आजचे राशिभविष्य शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५

१२ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

भाद्रपद कृष्ण पंचमी/ षष्ठी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे. षष्ठी श्राद्ध.

चंद्रनक्षत्र – भरणी(शुक्र)/ (सकाळी ११.५९ नंतर) कृतिका (सूर्य).

आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/(संध्याकाळी ५.३१ नंतर)वृषभ. (व्याघात योग शांती)

१२ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा कल सुखासीन जीवनाकडे असतो. इतरांचे बारीक दोष तुम्ही सहजगत्या काढू शकतात. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. इतरांच्या कारस्थानाला तुम्ही बळी पडतात. तुमच्यात अति महत्वाकांक्षा असते. जास्त बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. अनाठायी काळजी कर्णयचा तुमचा स्वभाव असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. वयाच्या ३९ नंतर स्थिरता लाभते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्ल

व्यवसाय:- राजकीय नेते, न्यायाधीश, सचिव, धार्मिक शिक्षक, डॉक्टर, केमिस्ट, शैक्षणिक क्षेत्र.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सकाळी तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. अचानक लाभ होतील. आरोग्य सांभाळा. दानधर्म करण्यास अनुकूल कालावधी आहे. दुपार नंतर तुमचा दबदबा वाढेल. न्यायदान कराल. कार्यकुशलता वाढणार आहे.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) -सकाळी व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. विनाकारण वाद टाळा. आज काहीतरी अचाट करावे असे तुमच्या मनात येईल. मात्र महिलांचा आदर करा. अन्यथा दंडास सामोरे जावे लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. मानसिक सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. चंद्र आणि रवी अनुकूल योगामुळे आजचा दिवस अगदी आनंदाचा आणि प्रगतीचा आहे.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. नोकरीत प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. भागीदारीत यश मिळेल. नवीन नोकरी शोधणार्यांना चांगली बातमी समजेल. गरजू लोकांना मदत कराल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. यशाची शिखरे गाठाल. प्रशंसा होईल. राजमान्यता मिळेल. सन्मानित व्हाल. मनासारखी कामे आणि कमाई होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाची सुरुवात संमिश्र आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. घरगुती समस्या सोडवाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. समस्या चटकन सोडवाल. तांत्रिक क्षेत्रात प्रगती होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुरुवात चांगली होणार आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. अनुकूल रवी तुम्हाला अधिकार प्रदान करतील बँकेची कामे मार्गी लागतील. वाहन जपून चालवा. उत्तरार्ध फारसा अनुकूल नाही.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक नफा वाढेल. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सप्तम स्थानी चंद्र हर्षल युती आहे. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाचे निर्णय घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. करार होतील. शेअर्स मधून लाभ होतील. उत्तरार्ध यश देणारा आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. सामाजिक कार्य कराल. तुमच्या कष्टाचे चीज होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल. नावलौकिक वाढेल. सप्तम रवी तुम्हाला समस्यांमधून मार्ग दाखवेन. भावंडांचा सल्ला मानणे हीताचे आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमंती घडेल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल. उत्तरार्धात व्यावसायिक लाभ अधिक होतील. चंद्र – शनी लाभ योगाचा योग्य फायदा घ्या. जुने वैर संपेल. गैरसमज दूर होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!