आजचे राशीभविष्य – सोमवार, ४ ऑगस्ट २०२५
४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
✍️ ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya
📅 श्रावण शुक्ल दशमी/एकादशी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर
🕰️ राहुकाळ: सकाळी ७.३० ते ९.००
🌙 चंद्रनक्षत्र: अनुराधा/ज्येष्ठ
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृश्चिक
📌 टीप: नावावरून राशी ठरतातच असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya
🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
आज काहीसा चढउताराचा दिवस असेल. अष्टमस्थानी चंद्र असून थोडी अस्थिरता वाटेल, तरीही काही सुखद क्षण येतील. राजकारणात यश. हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता.
🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
उत्तम दिवस! आर्थिक लाभ, पराक्रमात यश, नव्या गोष्टींची सुरुवात. मानसिक शांतता लाभेल. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
👫 मिथुन (का, की, कु, घ, ङ, छ, के, को, ह):
खूप अनुकूल दिवस. व्यवसायात भरभराट. नोकरीत सुखद अनुभव. येणी वसूल होणार. कर्ज मंजूर होण्याची शक्यता.
🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
पंचम चंद्राचा प्रभाव लाभदायक. गुंतवणुकीत नफा. आत्मविश्वास वाढेल. सन्मान वाढेल. वागणूक रुबाबदार राहील.
🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
चतुर्थ चंद्र असूनही व्यवसायात प्रगती. लेखन, सर्जनशील क्षेत्रात यश. नम्रपणा ठेवल्यास यश निश्चित.
👧 कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो):
तृतीय चंद्र तुमच्यासोबत आहे. इच्छित कामे होतील. मौल्यवान खरेदी. पित्याचा आधार. प्रकृतीत सुधारणा.
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
द्वितीय चंद्र. आत्मविश्वास वाढेल, पण मन अस्वस्थ राहू शकते. दीर्घकालीन लाभ मिळतील. यश मिळेल.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
तुमच्याच राशीत चंद्र! दिवस तुमचाच आहे. यशाचा अनुभव. न्यायी विचार व ठाम निर्णय घेता येतील. तेजस्वी व्यक्तिमत्त्व जाणवेल.
🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
मिश्र परिणाम. खर्च वाढेल. प्रवास संभवतो. शिक्षणात थोडा विलंब. तरीही कष्ट वाया जाणार नाहीत.
🐊 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
अत्यंत अनुकूल वेळ. मित्रसहकार्य लाभेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. व्यवसायात प्रगती.
🏺 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
दशमस्थानी चंद्र. नवे उद्योग सुरू होण्यास अनुकूल. धनलाभ. खेळ व स्पर्धांमध्ये यश. कनिष्ठांचे सहकार्य.
🐟 मीन (दी, दू, झ, ञ, थ, दे, दो, चा, ची):
परदेश प्रवासाचे योग. आर्थिक लाभ. स्थैर्य मिळेल. पंचम सूर्याचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. उत्साह, जोमाने प्रगती हे तुमचे वैशिष्ट्ये आहेत. तुमचे आयुष्य अनेक चळवळींनी भरलेले आहे. तुम्हाला अनपेक्षित गोष्टींचा नेहमी अनुभव येतो. तुमच्या मनाची पातळी वरच्या दर्जाची आहे. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे विचार इतरांवर लादत असतात. तुम्ही वादविवाद टाळले पाहिजेत. त्यामुळे गुप्त शत्रू निर्माण होत असतात आणि गैरसमज पसरत असतात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि भ्रमंती याची आवड असते. तुम्ही हरहुन्नरी आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब आहे. आणि तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडतात मात्र ते तुमच्या चांगल्यासाठीच असतात. परंपरा, रूढी आणि बंधने तुम्ही तोडून टाकतात. तुमच्या मध्ये मनाचा एककल्लीपणा जाणवतो. तुम्ही इतरांपुढे संपूर्ण व्यक्त होत नाहीत मात्र सर्व प्रकारच्या अडचणींवर तुम्ही सक्षमपणे मात करतात. न आवडणाऱ्या गोष्टींचा तुम्ही जोरदार विरोध करतात. तुमच्या विचारांमध्ये आग्रहीपणा आणि अट्टाहास असतो. तुम्ही सतत कार्य मग्न असतात. बऱ्याच वेळा तुम्ही हातचे राखून ठेवतात. तुम्ही इतरांपेक्षा जास्त जलदपणे अडचणींचा सामना करतात. तुम
व्यवसाय:- यंत्रसामुग्री, विज्ञान, इलेक्ट्रिसिटी, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, संशोधन, कारखानदारी, हस्तसामुद्रिक, ज्योतिषी, अध्यात्म, बँकिंग सल्लागार.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, पांढरा, मरून.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
🔮 वैयक्तिक कुंडली विश्लेषनासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521

[…] […]