ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा. वर्षा ऋतू. विश्वावसु नाम संवत्सर शके १९४७, संवत २०८१.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा/ (रात्री ८.०३ नंतर उत्तरा) भाद्रपदा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ/ (दुपारी २.२९ नंतर) मीन. (धृती आणि शूल योगाची शांती)
“आज करी दिन आहे.
(Marathi Rashi Bhavishya)
मेष:- सकाळी चंद्र अनुकूल आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होईल. घरातील दुरुस्ती करावी लागेल. खर्च वाढतील. प्रवासात त्रास संभवतो. उत्तरार्ध संमिश्र आहे. अध्यात्मिक कार्य करण्यास उत्तम कालावधी आहे.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. वक्तृत्व गाजेल. कलाकारांना लाभ होतील. व्यापारात लाभ होईल. वाहन खरेदीचाविचार करण्यासाठी चांगला दिवस आहे.
मिथुन:– नोकरी/ व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. सहकारी खुश राहतील. एखादा मोठा आणि महत्वाचा प्रश्न आज सुटू शकतो. कर्ज प्राप्ती होईल. संध्याकाळ अधिक अनुकूल आहे.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. सकाळी चंद्र अष्टम स्थानी आहे. धनलाभ होईल. मन शांत राहील. प्रवास घडतील. ध्यानधारणा करा. संध्याकाळी कामाचा वेग वाढेल. धर्मकार्य करण्यास अनुकूल दिवस आहे.
सिंह:- सकाळचं सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. आज काही फारसे वेगळे घडणार नाही. दुपार नंतर कामाचे नियोजन बदलेल. मानसिक त्रास जाणवेल. मात्र काही सुखद घटना घडतील.
कन्या:- व्यापार वाढीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आज कामे पूर्ण करा. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. भ्रमंती घडेल. नेमके नियोजन कराल. तुमच्या समोर चंद्र शनी युती आहे. तुमचा मत्सर करणारे लोक तुमच्या कामात अडथळे आणू शकतात.
तुळ:– तुमच्या पंचम आणि षष्ठ स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. हरवलेली वस्तू सापडेल. अडचणी दूर होतील. धनलाभ होईल. विश्वासु मित्राचा सल्ला मानणे हिताचे आहे.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. मानसिक सौख्य लाभेल. पुढील नियोजन कराल. आर्थिक बाजू मजबूत होईल. पंचम स्थानी चंद्र शनी युती आहे. अचानक लाभाचे प्रलोभन दिसेल. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.
धनु:- अनुकूल दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. मन प्रसन्न राहील. पाळीव प्राणी आनंद देतील. व्यवसायात एखादी अभूतपूर्व घटना घडू शकते. आरोग्य सांभाळा.
मकर:– लाभ होईल. आर्थिक आवक वाढल्याने नियोजन होऊ शकेल. लेखकांना उत्तम यश मिळेल. आज शौर्य दाखवण्याचा दिवस नाही याची नोंद घ्या.
कुंभ:- अनुकूल दिवस आहे. सकाळच्या सत्रात फारसे काही घडणार नाही. पैसे येतील तसेच जातील. खर्च वाढू शकतात. वक्तृत्व चमकेल. उत्तराध चांगला आहे. शब्दप्रविण्य अनुभवाल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. सकाळी फारशी अनुकूलता नाही. बौद्धिक क्षेत्रात नाव मिळेल. दुपार नंतर तुमच्या राशीत चंद्र आणि शनीची युती आहे. सन्मान होतील. कौतुक होईल. सल्ला मोलाचा ठरेल. मात्र कोणताही गैरकृत्य हातून होणार नाही याची काळजी घ्या.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
