आजचे राशिभविष्य सोमवार,९ मार्च २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन कृष्ण षष्ठी. विश्वासूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे.
*संत एकनाथ महाराज षष्ठी*चंद्रनक्षत्र – विशाखा / (दुपारी ४.१२ नंतर) अनुराधा.(Marathi Rashi Bhavishya)
आज जन्मलेल्या बाळाची राशी: तूळ / (सकाळी ९.३० नंतर) वृश्चिक.(व्याघात योग शांती करून घेणे)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण करा. चंद्र त्रिकोण शुक्र व शनीमुळे कामात स्थैर्य मिळेल. व्यावसायिक संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सप्तम स्थानी चंद्र आहे. नातेसंबंध दृढ होतील. भागीदारीतून लाभ मिळतील. आर्थिक व्यवहारातून प्रगती होईल. संध्याकाळनंतर अनुकूल घटना घडतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढू शकतो. मात्र बुध त्रिकोण गुरूमुळे बुद्धीचा योग्य वापर कराल. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) पंचम स्थानी चंद्र आहे. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती आनंद वाढेल. मालमत्ता किंवा वाहन विषयक चर्चा पुढे सरकेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन संपर्कातून लाभ मिळतील. संशोधन आणि अभ्यासात यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) द्वितीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक व्यवहारातून लाभ होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. बोलण्यामुळे मान-सन्मान वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र येत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. संध्याकाळनंतर शुभ घटना घडतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. नवीन संधी प्राप्त होतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) दशम स्थानी चंद्र आहे. नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाचा ताण वाढेल मात्र त्यातून लाभही मिळेल.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) नवम स्थानी चंद्र आहे. भाग्याची साथ लाभेल. प्रवासातून लाभ मिळतील. धार्मिक कार्यात मन लागेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!