायात यश, आर्थिक लाभ, मौल्यवान खरेदी.
टीप: आज गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक पाऊल उचला.
👫 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
धार्मिक भेट, गुंतवणुकीत फायदा, आनंददायक दिवस.
टीप: आज ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार फायद्याचे ठरतील.
🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
सकारात्मक गोष्टी घडतील. स्वप्ने साकार होण्याची शक्यता.
टीप: आज स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल.
🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
सकारात्मक अनुभव. महिलांचे सहकार्य लाभेल.
टीप: कार्यालयीन कामात संयम ठेवा, यश तुमचंच आहे.
🌾 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
वास्तविक लाभ, स्वतःसाठी खर्च, वाहनसुख.
टीप: खरेदी करताना भावनिक निर्णय टाळा.
⚖ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
चंद्रराशीमध्ये असल्याने विशेष दिवस. तीर्थयात्रा, सिद्धी लाभ.
टीप: अंतर्मनातील प्रश्नांना उत्तरं सापडतील.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
कामात प्रगती. प्रेमात यश, विवाहाच्या चर्चा.
टीप: मनासारखा वेळ घालवा, सकारात्मकतेचा फायदा घ्या.
🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
सकारात्मक चंद्र, लाभदायक भागीदारी.
टीप: नवीन भागीदार निवडताना काळजी घ्या.
🐊 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
परदेश योग, नोकरीत प्रगती, अचानक धनलाभ.
टीप: आज एखाद्या लॉटरीमध्ये नशिब आजमवा.
🏺 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
प्रवासाचे योग, धनप्राप्ती, कुलदेवतेची कृपा.
टीप: दानधर्म किंवा सेवा भाव जोपासा.
🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
संमिश्र दिवस. हातून चांगली कामगिरी होईल.
टीप: वेळेचे व्यवस्थापन करा; संधी हातच्याच जातेय.
४ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक चळवळीचा अनुभव घेतात. तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुमच्यामध्ये एक या अंकाचे देखील सर्व गुण असतात मात्र तुम्ही त्या लोकांन इतके धीट नसतात. संधी मिळाल्यास तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकतात. हर्षल आणि चंद्र यांच्या एकत्रित पणामुळे अडचणींवर मात करणे जरा कठीण जाते. तुमचे विचार स्वतंत्र असतात त्यामुळे तुम्ही कधी कधी चमत्कारिक कृती करतात. बऱ्याच वेळा तुम्हाला नातेवाईकांकडून उपद्रव होण्याची शक्यता असते. कोर्ट कचऱ्याशी तुमचा संबंध येतो. वैवाहिक जोडीदाराची निवड करताना तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. शक्यतो तुम्ही भागीदारी व्यवसाय टाळायला पाहिजे. मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग व्हावा असे तुम्हाला मनापासून वाटते. तुम्ही पद्धतशीर वागतात. तुम्हाला अनेक गुप्त शत्रू निर्माण होतात आणि ते तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटत असले तरी तुम्ही जुगारी वृत्ती टाळली पाहिजे. तुम्ही भूतकाळात जास्त रमतात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दलच्या कल्पना भरमसाठ असतात. तुमचा स्वभाव अस्थिर असतो आणि वागण्यामध्ये विरोधाभास जाणवतो.
व्यवसाय:- इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, यंत्रसामग्री, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअरिंग, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, शास्त्रज्ञ, कारखानदार, गूढ विद्या, अध्यात्म, ज्योतिष, हस्तसामुद्रक.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- निळा, राखी, पांढरा, तपकिरी.
शुभ रत्न:- हिरा, पवळे, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
ℹ️ अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी भेट द्या:
“राशीभाव” फेसबुक पेज 👉 facebook.com/rashibhav
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 📞 8087520521
