आजचे राशिभविष्य सोमवार, १ सप्टेंबर २०२५
१ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल नवमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज आनंदी दिवस आहे. *अदु:ख नवमी, गौरी पूजन*
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा/ (संध्याकाळी ७.५५ नंतर) मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृश्चिक/ (संध्याकाळी ७.५५ नंतर ) धनु. (विषकुंभ योग, नक्षत्र गंडांत शांती)
१ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रांना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुह
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, स्टुडिओ मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, बँकिंग, औषध, वैद्यकीय क्षेत्र, वकील.
शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.
शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र त्रिकोण बुध आहे. आहे. अष्टम स्थानी चंद्र असला तरीही सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. जमीन व्यवहार पुढे सरकतील. व्यवसाय वाढेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सप्तम आणि अष्टम स्थानी चंद्र आहे. मनावरचा ताण कमी झाल्यासारखा वाटेल. ध्यानधारणा केल्याने सात्विक समाधान लाभेल. लेखक, प्रकाशक यांचा चांगला कालावधी आहे. प्रसन्न वाटेल. संध्याकाळ खर्चात टाकणारी.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. सकारात्मक विचारांचा परिणाम जाणवेल. शब्दाला मान मिळेल. बुद्धीचातुर्य कामास येईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पंचम आणि षष्ठ चंद्र आहे. अनुकूलता वाढीस लागेल. कलात्मकता जोपासली जाईल. मन आनंदी राहणार आहे. वक्तृत्व चमकेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चतुर्थ आणि पंचम चंद्र आहे. दिवसाची उत्तम सुरुवात आहे. व्यावसायिक यश लाभेल. प्रवासावर खर्च होईल. मौल्यवान खरेदी कराल. मनावरचे दडपण दूर होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तृतीय आणि चतुर्थ चंद्र आहे. उत्तम ग्रहमान आहे. राशीस्वामी बुध आता व्यय स्थानी आले आहेत. मात्र तुमच्यातील चातुर्याचा अनुभव येईल. चिकित्सा आणि संशोधन यात यश मिळेल. अभ्यासू वृत्तीचा प्रत्यय येईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) द्वितीय आणि तृतीय चंद्र आहे. नोकरीच्या निमित्त भ्रमंती घडेल. प्रवासातून लाभ होतील. धर्म कार्य कराल. तुमचे क्षितिज व्यापक बनेल. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा अति वापर टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकल ग्रहमान आहे. व्यवहारातून उत्तम यश मिळेल. उत्पन्न वाढेल. संपत्ती वाढेल. वारसा हक्काने लाभ होतील. छोटे प्रवास घडतील. स्वप्ने सत्यात उतरतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सुरुवातीला व्यय स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. मात्र नंतर आर्थिक प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायिक यश मिळेल. मित्रमंडळींना सोबत घेऊन मौज कराल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नसली तरी नंतर उत्तम ग्रहमान आहे. त्याचा लाभ घ्या. वाहन सुख लाभेल. महिलांना दागिने किंवा वस्त्रे मिळतील. करिअर संधी मिळतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दशम आणि लाभ स्थानी चंद्र आहे. नवनवीन आव्हाने पेलण्यास सज्ज व्हाल. अत्यंत अनुकूल दिवस आहे. सप्तम स्थानातील बुधाशी चंद्राचा शुभ योग आहे. आज तुमच्या ज्ञानाचा इतरांना लाभ होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवम आणि दशम स्थानी चंद्र आहे. सुखाची झुळूक अनुभवायला मिळेल. आधुनिक विचारांची कास धराल. व्यापारी कामे आज पूर्ण करा. तुमचा आर्थिक स्रोत जेथून आहे त्यांना दुखवू नका. इतरांवर अवलंबून राहू नका.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



