आजचे राशीभविष्य – सोमवार, ७ जुलै २०२५
७ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
🪔 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
🔆 आषाढ शुक्ल द्वादशी | 🌙 चंद्र नक्षत्र – अनुराधा | 🕉️ शुभ दिन
📿 शुभ काळ – सकाळी ९.०० नंतर
🕯️ राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.००
📿 आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक
Marathi Rashi Bhavishya Today
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
🔸 भाग्य: अष्टम चंद्रामुळे भावनिक अस्थिरता.
🔸 काम: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील.
🔸 लाभ: कारखान्यातील कामातून फायदा.
💡 टीप: पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवा. मनःशांती मिळेल.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
🔸 भाग्य: आर्थिक लाभ होईल पण अपेक्षाभंगाची शक्यता.
🔸 काम: कला, लेखन क्षेत्रात नाव मिळेल.
🔸 मन: अंतर्मुखतेची भावना.
💡 टीप: भावनिक निर्णय टाळा. आज अधिक विचारपूर्वक व्यवहार करा.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
🔸 भाग्य: दिवस अनुकूल. व्यापार व प्रतिष्ठा वाढेल.
🔸 काम: नवे वस्त्र, धनलाभ संभव.
🔸 नोकरी: सुखद आश्चर्य मिळेल.
💡 टीप: मित्रांसोबत संवाद साधा. सुसंवाद लाभदायक ठरेल.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
🔸 भाग्य: गुंतवणुकीतून फायदा.
🔸 काम: बुद्धिमत्ता चमकेल, नाव कमवाल.
🔸 प्रवास: दूरचे प्रवास संभव.
💡 टीप: डोळ्यांची काळजी घ्या. डिजिटल उपकरणांचा अति वापर टाळा.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
🔸 भाग्य: व्यवसायात वाढ.
🔸 धोका: अचानक संकटाचा धोका.
🔸 भावना: राग अनियंत्रित होऊ शकतो.
💡 टीप: आज संयम पाळा. कोणतीही मोठी जोखीम टाळा.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
🔸 भाग्य: मनासारखी कामगिरी.
🔸 खर्च: मौल्यवान वस्त्रखरेदी.
🔸 शत्रू: वाद मिटण्याची शक्यता.
💡 टीप: जुन्या गोष्टी विसरून पुढे जा. सकारात्मक विचार ठेवा.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
🔸 भाग्य: आत्मविश्वासात वाढ.
🔸 भावना: मन अस्वस्थ राहील.
🔸 संबंध: प्रिय व्यक्तीकडून अप्रिय बातमी.
💡 टीप: आज महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मन शांत ठेवा.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
🔸 भाग्य: दिवस अनुकूल. चंद्र राशीत.
🔸 काम: वरिष्टांचे समर्थन मिळेल.
🔸 आध्यात्म: मंत्र, तंत्रसाधना अनुकूल.
💡 टीप: दिव्य वाचन, जप करा. आध्यात्मिक कृती लाभदायक ठरेल.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
🔸 भाग्य: संमिश्र परिणाम.
🔸 प्रवास: लांबचे प्रवास घडतील.
🔸 प्रतिष्ठा: नावलौकिक वाढेल.
💡 टीप: वेळेचे व्यवस्थापन करा. नात्यांत विश्वास ठेवा.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
🔸 भाग्य: शुभ दिवस. आनंद आणि उत्साह.
🔸 काम: हरवलेली वस्तू परत मिळेल.
🔸 वाढ: अधिकार आणि व्यापार दोन्हीमध्ये वृद्धी.
💡 टीप: आत्मविश्वास वाढवा. वरिष्ठांचे आभार मानायला विसरू नका.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
🔸 भाग्य: चंद्र दशमस्थानी. लाभकारक.
🔸 सावधगिरी: अनोळखी लोकांपासून धोका.
🔸 वृद्धी: स्थानाचा फायदा मिळेल.
💡 टीप: वस्तूंची निगा ठेवा. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
🔸 भाग्य: सौख्यदायक दिवस.
🔸 काम: परदेश प्रवासाचे योग.
🔸 भावना: अपेक्षाभंगाची शक्यता.
💡 टीप: मन शांत ठेवा.Meditation किंवा ध्यान करून दिवसाची सुरुवात करा.
७ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असते. इच्छाशक्ती असल्यास तुम्ही जीवनात मोठे यश कमवतात. तुम्ही चाकोरी बाहेरचा विचार करतात. तुम्ही भावनाप्रधान असून कलेची आवड असते. दूरच्या प्रदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते आणि त्यामुळे तुमचा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही पक्षाप्रमाणे स्वैर असतात. भविष्य आणि तत्वज्ञान यात तुम्हाला गती असते. विचार तर्कशुद्ध असतात. सर्व साधारण लोकांमध्ये मिसळणे तुम्हाला फारसे आवडत नाही. जीवनात सतत बदल आवडतो. बऱ्याच वेळ तुम्ही विचार मग्न असतात. पुस्तकात रमणे तुम्हाला प्रिय असते. तुम्ही मनाने मोकळे असतात आणि परंपरा स्वीकारतात. इतरांना तुमच्या पासून स्फूर्ती मिळते.
व्यवसाय:- आयात – निर्यात, दुग्ध, मत्स्य, रसायने, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- हिरवा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
🪔 विशेष सूचना:
“राशीपेक्षाही अधिक अचूक माहिती हवी असेल तर वैयक्तिक कुंडली पाहणे आवश्यक आहे. नाव, जन्मतारीख व वेळ यांच्या आधारे सखोल माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा.”
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

[…] आजचे राशीभविष्य – सोमवार, ७ जुलै २०२५ […]