आजचे राशिभविष्य सोमवार,२० ऑक्टोबर २०२५
२० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण चतुर्दशी विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.००
चंद्र राशी – कन्या (वैधृति योग, शकुनी, चतुष्पाद करण)
नक्षत्र – हस्त/चित्रा.
आज आनंदी दिवस आहे. *नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान (पहाटे ५.२० ते सूर्योदय)*
२० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय समुद्र, नदी किंवा पाणथळ जागी होतो. मित्रपरिवार मोठा असतो. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. तुम्ही नेहमी सावध असतात मात्र प्रेमात कोणतीही पातळी ओलांडण्यास तयार असतात. तुमचाविवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो. उच्च पदस्थ लोकांची तुम्हाला मदत मिळते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही कष्टाळू असून योग्य निर्णय घेणारे आहात. प्रेमाविषयी तुमचा दृष्टीकोन भावनिक असतो. तुम्ही मोठ्या पदावरील जबाबदारीच्या जागा स्वीकारतात आणि यशस्वी होतात. स्वभावाने तुम्ही शांत असलात तरी स्वतःच्या मनाशी तडजोड करत नाहीत. भाषणे, लेखन, रेडिओ/टीव्ही मालिका लेखन यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही इतरांच्या सूचनांप्रमाणे कृती करतात. तुम्ही समाजप्रिय, नाविन्याची आवड असणारे तसेच प्रवासाची आवड असणारे आहात. तुम्ही बुद्धिमान, तल्लख, आणि शास्त्राची आवड असणारे आहात. तुमचा सहवास इतरांना प्रेरणादायक असतो. प्रेम, सहानुभूती आणि आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुमच्या बोलण्यात आकर्षकपणा आहे. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले आणि वाईट यामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे भेदभाव करू शकतात. तुम्ही कल्पनारम्य आणि उत्साही आहात तसेच ममताळू आणि स्वातंत्र्यप्रिय देखील आहात. तुम्ही सतत कार्य मग्न असतात. तुम्ही विनम्र असून इतरांच्या गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करतात. तुम्हाला कायद्याचे पालन करणे आवडते. स्वतःच्या वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींकडे तुम्ही आकर्षित होतात. तुम्ही अतिशय हळवे असून फार लवकर मनातून अस्वस्थ होतात. तुम्हाला कोडे सोडवणे, लॉटरी यांचा नाद असतो. तुमच्याजवळ चांगले शब्दभांडार असते. बोलणे, लेखन, भाषण, शिकवणे यात तुमचा हातखंडा असतो. दुर्बल लोकांना मदत करणे तुम्हाला आवडते. भोवती ढोंगी मित्रांचे जाळे असते.
व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, राजकीय क्षेत्र, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:कामात प्रगतीचे संकेत. वरिष्ठांचा सहकार मिळेल. आर्थिक लाभ. घरगुती वातावरण आनंदी.शुभ रंग – लाल.
वृषभ:धनलाभाचे संकेत. मित्रमंडळात प्रतिष्ठा वाढेल. प्रवास यशस्वी ठरेल.शुभ रंग – हिरवा.
मिथुन:नवीन संधी मिळतील. संवाद कौशल्य लाभदायक ठरेल. दुपारी थकवा जाणवेल, विश्रांती घ्या.शुभ रंग – पिवळा.
कर्क:मानसिक शांतीसाठी ध्यान आवश्यक. नोकरीत स्थैर्य वाढेल. कौटुंबिक समस्या सुटतील.शुभ रंग – पांढरा.
सिंह:अडकलेले पैसे परत येतील. जोडीदाराचा सहकार लाभेल. आत्मविश्वासात वाढ.शुभ रंग – केशरी.
कन्या:नवीन योजना यशस्वी ठरतील. व्यावसायिक क्षेत्रात प्रशंसा मिळेल. आरोग्य सुधारेल.शुभ रंग – हिरवा.
तुळ:दिवस अत्यंत शुभ. आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रवासाचे योग उत्तम.शुभ रंग – गुलाबी.
वृश्चिक:गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आर्थिक बाबतीत थोडा संयम ठेवा. धार्मिक कार्यात मन रमेल.शुभ रंग – निळा.
धनु:सर्जनशील कार्यात यश. मित्रांकडून मदत. मुलांच्या प्रगतीने समाधान.शुभ रंग – पिवळा.
मकर:कामात ताण येईल, पण त्यावर मात करता येईल. वरिष्ठांचा सहकार मिळेल.शुभ रंग – राखाडी.
कुंभ:उत्साहवर्धक दिवस. आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घ्या. मानसिक स्थैर्य वाढेल.शुभ रंग – निळा.
मीन:कला, साहित्य, संगीत क्षेत्रात यश. घरात आनंदाचे वातावरण. आरोग्य चांगले राहील.शुभ रंग – जांभळा.
आजचा उपाय:
सोमवारी भगवान शंकराला दुग्धाभिषेक करा आणि “ॐ नमः शिवाय” हा मंत्र १०८ वेळा जपा — मानसिक शांती व कार्यसिद्धी लाभेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] […]
[…] […]