आजचे राशिभविष्य बुधवार,९ जुलै २०२५

९ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

🪔 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक  (Marathi Rashi Bhavishya Today)
🗓️ आषाढ शुक्ल चतुर्दशी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्ववसूनाम संवत्सर
🕐 राहुकाळ: दुपारी १२.०० ते १.३०
🌠 नक्षत्र: मूळ
👶 आज जन्मलेल्यांची राशी: धनु
⚠️ नक्षत्र गंडांत | विषपुत्र योग

📌 “आज आनंदी दिवस आहे.”

Marathi Rashi Bhavishya Today

🔥 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे काही महत्त्वाचे निर्णय टाळावेत.
🧘‍♂️ टिप: अध्यात्मात मन रमवा, परदेश योजना विचारपूर्वक घ्या.

🌿 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
सकारात्मक आणि चिंताजनक अशा मिश्र भावनांचा दिवस.
💡 टिप: कर्ज घेताना फेडीचा विचार आधी करा, शांत राहा.

🌬 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह):
आर्थिक लाभ होणार, पण मानसिक तणावही जाणवेल.
💎 टिप: मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा, पाणथळ भाग टाळा.

💧 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
धाडसी निर्णय फायद्याचे ठरतील. आरोग्याची थोडी काळजी घ्या.
🩺 टिप: घरातील ज्येष्ठांसोबत वेळ घालवा, आहारात बदल करा.

🔥 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
शुभ बातम्या आणि भेटीचा दिवस.
🙏 टिप: नदी किंवा प्रवासात सुरक्षिततेची काळजी घ्या.

🌱 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
नवीन खरेदी होईल, पण कामाचे योग्य कौतुक मिळणार नाही.
📦 टिप: बदलीसाठी तयार रहा. संयम ठेवा.

⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
व्यवसाय वाढीसाठी अनुकूल दिवस. आरोग्याकडे लक्ष द्या.
🌸 टिप: श्री महालक्ष्मीची उपासना फायदेशीर ठरेल.

🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
धनवृद्धी पण काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
🔍 टिप: शेअर्समध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.

🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
चंद्राची कृपा. मनःशांती लाभेल.
🌊 टिप: पाण्यातील वनस्पतींपासून सावध राहा. थोडा संयम ठेवा.

🪨 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
विनाकारण खर्च वाढेल. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात.
💸 टिप: आज मोठे निर्णय टाळा. क्रोधावर संयम ठेवा.

🌬 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
थोडा विसंवादी दिवस. काही अप्रीतिकर बातम्या मिळू शकतात.
💡 टिप: मौल्यवान खरेदी टाळा. आज शांत राहणेच श्रेयस्कर.

🌊 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
आर्थिक लाभ, पण काही मानसिक त्रास.
🔥 टिप: व्यसने टाळा. शुभ विचार करा, गैरप्रकारांपासून दूर रहा.

९ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर मंगळ आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत आक्रमक, प्रतिकार करणारे, धाडसी आहात. कोणतीही आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिला तोंड देण्याची तुमची क्षमता आहे. पराभव तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही पोलीस, सैनिक, एयरफोर्स यामध्ये उत्तम यश मिळवू शकतात. तुमच्यामध्ये नाजूकपणा नसतो किंवा फारसे उत्तम वक्तृत्व नसते मात्र तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळले पाहिजेत आणि बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत. तुमचा स्वभाव शीघ्रकोपी आहे. तुम्हाला मैदानी खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. भिन्नलिंगी व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. आयुष्यात झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटते मात्र तुम्ही जुगारी वृत्त टाळले पाहिजे. भूतकाळात तुम्ही बऱ्याचदा वावरत असतात आणि तुमच्या कल्पना भरमसाठ असतात. गरीब लोकांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. दुःखी आणि अपंग लोकांसाठी तुम्ही देणगी देतात. तुमचे वागणे चमत्कारिक आणि लहरी असू शकते. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. प्रवासामुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतात. तुम्ही विचारवंत आणि अभ्यास वृत्तीचे आहात. चारचौघांपेक्षा तुमचे विचार पुढे गेलेले असतात. तुम्ही तुमच्या विचारांबद्दल ठाम आहात.

व्यवसाय:- तुम्हाला सर्वच क्षेत्रांमध्ये यश मिळते मात्र पोलीस, सैन्य, गुप्तहेर, राजकारण, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड संबंधित, अग्नी संबंधित यंत्रसामग्री यात यश मिळते.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- तांबडा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

🌟 विशेष टीप:
तुमचे नाव आणि जन्मतारीख ह्यांचा संबंध राशीशी असतोच असे नाही.
💬 अधिक माहिती, कुंडली परीक्षण, उपाय, रत्न सल्ला यासाठी संपर्क करा:
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!