आजचे राशिभविष्य – गुरुवार, १० जुलै २०२५
१० जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
🌼 विशेष: गुरुपौर्णिमा | व्यासपूजा | आषाढ पूर्णिमा
📿 चंद्र नक्षत्र: पू. षा. | चंद्र राशी: धनु
🕒 राहुकाळ: दुपारी १.३० ते ३.००
🌟 “दुपारी २.०० नंतर शुभ काळ सुरू होईल”
🌕 आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु. (एइन्द्र योग, विष्टी करण यांची शांती करून घेणे)
(Marathi Rashi Bhavishya Today)
🔥 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्र-मंगळ त्रिकोण योग तुम्हाला नवी उर्जा देतो.
✅ टीप: शेअर बाजार, लॉटरीसाठी योग्य दिवस.
💡 गुडलक टिप: पिवळा कपडा वापरा.
🌿 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
अष्टम चंद्र धर्म, अध्यात्मात रस वाढवेल.
✅ टीप: धार्मिक यात्रेसाठी उत्तम वेळ.
💡 गुडलक टिप: गायीला गूळ खाऊ घाला.
🌬 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
आत्मविश्वास कमी वाटू शकतो, पण अनुभव कामी येईल.
✅ टीप: कोर्ट-कचेरी विषय आज हाताळा.
💡 गुडलक टिप: पांढरे फुल देवासमोर वाहा.
💧 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
आर्थिक चिंता दूर होतील, नवे नियोजन कराल.
✅ टीप: तांब्याच्या वस्तूंचा व्यापार फायदेशीर.
💡 गुडलक टिप: झेंडूची फुले घरात ठेवा.
🔥 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
धनलाभाचे योग. पदाचा योग्य उपयोग करा.
✅ टीप: सरकारी लाभाची शक्यता.
💡 गुडलक टिप: सूर्यनमस्कार करा.
🌾 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
शेती, जमिनीचे व्यवहार फायदेशीर.
✅ टीप: खर्चाऐवजी दानधर्म केल्यास लाभ.
💡 गुडलक टिप: हरभऱ्याच्या डाळीचा दान करा.
🌸 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
बुद्धिचातुर्य आणि व्यापार दोन्ही यश देतील.
✅ टीप: नवीन व्यवसायासाठी उत्तम दिवस.
💡 गुडलक टिप: गुलाबजलाचा वापर करा.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
कौटुंबिक सौख्य आणि वारसाहक्क लाभ.
✅ टीप: स्थावर संपत्तीत गुंतवणूक विचारात घ्या.
💡 गुडलक टिप: कुंकवाचा टिळा लावा.
🎯 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
चंद्र राशीत; आनंद, उत्साह आणि भाग्योदयाचा दिवस.
✅ टीप: प्रवास शुभ व यशस्वी.
💡 गुडलक टिप: गव्हाच्या पिठाचा दीप लावा.
🏔 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
गुप्त लाभ मिळेल पण मानसिक खंत राहील.
✅ टीप: आत्मचिंतन करा, रागावर संयम ठेवा.
💡 गुडलक टिप: एखाद्या गरीब जोडप्याला अन्न द्या.
🌊 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
महत्त्वाची कामे पूर्ण होतील. संयम ठेवा.
✅ टीप: अपमान टाळण्यासाठी मौन पाळा.
💡 गुडलक टिप: खड्या दूधाचा नैवेद्य द्या.
🐠 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
वाहन सुख, व्यापारात लाभ, नोकरीत यश.
✅ टीप: नव्या संधींचा लाभ घ्या.
💡 गुडलक टिप: शंख पाण्यात भिजवून तोंडावर शिंपडा.
१० जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- (Marathi Rashi Bhavishya Today)
तुमच्यावर रवी, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आशावादी असतो. तुमच्या मध्ये आत्मविश्वास असतो आणि तुम्हाला मानसन्मान मिळतात. ठरवलेले उद्दिष्ट तुम्ही आयुष्यात पार पाडू शकतात. इतरांना तुमच्याकडून बरीच मदत होते. मात्र त्याचे श्रेय तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला वारसा हक्काने पैसा किंवा कला उपलब्ध होते. आयुष्याच्या ४६ नंतर भाग्योदय होतो. तुम्ही निर्भयपणे वावरतात. जीवनात कष्ट करण्याचे तुमचे तयारी असते. उत्तम कल्पनाशक्ती तुम्हाला लाभलेली आहे. तुमची प्रकृती अस्थिर आहे आणि तुम्हाला लहरी आणि चमत्कारिकपणा यांचा वारंवार अनुभव येतो. तुम्ही आयुष्यात प्रगती करतात आणि यश संपादन करतात. आयुष्यात बरेचसे चमत्कारिक आणि साहस पूर्ण अनुभव येतात. तुमच्यात जबरदस्त राष्ट्रभक्ती असते आणि घर आणि संसार याकडे तुमचा ओढा असतो. तुम्ही शांत वृत्तीचे असून एकलकोंडे आहात मात्र तरीही तुम्हाला लोकप्रियता मिळते. तुम्ही निस्वार्थी आणि प्रामाणिक असून पैसे जमवण्याकडे तुमचा कल असतो. मात्र पैशांमुळे तुम्हाला सुरक्षित वाटते. तुम्ही धार्मिक आहात. स्वतंत्र वृत्तीचे आहात. जीवनात सतत बदल करण्याची तुमची वृत्ती असते. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. तुम्ही उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न असतात. तुमचा दृष्टिकोन डोळस असतो. इतरांना सल्ला देणे तुम्हाला आवडते आणि त्यात यश मिळते. तुम्ही व्यवहार दक्ष आणि ध्येयवादी असतात. तुम्हाला कलेबद्दल आकर्षण आहे. आणि तुम्ही त्यात उत्साहाने भाग घेतात. तुमची इच्छा शक्ती चांगली आहे. कोणताही विषय तुम्ही मित्रांना उत्तमपणे समजावून सांगू शकतात.
व्यवसाय:- तुमचा स्वभाव अस्थिर असल्यामुळे तुम्ही एकाच नोकरीत किंवा व्यवसायात फार काळ टिकत नाहीत. जाहिरात उद्योग, वर्तमानपत्रे, मासिके, चित्रपट उद्योग, नाट्यकला, रंगकाम, अंतर्गत सजावट, नेपथ्य, बँकिंग यात तुम्हाला यश मिळते.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, केशरी.
शुभ रत्न:- माणिक, चंद्रमणी.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 कुंडली परीक्षण, ग्रहशांती व रत्नसल्ला हवे असल्यास संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 📱 8087520521
🪔 “गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! आपल्या गुरूंचे स्मरण करा आणि सद्गुणांची वाटचाल सुरू ठेवा.” 🌼
