आजचे राशिभविष्य शुक्रवार,३ ऑक्टोबर २०२५
३ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल एकादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे.
*पाशंकूशा एकादशी*चंद्रनक्षत्र – श्रवण (चंद्र)/ (सकाळी ९.३५ नंतर) धनिष्ठा (मंगळ).
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर/(रात्री ९.२८ नंतर) कुंभ. (धृती योग, विष्टी शांती)
३ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेकोरपणे आणि व्यवस्थितपणा आहे. दुर्बल लोकांना तुम्ही नेहमीच मदत करतात. तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. क्रीडा प्रकारांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेल्या कार्यासाठी तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे आणि जीवनाकडे तुम्ही आशादायकपणे बघतात. स्वतःच्या प्रेमसंबंधांंबाबत तुम्ही आशादायी आणि संयमी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पाऊल टाकतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार असून आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढू शकतात.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, मंत्री, न्यायाधीश, सचिव, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. दशम चंद्राचा षष्ठ बुधाशी शुभ योग आहे. इच्छापूर्ती करणारा दिवस आहे. अधिकारात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. धनलाभ होईल. कनिष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील प्रसिद्धी मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) -संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही. खाण्यावर ताबा ठेवणे अवघड जाईल. घरात कलह होऊ शकतात. वैराग्य प्राप्त होईल. अधिकाराचा गैरवापर टाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र ग्रहमान आहे. धनलाभ होईल. मान सन्मान मिळतील. पशूलाभ होईल. उन्नतीचे योग आहेत. मात्र आरोग्याच्या तक्रारी चालूच आहेत. श्वसन विकार, दमा यांची काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दीर्घकालीन परिणाम करणारे सौख्य मिळेल. चंद्र अनुकूल आहे. मात्र बुधाची नाराजी आहे. आजचा दिवस काहीसा दडपणाचा आहे. वरिष्ठांचा जाच सहन करावा लागू शकतो. तरीही चंद्र- बुध शुभ योग असल्याने फारसा त्रास होणार नाही.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) धनलाभाचा दिवस आहे. वेळ न दवडता आज काम करत रहा. सार्वजनिक मंचावर प्रशंसा होईल. वक्तृत्व चमकेल. मात्र बोलताना काळजी घ्या. षष्ठ चंद्र भरभरून यश देईन. व्यवसाय वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामाचे नियोजन बदलू शकते. तुमचे आजपर्यंत असलेलं मत बदलू शकते. काही नवीन अनुभव येतील. कनिष्ठ वागणुकीच्या लोकांशी संबंध येईल. विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अजूनही फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. कौटुंबिक त्रास जाणवेल. खर्च वाढतील. पराभवाचे भय आहे. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकूल दिवस आहे. बऱ्याच काळानंतर तुम्हाला सुखाची अनुभूती येईन. कार्य सिद्धीस जाईल. मन प्रसन्न राहील. वैभव आणि ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. वाहन लाभ होईल. तुमच्या बोलण्याचा मोठा प्रभाव पडेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. दशम बुध तुम्हाला सौख्य प्रदान करेन. कार्यसिद्धी होईल. शत्रूवर वैजय मिळेल. ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण कराल. महिलांकडून लाभ होतील. सहकार्य मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. चंद्र अनुकूल आहे. प्रवास घडतील. मात्र त्यात नियोजनात बदल होईल. सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल. एखादी चांगली बातमी समजेल. विनाकारण खोटे आरोप होतील मात्र नंतर त्याचे निरसन होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) समज आणि गैरसमज यांचे मिश्रण आज दिसून येणार आहे. मात्र तुमचा धुर्तपणा आणि मुत्सद्दीपणा यांच्या जोरावर तुम्ही वाटचाल कराल. सौख्य मिळेल. वैभव प्राप्त होईल. धनलाभ होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. त्यामुळे विरोधक माघार घेतील. विघ्न दूर होतील. गृहचिंता काहीशी कमी होईल. विरोध कमी होऊ लागेल. मात्र मुळात घरात गैरसमज होईल असे कृत्य टाळावे. त्यांचा दूरगामी परिणाम होऊ शकतो.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

[…] […]