आजचे राशिभविष्य –शनिवार, १६ ऑगस्ट २०२५

0

कालाष्टमी,गोपाळकाला Marathi Rashi Bhavishya

राहुकाळ: सकाळी ६.१६ ते ७.५१चंद्र

नक्षत्र: कृतिका 

आज जन्मलेल्यांची राशी: मेष 

Marathi Rashi Bhavishya

मेष-आजची मेहनत तुम्हाला थेट लाभ देईल. व्यवसायात किंवा नोकरीत प्रगतीची चिन्हे. घरात नवीन वस्तूंची खरेदी संभवते. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.

वृषभ-आर्थिक लाभाची शक्यता असली तरी खर्चाचे नियोजन गरजेचे आहे. नवीन काम सुरू करण्याआधी विचार करा. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील पण त्या यशस्वीरीत्या पूर्ण करता येतील.

मिथुन-सर्जनशील कामांना चालना मिळेल. कलाकार, लेखकांसाठी प्रेरणादायी दिवस. आध्यात्मिक दृष्टिकोन वाढेल. एखादी मौल्यवान वस्तू किंवा भेट मिळू शकते.

कर्क-आर्थिक व्यवहार वेगाने पूर्ण होतील. कुटुंबातील कार्यक्रमात सहभाग घ्याल. परंपरा आणि संस्कृतीला महत्त्व देण्याची संधी मिळेल. वेळचे  व्यवस्थापन गरजेचे आहे.

सिंह-गुंतवणुकीसाठी शुभ दिवस. शेअर बाजार किंवा मालमत्तेतील व्यवहार फायदेशीर ठरतील. एखाद्या जुना परिचय प्रेमात बदलू शकतो. विवाहयोग्यांसाठी शुभ संकेत.

कन्या-नेहमीपेक्षा वेगळ्या कामात गुंताल. नवीन लोकांशी ओळख होईल जी भविष्यात फायदेशीर ठरेल. वाहनसुख मिळण्याची शक्यता. अचानक कार्यक्रम बदलू शकतो.

तुळ-आर्थिक उलाढाल वाढेल. प्रगतीचा वेग स्थिर राहील. प्रिय व्यक्तीशी संवाद वाढेल. लहान प्रवास आनंददायी ठरेल.

वृश्चिक-ग्रहमान अनुकूल आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. शिवपूजेने मानसिक समाधान मिळेल. राजकीय किंवा विवादास्पद गोष्टींपासून अंतर ठेवा.

धनु-चंद्र, शुक्र आणि शनीचा शुभ योग लाभदायी ठरेल. दूरचे प्रवास यशस्वी होतील. भौतिक सुखात वाढ होईल. नव्या कल्पनांना गती मिळेल.

मकर-तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. कुटुंबात आपलेपणा वाढेल. एखादे कौशल्ये लोकांसमोर मांडण्याची संधी. इतरांच्या भावनांचा आदर करा.

कुंभ-सर्व क्षेत्रात प्रगती साधाल. जोडीदाराची साथ लाभदायी ठरेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. मानसिक ऊर्जा वाढेल.

मीन-नोकरीत बढती किंवा व्यवसायात नवीन करार होऊ शकतो. जुनी प्रतीक्षा संपेल. नवीन संधी हातात घेण्यासाठी योग्य वेळ.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!