आजचे राशिभविष्य शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५

२६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

अश्विन शुक्ल चतुर्थी/पंचमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज वर्ज्य दिवस आहे. *ललिता पंचमी*

चंद्रनक्षत्र – विशाखा (गुरू)/ (रात्री १०.०९ नंतर) अनुराधा (शनी).

आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/(दुपारी ३.२४ नंतर) वृश्चिक. (विषकुंभ, विष्टी शांती)

२६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर शनि आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला नीटनेटकेपणा, गृह सजावट, सौंदर्यप्रसाधने यांची आवड आहे. तुम्हाला मित्रमैत्रिणी आणि प्रवास प्रिय असतो. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान असतात. तुम्ही मोठमोठ्या योजना सहजपणे पार पाडू शकतात. तुमच्यात रसरशीत जिवंतपणा आणि उत्स्फूर्तपणा आहे. तुमचे ध्येय आणि महत्वाकांक्षा उच्च प्रतीच्या आहेत. तुम्हाला चाकोरीबद्ध होणे आवडत नाही. तुम्ही शांतताप्रिय असून उत्कृष्ट संघटक आहात. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. तुम्ही स्वाभिमानी आहात. तुम्हाला गूढ विद्याची आवड आहे. तुमचा संशोधनाकडे ओढा असतो. तुमच्या जीवनात बऱ्याच वेळेला कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही. शिस्त, गांभीर्य, दृढपणा आणि कर्तव्याची जाण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अत्यंत विचारी आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुमचे विचार समतोल असून कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांचे बरेच गैरसमज होतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून सतत कामात मग्न राहणे तुम्हाला आवडते. तुम्ही धोरणी, हुशार, कार्यशील आणि दुर्बल लोकांबद्दल आदर दाखवणारे आहात. तुम्हाला निसर्ग सौंदर्य, फुले आणि संगीत यांची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही न्यायप्रिय आहात मात्र तुम्हाला अनेकदा नैराश्य जाणवते आणि जीवनामध्ये एकाकी वाटते. तुमच्यामध्ये अधिकार, वचक आणि जोम या गोष्टी भरपूर आहेत. व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभ पणे हाताळण्यात तुम्हाला यश येते. आर्थिक बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करतात, इतरांना तुमची मदत होते कारण इतरांचे दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आपण जीवनात अधिकार गाजवावे असे तुम्हाला कायम वाटते. तुम्ही दिर्घउद्योगी आहात. लोकांची नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्यात तुम्ही तरबेज असतात. तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम केल्यास यश मिळते पण त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे आणि जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्यात चंचलपणा आणि अस्वस्थता आहे. तुमच्या प्रेम प्रकरणात समस्या निर्माण होऊ शकतात. भिन्न लिंगी व्यक्तींबद्दल तुम्ही आक्रमक पवित्रा घेतात.

व्यवसाय:- भौतिक, रसायन, वैद्यकीय शास्त्र, गणित, पतपेढी व्यवस्थापक, पॅथॉलॉजी, जिथे तर्कनिष्ठता आणि बुद्धी लागते असे क्षेत्र तसेच वकिली.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.

शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू लसण्या, अमेथीस्ट.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्या सहकाऱ्याकडून एखादी चांगली बातमी समजेल. काव्य, शास्त्र यात रममाण व्हाल. आज आर्थिक उत्पन्न वाढेल. ज्यांचा आयात – निर्यात व्यवसाय आहे त्यांना उत्तम लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)- तुम्ही विद्याव्यासंगी आहात. तुमच्या चतुर्याचा आज अधिक उपयोग होईल. तुमचा एखड्ड जवळच नातेवाईक परदेशात जाईल. सौख्य लाभेल. नाटक, सिनेमा यांची आवड निर्माण होईल. ज्योतिष मार्गदर्शन घ्याल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) राजकीय आश्रय मिळेल. सत्याच्या वाटेवर चालत रहा. लवकरच त्याचे फळ मिळेल. आज तुमचे तेज उठून दिसेल. आरोग्य मात्र सांभाळा. खर्च वाढू शकतात.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज विद्या प्राप्तीचा दिवस आहे. जितके अधिक अध्ययन कराल तितके अधिक यश मिळेल. आज तुमच्यातील धार्मिक भाव अधिक वाढेल. दानधर्म कराल. वाहन सुख लाभेल. महिलांकडून सहकार्य मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुम्ही नेहमी प्रसन्नचित्त असतात. तुम्ही पराक्रमी आहात. आज तुम्हाला अनेक नवीन संधी चालून येतील. तुम्हाला राजकारणात रस निर्माण होईल. कर्जे मंजूर होतील. धार्मिक कार्य कराल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज तुम्हाला आदर आणि सन्मान मिळतील. दूरच्या देशातून संपर्क साधला जाईल. कामच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुम्ही सुंदर, धनवान आणि बुद्धिमान आहात. तुम्हाला कलेची कदर आहे. आज तुम्हाला महिलांचे आशीर्वाद मिळतील. यश आणि सन्मान मिळेल. लोकप्रियता वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नसली तरी काही सुखद अनुभव येतील. मात्र नियोजनात बदल झाल्याने चिडचिड होईल. दुपार नंतर अनुकूलता वाढेल. उगाचच शत्रू निर्माण करू नका. संध्याकाळ आनंद देणारी आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाची सुरुवात उत्तम होणार आहे. सर्व सुखे केवळ पैशांनीच मिळतात असे नाही. अर्थात तुम्ही मूलतः धनवान असतातच. मात्र आज कौटुंबिक सौख्य लाभेल. सहजीवनाचा आनंद घ्याल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. आज तुम्ही समाधानी राहणार आहात. भावंडांचे प्रेम लाभेल. तुम्ही आज कुटुंबासाठी अधिक वेळ द्याल. सर्व कामात यश मिळेल. आज तुमच्या हातून सत्कार्य घडणार आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) धर्म – कर्म यात रुची निर्माण होईल. मन धार्मिक विचारांनी भरून जाईल. समाजातील गरजू लोकांसाठी कार्य कराल. बुद्धी आणि पराक्रम यांची आज योग्य सांगड घालाल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवसाची सुरुवात फारशी दिलासादायक नाही. मात्र काळजीचे कारण नाही. आज घरगुती कामाला प्राधान्य द्याल. एखाद्या सहलीचे आयोजन कराल. हातून चुका होऊ नयेत याची काळजी घ्या.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!