आजचे राशिभविष्य सोमवार,२३ फेब्रुवारी २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन शुक्ल षष्ठी/सप्तमी.शके १९४७, संवत २०८२, विश्वावसुनाम संवत्सर.शिशिर ऋतू, उत्तरायण.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – भरणी / (दुपारी ४.३४ नंतर) कृतिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष / (रात्री १०.१२ नंतर) वृषभ.
आज क्षय तिथी.चंद्र केंद्र मंगल, चंद्र लाभ बुध, चंद्र लाभ गुरू, चंद्र लाभ शुक्र, चंद्र युती हर्षल – अत्यंत प्रभावी व वेगवान घटना घडवणारे ग्रहमान.
“आज क्षय तिथी आहे.”(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-आज चंद्र तुमच्या राशीत आहे. ऊर्जा आणि उत्साह भरपूर असेल. नवीन कामाची सुरुवात कराल. अचानक लाभाची शक्यता आहे. मात्र हर्षल युतीमुळे उतावळेपणा टाळा.
वृषभ:-रात्री नंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल. दिवसाचा उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. घरगुती सौख्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन:-मित्रांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन कल्पना सुचतील. लेखन आणि संवादातून लाभ संभवतो.
कर्क:-नोकरी-व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. वरिष्ठ खुश राहतील. चंद्र लाभ गुरूमुळे भाग्याची उत्तम साथ मिळेल. आरोग्य सुधारेल.
सिंह:-धाडसी निर्णय घ्याल. प्रवास योग संभवतो. धार्मिक कार्यात रस वाढेल. बोलण्याला वजन प्राप्त होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कन्या:-संशोधन, अभ्यास आणि विश्लेषणात यश मिळेल. चंद्र लाभ बुधमुळे बुद्धीची चमक दिसून येईल. अचानक लाभ संभवतो. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ:-भागीदारीत यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. चंद्र लाभ शुक्रामुळे प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा.
वृश्चिक:-कामाचा ताण वाढेल पण त्यातूनच यश मिळेल. शत्रू निष्प्रभ ठरतील. आरोग्यात सुधारणा होईल. संयम बाळगा.
धनु:-सर्जनशीलतेला वाव मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. अनपेक्षित लाभ संभवतो. मौल्यवान वस्तू जपून ठेवा.
मकर:-घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार लाभदायक ठरतील. मातृसुख लाभेल. मानसिक स्थैर्य राखा.
कुंभ:-लहान प्रवास संभवतो. भावंडांशी संबंध सुधारतील. चंद्र केंद्र मंगलमुळे धाडस वाढेल. मात्र वाद टाळा.
मीन:-ग्रहमान अनुकूल आहे. आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा वाढेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. अनपेक्षित संधी चालून येतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!