आजचे राशीभविष्य -सोमवार, २८ जुलै २०२५

२८ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये

0

🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

📅 श्रावण शुक्ल चतुर्थी | वर्षा ऋतू | दक्षिणायन

📜 शके १९४७, संवत २०८१ – विश्वावसुनाम संवत्सर

🕘 राहुकाळ: सकाळी ७.३० ते ९.००

🌸 आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे.

🌺 विनायक चतुर्थी | शिवामूठ – तांदूळ

🌙 चंद्रनक्षत्र: पूर्वा/उत्तरा

👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: सिंह

📌 टीप: नावाप्रमाणेच तुमची रास असतेच असे नाही, नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

 

🔯 राशीभविष्य 🔯(Marathi Rashi Bhavishya)

🔴 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

धनलाभाचा योग आहे. शेअर्समध्ये यश. पण व्यवसायात मोठे धोके घेऊ नका. शब्द देताना विचार करा.

 

🟢 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

राजकारणात यश. नवे विचार. कलाकारांना संधी. जमीन, रसायने लाभदायक. पण व्यवहारात दक्षता.

 

🟡 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

उद्योगात यश. आनंददायी दिवस. धार्मिक प्रवास शक्य. पण धाडस मर्यादेत ठेवा.

 

🔵 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

स्वाभिमान जागृत होईल. अचानक लाभ. बोलताना आणि वाहन चालवताना काळजी घ्या.

 

🟠 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

आक्रमकपणा कमी होईल. शत्रू ओळखता येतील. हनुमान उपासना शुभ.

 

🟣 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

भावनिक निर्णय टाळा. बुध-रवीचा पाठिंबा लाभेल. पण तणाव टाळा.

 

🔴 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

वरिष्ठांचे आशीर्वाद. मनाशी घेतलेले काम पूर्ण होईल. स्त्रियांनी संयम राखावा.

 

🟢 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

दबदबा वाढेल. पित्याचा पाठिंबा. सामाजिक कार्यात यश. नोकरीत कौतुक.

 

🟡 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

आर्थिक लाभ. प्रवासाचे बेत. पत्नीचा उत्तम सहवास. कठोर पण योग्य निर्णय घ्याल.

 

🔵 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

धोका टाळा. अचानक लाभ शक्य. वाहन आणि अग्नीपासून सावध.

 

🟠 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

बुद्धी भ्रमित करणारी स्थिती. राहु जप करा. अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. संयम हवा.

 

🟣 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

व्यवसायात धावपळ. घराशी संबंधित निर्णय. नात्यांत गैरसमज टाळा. वाहन जपून चालवा.

२८ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुमच्यावर रवि,चंद्र आणि नेपच्यून तसेच शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वभावाने उदार असल्यामुळे सेवाभावी संस्थांवर तुम्ही खर्च करता. उदाहरणार्थ शाळा, हॉस्पिटल इत्यादी. खाजगी व सामाजिक जीवनात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागतात. भविष्यात लागणारी पैशाची जपणूक सावधपणे करावी. अन्यथा विश्वासघात होण्याची शक्यता असते. जोडीदाराची निवड करताना सर्व तऱ्हेची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक बदल होतात. इच्छाशक्ती जबरदस्त असल्याने इतरांना न जुमानता तुम्ही तुमचे निर्णय घेता. विचारात व कृतीत फार स्वातंत्र्य दाखवल्यास इतरांची मैत्री व सहानुभूती तुम्ही गमावून बसतात. प्रगती व यश हे तुमच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे. तुमच्यात उज्वल राष्ट्रभक्ती असून घराकडे अधिक ओढ असतो. शांत प्रवृत्तीचे असून भिडस्त स्वभाव असतो. तुम्ही हळवे असून प्रत्यक्षात इतरांना तुमच्यात विरोधाभास जाणवतो. तुमची इच्छा असो व नसो तुम्हाला लोकप्रियताही मिळतेच. तुम्ही निस्वार्थी व प्रामाणिक असून बचतीकडे कल असतो. अंर्तमनात तुम्ही धार्मिक वृत्तीचे आहात परंतु त्याचा गाजावाजा केलेला आवडत नाही. स्वतंत्र वृत्ती असून महत्वकांक्षी असतात. सतत बदल करण्याची वृत्त

शुभ दिवस :-रविवार, सोमवार, बुधवार गुरुवार.

शुभ रंग- पिवळा, सोनेरी केशरी.

शुभ रत्ने :- माणिक, पाचू , चंद्रमणी.

( रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

 

📞 संपर्क:

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 8087520521

💫 कुंडली विश्लेषण, रत्न सल्ला, नाव नक्षत्र प्रमाणे निवड यासाठी संपर्क साधा.

🧿 [आपल्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या!]

🪬 शुभम भवतु!

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!