ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल प्रतिपदा. शरद ऋतू. शके १९४७, संवत२०८१, विश्वावसुनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – उत्तरा (रवी)/(सकाळी ११.२४ नंतर) हस्त (चंद्र).
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या (किंस्तुघ्न करण शांती)
“आज उत्तम दिवस आहे.” *घटस्थापना* मातामह श्राद्ध.
२२ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची शरीरयष्टी चांगली आहे. डोळे बोलके असतात. भिन्न लिंगी व्यक्तीपासून फायदा होतो. मित्र परिवार कमी असतो. वाद विवाद झाल्यास त्याची तुम्ही फिकीर करत नाहीत. स्वतःचा व्यवसाय केल्यास यश मिळते. स्वभाव काहिस अस्थिर असू शकतो. आयुष्यच्या उत्तरार्धात मोठे यश मिळते.
तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, राजदूत, बँकिंग, आयात निर्यात, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, डॉक्टर, कान –नाक– डोळे स्पेशालिस्ट, संशोधन, ज्योतिष.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.
शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:- आज धनालाभचा दिवस आहे. मंगलमय क्षण आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल. तुमच्या अधिकाराचा आणि सामाजिक स्थानाचा तुम्हाला उपयोग होईल.
वृषभ:- सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. तुम्ही जे ठरवतात ते होईलच असेनाही. आजही तुमच्या नियोजनातबदल करावा लागेल. मात्र तरीही तुम्हा उत्साह कमी होणार नाही. प्रवास घडतील. नवीन वाहन खरेदी होईल.
मिथुन:- आज तुमची निसर्गात फिरण्याची आवड अधिक तीव्र होईल. घराभोवती उत्तम बागकाम कराल. पाळीव पशु – पक्षी यांच्या सहवासात वेळ उत्तम जाईल. घरात काही बदल कराल.
कर्क:- उद्योग/व्यवसाय यात आज तुम्ही व्यस्त असणार आहात. आर्थिक आवक भरपूर होणार आहे. मानसिक सौख्य लाभेल. मन आनंदाने भरून जाईल. कुलदेवतेची सेवा आणि उपासना करताना मन भरून येईल.
सिंह:- तुम्हाला स्तुती आणि प्रशंसा मनापासून प्रिय आहे. आज त्याचा अनुभव येईल. तुमचे कौतुक होईल. वक्तृत्व चमकेल. तुमची बुद्धिमत्ता आज विशेष उठून दिसेल. शब्दाला मान मिळेल. कर्जे मंजूर होतील.
कन्या:- आज अत्यंत प्रसन्न ग्रहमान आहे. राशीस्वामी चांद्रसोबत तुमच्याच राशीत आहेत. संशोधन, चिकटीस आणि दर्जा नियंत्रण ही तुमची वैशिष्टये आहेत. त्यात आज भरपूर प्रगती होईल. अनेक महत्वाचे प्रश्न तुम्ही चुटकी सरशी सोडवाल.
तुळ:- काही खर्च हे आनंद देणारे असतात. आज नवीन वस्तूची खरेदी होईल. घरात आनंदी आनंद असणार आहे. मात्र एखादा निर्णय चुकू शकतो. म्हणूनच योग्य सल्ला घ्या.
वृश्चिक:- सरकारी मान सन्मान आणि राजकारण हा तुमच्या आवडीचा विषय आहे. आज तुमच्या मनासारख्या घटना घडतील. अनुकूल चंद्र आणि बुध तुम्हाला आत्मविश्वास आणि आनंद देतील.
धनु:- उद्योग – व्यवसाय तुम्हाला मानापासुन आवडतो. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. आज एका नव्या उत्साहाने तुम्ही कामास सुरुवात कराल. त्यात तुम्हाला भक्कम यश मिळणार आहे. वरच्या पदावर जाल. अधिकाराच्या जागा मिळतील.
मकर:– आज तुमच्यावर नवीन जबादारी पडणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. एखादे नको असलेले किंवा न आवडणारे काम करावे लागू शकते. त्यामुळे तुमचा मनाचा कल काहीसा उदासीकडे राहील.
कुंभ:- आज चंद्राची फारशी अनुकूलता नाही. मात्र बुध तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ देणार आहे. त्यामुळे मनाचा कल जरी कष्ट करण्याकडे नसला तरी आळस झटकून कामाला लागावे लागेल. मित्रांसाठी काही कामे करावी लागतील.
मीन:- नवीन ऋतू आणि नवीन उत्साह यांचे आजचा दिवस एक उत्तम मिश्रण आहे. तुम्हीही नव्या जोमाने कामाला लागणार आहात. एखादा संकल्प कराल. स्वतःमध्ये बदल कराल. साडेसातीचा फरक जाणवत आहेच. महिलांच्या गैरसमजातून एखादा त्रासहोऊ शकतो.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
