आजचे राशिभविष्य सोमवार, २९ सप्टेंबर २०२५
२९ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल सप्तमी/अष्टमी. शरद ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु. (विष्टी शांती, नक्षत्र गंडांत)
“आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *महालक्ष्मी पूजन* घागरी फुंकणे.
मेष:- संमिश्र दिवस आहे. आज फारशी अनुकूलता नाही. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. सरकारी कामे रखडतील. अध्यात्मिक लाभ होतील.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. संभ्रमात करणारा दिवस आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना सावध रहा. आरोग्यात सुधारणा होईल. अति धाडस नको.
मिथुन:- आज तुमचा दबदबा वाढेल. शेअर्स मध्ये अचुकी निर्णय घ्याल. येणी वसूल होतील. धर्म कार्य कराल. आज कार्यकुशलता वाढेल.
कर्क:- उद्योग – व्यवसायात चांगली गती मिळेल. पूर्वजांसंबंधित कामे पुढे सरकतील. शेतीच्या कामासाठी वेळ द्यावा लागेल. पाण्याचा प्रश्न सुटेल. विहिरी आणि इतर द्रव पदार्थ यातून लाभ होतील.
सिंह:- काही महत्वाची कामे आज पूर्ण होणार आहेत. भावंड मदत करतील. तुमच्यापासून इतर नातेवाईकांना फायदा होईल. सहल घडेल. शेअर्स मध्ये यश मिळेल.
कन्या:- आत्मविश्वास असणे चांगले असते मात्र अति आत्मविश्वास नको. आज सामाजिक आणि राजकीय कार्यातून काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कठोर बोलणे टाळा. घशाची काळजी घ्या.
तुळ:- आत्मविश्वास वाढवणाऱ्या घाट घडतील. काही ठिकाणी कठोर वागणे होईल. नात्यातून लाभ होतील. मात्र राजकीय आणि सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना दुखव नका.
वृश्चिक:- द्वितीय चंद्र आहे. तुमच्या कठोर वागण्याचा आज तुम्हाला फायदा होणार आहे. सूर्याची अनुकूलता असली तरी त्याचा आज फारसा लाभ मिळणार नाही. जेथे भरवसा आहे तेथून निराशा पदरी पडू शकते.
धनु:- आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. द्रव्यार्जन होईल. व्यवसाय वाढेल. स्पर्धक माघार घेतील. शत्रूचे शत्रू तुमचे मित्र बनून तुम्हाला सहकार्य करतील. कार्यक्षमता वाढेल.
मकर:- व्यय स्थानी चंद्र आहे. त्यामुळे आज फारशी अनुकूलता नाही. तुमचे वरिष्ठ आज तुमच्यावर खुश राहतील. तुम्ही आज खूप जास्त काम कराल. घरातून मात्र काहीसा विरोध जाणवेल.
कुंभ:- उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. काही मोठे व्यवहार होतील. दूरचे प्रवास संभवतात. कठीण वाटणारे काम आज सोपे होईल. मात्र वरिष्ठांना विश्वासात घ्या.
मीन:- रोजच्या कामाला आज विशेष गती प्राप्त होईल. स्त्री धन वाढेल. स्वप्नपूर्ती होईल. लॉटरी लागण्याची शक्यता आहे. शत्रूत्रास जाणवेल. आत्मविश्वास कमी होईल.
२९ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव अभ्यासू असून इतरांना शिकवणे आवडते. तुमचे व्यझक्तिमत्व विरोधाभासी असते. इतरांना मदत करताना कधीकधी घाईने निर्णय घेतले जातात. प्रेमात रूढी मोडतात. तुम्ही जीवनात सावधगिरीने वागतात. उच्च पदस्थ व्यक्तींकडून तुम्हाला मदत मिळते. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. मित्र परिवार मोठा असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. वैचारिक लेखनाची आवड असते. भोवतो ढोंगी मित्रांचे जाळे असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक दृष्टीकोन असतो. वक्तृत्व आणि शब्दभांडार चांगले असते. आत्मविश्वास असू दुबळ्या लोकांना मदत करणे आवडते. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला जुगार किंवा कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू पाहणी शांत असतात मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात.
व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य सोमवार, २९ सप्टेंबर २… […]