आजचे राशिभविष्य शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५
१५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक, (Marathi Rashi Bhavishya)
श्रावण कृष्ण सप्तमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज आनंदी दिवस *श्रीकृष्ण जयंती, स्वातंत्र्य दिन*
चंद्रनक्षत्र – अश्विनी/भरणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष. (गंड योग, विष्टी करण, नक्षत्र गंडांत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्या राशीतील चंद्राचा गुरू, शुक्र आणि बुधाचा मंगळाशी लाभ योग आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. अनपेक्षित लाभ होतील. स्पर्धा जिंकाल. मन प्रसन्न राहील. पावसाळी सहल घडेल. पूर्वजांच्या जमिनीकडे अजून होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल मात्र खर्चाचे नियोजन व्यवस्थित करा. प्रलोभने टाळा. वाहन सुख लाभेल. नवीन खरेदी होईल. एखाद्या मोठया समारंभात भाग घ्याल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. आज वक्तृत्व चमकेल. शेतीतून फेरफटका होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल. अधिकारात वाढ होईल. व्यवसायात आज भरीव वाढ होणार आहे. नातेवाईक, मित्रमंडळी येतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभदायक दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. प्रवास घडतील. सूचक घटना घडतील. प्रवासावर खर्च कराल. अधिकाराचा वापर कराल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अष्टम स्थानी चंद्र आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. एखादी सुखद घटना घडेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना यश मिळेल. शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील. वैवाहिक जोडीदाराकडून चांगली बातमी समजेल. तुमच्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर आज तुम्ही वाटचाल कराल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मौल्यवान खरेदी होऊ शकते. कुलदेवतेची आज कृपादृष्टी लाभेल. तीर्थाट नघडेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धाडसी निर्णय घ्याल. प्रेमात यश मिळेल. योग्य पद्धतीने व्यक्त व्हाल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाराचा उत्तम उपयोग कराल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक चांगली राहील. चैनीवर खर्च कराल. मौल्यवान खरेदीचे बेत आखाल. अपेक्षित सहकार्य मिळेल. लक्ष्मीमाता प्रसन्न होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत समाधानकारक दिवस आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. पंचम गुरू, शुक्र तुम्हाला आनंद प्रदान करेन. मात्र साडेसाती आणि राशीतील राहू तुमचा खर्च वाढवत आहेत.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभाचा दिवस आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. गायकांना अनुकूल कालावधी आहे. वास्तू सुख लाभेल. नवीन वाहन खरेदी होऊ शकते.
१५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जबाबदारीच्या जागा पैलू शकतात. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी आहे. गूढ विद्यांची आवड असते. तुमचे घर, संसार आणि मित्र यांच्याबद्दल अत्यन्त आपुलकी असते. भाषणे, लेखन, रेडिओ वरील श्रुतिका यात तुम्हाला यश मिळते. तुम्ही वरून शांत दिसतात मात्र आतून अस्वस्थ असतात. तडजोड करत नाहीत. तुमची स्मरणशक्ती चांगली असते. तुम्ही निष्कारण काळजी करतात.
तुम्ही कलाकार आणि कलाप्रिय आहात. बोलण्यात आकर्षकपणा असल्याने इतर लोक तुमच्याकडे ओढले जातात. तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. सामाजिक रूढी तुम्ही मानत नाहीत. पैसे खर्च करण्याची वृत्ती असते. आपले आयुष्य आरामदायक आणि आनंदात जावे याकडे तुमचा कल असतो. तुमच्या कामाबद्दल प्रशंसा झाली तगर ते काम करण्यात तुम्हाला विशेष आनंद मिळतो. वृत्ती अभ्यासू असते.
व्यवसाय: गृहसजावट, जवाहिर, संगीतकार हॉटेल मॅनेजनमेंट, जमीन खरेदी -विक्री.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग: निळा, गुलाबी.
शुभ रत्ने:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
