ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya
श्रावण कृष्ण दशमी/एकादशी. वर्षा ऋतू. शके १९४७, संवत२०८१, विश्वावसुनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – मृग.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/ (दुपारी २.४० नंतर) मिथुन. (हर्षण योग, विष्टी करण शांती)
“आज भद्रा वर्ज्य दिवस आहे.” शिवामूठ – जवस.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या.)
Marathi Rashi Bhavishya
मेष:- सरकारी कामे पूर्ण करण्यास अनुकूल काळ आहे. आज तुमची ऊर्जा वाढणार आहे. कामाची नवीन रचना कराल. भावंड मात्र नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या.
वृषभ:- आज तुम्ही अधिक संवेदनशील व्हाल. कौटुंबिक संबंध सुधारतील. स्वतःचं वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. सौख्य लाभेल. अध्यात्मिक लाभ होतील. तुमचा स्वभाव मिश्किल असला तरी आज कोणाचीही थट्टा करू नका.
मिथुन:- आजची सुरुवात फारशी चांगली नाही. मात्र दुपारनंतर चंद्रअनुकूल होत आहे. आज दुपारी तुमच्याच राशीत चंद्र आहे .आजचा दिवस पराक्रम गाजवण्याचा आहे. आत्मविश्वास वाढेल. तुम्ही आज कुशल नेतृत्व कराल. नवीन धाडस कराल. मातेची काळजी घ्या.
कर्क:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. धन संपत्ती वाढेल. आज तुम्ही अत्यंत कौशल्याने तुमचे कामकाज पूर्ण कराल.तुम्ही स्वयंपूर्ण व्हाल. मात्र लालूच टाळली पाहिजे.
सिंह:- चंद्र अनुकूल आहे. राशीस्वामी सूर्य देखील तुमच्याच राशीत आहेत. तुमची महत्वाकांक्षा उफाळून येईल. आज तुमचे तेज काही विलक्षण असणार आहे. शक्ती आणि अधिकार वाढणार आहेत. आज एखादा दृढ संकल्प करा.
कन्या:- आज तुम्ही अध्यात्मिक, विचारशील आणि एकांतप्रिय बनाल. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला पडेल आणि अवचेतन शक्ती जागृत होतील. व्यावसायिक दृष्टीने आजचा दिवस सफल राहणार आहे. अनुकूल बुध तुम्हाला पूर्ण साथ देत आहे.
तुळ:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. सूर्य अनुकूल आहेत. आर्थिक लाभ होतील आणि इतर सर्व नैतिक इच्छा पूर्ण होतील. समाजात मान सन्मान मिळतील. उच्च स्थान मिळेल. पोटाची काळजी घ्या.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. मानसिक सौख्य लाभेल. पुढील नियोजन कराल. आर्थिक बाजू मजबूत होईल. आज तुम्ही कर्मठ विचार कराल. कामात व्यस्त रहाल. उत्साह वाढेल. अहंकार टाळला पाहिजे.
धनु:- अनुकूल दिवस आहे. तुमच्या नवम स्थानी सूर्य आहे. स्वप्ने साकार होतील. मन प्रसन्न राहील. पित्यासाठी ही चांगली ग्रहस्थिती आहे. सकारात्मकता वाढेल. आध्यत्मिक विकास होईल. काही परीक्षा घेणारे क्षण येतील.
मकर:- संमिश्र ग्रहमान आहे. लाभ होईल. आर्थिक आवक वाढल्याने नियोजन होऊ शकेल. गूढ विद्या शिकण्याची इच्छा निर्माण होईल. विनाकारण वादविवाद टाळा. कनिष्ठ लोकांशी मतभेद संभवतात. आज संघर्षाचा दिवस आहे.
कुंभ:- चतुर्थ आणि पंचम स्थानी चंद्र आहे. आत्मविश्वास भरपूर वाढणार आहे. आज तुमचे प्रशासकीय कौशल्य दिसून येईल. रचनात्मक कार्य होईल. संवेदनशील व्हाल. मनोरंजनाच्या दुनियेत रमून जाल. संतती बाबत समाधानी रहाल.
मीन:- बौद्धिक क्षेत्रात नाव मिळेल. सन्मान होतील. कौतुक होईल. भावाचा सल्ला मोलाचा ठरेल. उत्तरार्ध अधिक चांगला आहे. शत्रूवर विजय प्राप्त होईल. तुम्ही न्यायप्रिय आणि सेवाभावी बनाल. उच्च पद मिळेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
