आजचे राशिभविष्य सोमवार, २५ ऑगस्ट २०२५

२५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

भाद्रपद शुक्ल द्वितीया/तृतीया. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

आज शुभ दिवस आहे.

चंद्रनक्षत्र – उत्तरा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी: सिंह/ (सकाळी ८.२९ नंतर ) कन्या.

(Marathi Rashi Bhavishya)

२५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर नेपच्यून रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला प्रवासाची आवड आहे. परदेशाशी संबंध येतो. तुम्ही प्रामाणिक, निष्ठावान आहात. स्वभाव विश्वासू पण चंचल आहे. वक्तृत्व चांगले असते. तुम्ही एक उत्तम शिक्षक होऊ शकतात. उत्तम स्मरणशक्तीचे वरदान लाभले आहे. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे आहात. जितक्या लवकर तुम्ही अस्वस्थ होतात तितक्याच लवकर तुम्ही शांत होतात. इतरांची लुडबुड तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात सहन होत नाही. प्रकृतीची सतत कुरबुर चालू असते. तसे तुम्हीं शांतताप्रिय आहात. तुम्हाला कष्टाची कामेआवडत नाहीत.तुम्हला कलेत रमणे, निसर्ग, सहली, सिनेमा, नाटक यांची आवड आहे. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जाणवत असते. मनात सदैव खळबळ चालू असते. तुम्ही मनाने विशाल असून जीवनाचे तुम्हाला उत्तम ज्ञान असते. तुम्ही मुलत: स्वतंत्र विचाराचे आहात. दूरवरच्या प्रदेशांबद्दल तुम्हाला आवड असल्याने तुमचा परदेश किंवा दूर देशाशी संबंध येतो. तुमच्यामध्ये अहंकार आहे. तुम्हाला आध्यात्मिक लाभ होतात. कधी कधी तुमचे विचार हट्टी आणि आग्रह होतात त्यामुळे इतरांच्या विचारांची उपेक्षा केले जाते. तुम्ही उत्तम पैसा कमवू शकतात. धर्माविषयी तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. ठराविक चाकोरीत वावरणे तुम्हाला आवडत नाही. तुम्ही निसर्गात: अस्वस्थ असतात. तुम्ही भावनाप्रधान असतात आणि तुमच्या भावना तुम्ही मित्रांकडे व्यक्त करत नाहीत. तुम्हाला उच्च प्रतीच्या लोकांमध्ये मिसळणे आवडते. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार्‍याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही उत्तम सल्लागार असतात. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुमच्या वागण्यात नियमित पणा आणि पद्धतशीर पण आहे. तुम्ही इतरांना उत्साह आणि चांगला सल्ला देतात. तुमचे व्यक्तिमत्व धीर गंभीर आहे. इतरांना तुमच्याबद्दल आदर वाटतो. मनाने तुम्ही मोकळ्या आहात. आणि तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारचा मुक्तपणा आहे. तुमच्यावर निर्बंध लादल्यास तुम्ही बंडखोरी करतात. ज्ञान उथळ असते.

व्यवसाय:- आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, सुगंधी द्रव्य, वैद्यकीय क्षेत्र.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.

शुभ रंग:- हिरवा आणि निळा.

शुभ रत्न:- पुष्कराज आणि पाचू.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र लाभ शुक्र आणि चंद्र त्रिकोण हर्षल आहे. मौल्यवान वस्तू खरेदी होईल. महिलांना दागिने भेट मिळतील. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. मन आनंदी राहील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. संधी मिळतील. व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन आनंदी राहील. इष्ट देवतेची कृपा होईल. आध्यत्मिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. छोटी सहल घडेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नसली तरी नंतर उत्तम ग्रहमान आहे. त्याचा लाभ घ्या. वाहन सुख लाभेल. महिलांना दागिने किंवा वस्त्रे मिळतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाची उत्तम सुरुवात आहे. व्यावसायिक यश लाभेल. प्रवास घडतील. दिवसाचा उत्तरार्ध अंतर्मुख करणारा आहे. आत्मचिंतन कराल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नाही मात्र नंतर व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. स्वतःसाठी चैनीवर खर्च कराल. सुखद अनुभव येतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सकाळी एकादश चंद्र आहे. प्रगतीसाठी उत्तम ग्रहमान आहे. संधीचे सोने करा. सकाळ नंतर व्यय स्थानी चंद्र आहे. आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकल ग्रहमान आहे. व्यवहारातून उत्तम यश मिळेल.उत्पन्न वाढेल. स्त्री धन वाढेल. बौद्धिक क्षेत्रातून लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मोठे यश मिळू शकेल. महिलांकडून लाभ होतील. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. नोकरी/व्यवसायात मोठे यश मिळेल. अचानक लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुरुवातीलाअष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. मात्र नंतर आर्थिक प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सप्तम आणि अष्टम स्थानी चंद्र आहे. प्रापंचिक कामे व्यवस्थित पार पडतील. प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल. उत्तरार्ध खर्चात टाकणारा आहे. पुढील दोन दिवस महत्वाची कामे नकोत.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आज सामाजिक कार्यासाठी अधिक वेळ द्याल. येणी वसूल होतील. अचानक लाभ होतील. प्रिय व्यक्तीवर छाप पडेल. कोर्ट कामात यश मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशिभविष्य सोमवार, २५ ऑगस्ट २०२५… […]

Don`t copy text!