ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण चतुर्थी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस आहे. *संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय मुंबई- ८.५३, नाशिक – ८.४३
चंद्रनक्षत्र – कृतिका / (संध्याकाळी ५.३१ नंतर) रोहिणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज फारशी अनुकूलता नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. कामात विघ्न संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. बोलताना काळजी घ्या. कर्जे घेणे टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) -आज मन उत्साही राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे अंदाज अचूक ठरतील. वस्त्र अलंकार मिळतील. एखादी चांगली बातमी समजेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आणि हर्षल युती आहे. आज कोणतीही जोखीम घेऊ नका. विनाकारण इतरांशी स्पर्धा नको. मोठे खर्च संभवतात. एखादी सहल घडेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभ स्थानी चंद्र आणि हर्षल युती आहे. आनंद देणारा दिवस आहे. भरभराट होईल. मित्रांचा सहवास लाभेल. अर्थलाभ होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) इच्छापूर्ती करणारा दिवस आहे. तुमच्या अधिकारात वाढ होईल. अचूक एखादा सुखद क्षण अनुभवला येईल. गृहसौख्य लाभेल. तुमच्या उत्तम कामानिमित्त बक्षीस मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नवम स्थानी चंद्र आहे. आज काळजी घेतली पाहिजे. अशक्तपणा जाणवेल. खर्च वाढू शकतो. एखादा अपमानाचा प्रसंग येऊ शकतो. तुमच्या अधिकारप्रमाणे मान मरातब मिळणार नाही.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अष्टम स्थानी चंद्र हर्षल युती आहे. आज काळजीपूर्वक पावले टाका. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अर्थहानी होऊ शकते. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आज वैवाहिक सौख्य लाभेल. मान सन्मान मिळतील. चांगल्या मित्रांचा सहवास लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. प्रवास घडतील. भागीदारी व्यवसायात काही विसंवाद संभवतो.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज अचानक धनालाभचे योग आहेत. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. सज्जन व्यक्तींचा सहवास लाभेल. मंगल कार्यासाठी प्रवास घडेल. स्नेहबंध वाढतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पंचम स्थानी चंद्र आहे. मनाचा संभ्रम होऊ शकतो. एखादा महत्वाचा निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. आज खर्च वाढू शकतात. एखादी अप्रिय बातमी समजू शकते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक कामासाठी वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अनामिक भय दाटून येईल. अर्थ हानी होईल. मोठे निर्णय नकोत. वास्तू संबंधित कामे आज पूर्ण होणार नाहीत.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आज तुमचा जयजयकार होणार आहे. कौतुक आणि प्रशंसा होईल. जिवलग मित्रांचा सहवास लाभेल. नवीन मित्र मिळतील. अर्थलाभ होईल. एखादी मोठी घोषणा कराल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य शुक्रवार, १० ऑक्टोबर … […]