आजचे राशिभविष्य – शनिवार, २ ऑगस्ट २०२५
२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक ,Marathi Rashi Bhavishya
🗓 श्रावण शुक्ल अष्टमी/नवमी | शके १९४७, संवत २०८१ | नक्षत्र – विशाखा
📍 राहुकाळ: सकाळी ९.०० ते १०.३०
⚠️ आज वर्ज्य दिवस आहे
⚖️ आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ.
Marathi Rashi Bhavishya
🔥 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
शत्रूंचा पराभव होईल. कठोर निर्णय घ्याल. कोर्टाच्या कामात यश. आवडती व्यक्ती भेटेल.
💰 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
सकारात्मक घडामोडी. आर्थिक लाभ, व्यापार वृद्धिंगत होईल. समाधानदायक भेटी मिळतील.
🌈 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा):
उत्तम दिवस. अचानक धनलाभ, प्रेमात यश, मुलांकडून आनंद मिळेल.
🚗 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
व्यवसायात प्रगती. वाहन सुख. जमीन व्यवहार लाभदायक. मोठे निर्णय टाळा.
🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
अधिकार वाढतील. शत्रूपासून सावध राहा. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल.
💼 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
उत्साही दिवस. वेगवान प्रगती. पैशांची तजवीज. जोडीदाराची समजूत घ्या.
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
मन आनंदी. सावध राहा, फसवणूक होऊ शकते. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
व्यय जास्त. योजना बदलू शकते. सहकारी त्रासदायक ठरतील. संयम ठेवा.
🎯 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
अनुकूल दिवस. नवीन संधी. नव्या ओळखी. प्रेमात यश मिळेल.
🏆 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
कामाचा ताण पण नफा वाढेल. औषधांपासून सावध. घशाची काळजी घ्या.
💡 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
नवीन संधी मिळतील. आर्थिक उलाढाल चांगली. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.
🌊 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
मिश्र परिणाम. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जुने प्रश्न सुटतील.
२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्यात प्रगल्भ कल्पनाशक्ती आहे. तुम्ही योग्य तर्हेने विचार करणारे, निस्वार्थी असून इतरांच्या भावनांची कदर करतात. कोणत्याही कामातील उद्दीष्ट न विसरता त्यातील सर्व बारीक सारीक गोष्टी तुम्ही त्यात उतरवतात. तुम्ही उत्तम सहकारी असतात. तुम्ही शास्त्रशुद्ध, व्यवस्थित आणि टापटीप असतात. तुम्ही स्वप्नाळू आणि एकांतात रमणारे आहात. तुमच्यात प्रतिष्ठा, मोठपण, कल्पकता, अधिकार या गोष्टी असतात. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. व्यवसायात तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. रंगमंच, सिनेमा, सहली यांचे तुम्हाला आकर्षण असते. तुमच्यात उत्स्फूर्त आणि उपजत कला असतात. तुमच्या वागण्यात रुबाब असतो. तुम्हाला भरपूर मित्र असतात आणि स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होतो. तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्धीस येतात. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला ध्यास असतो. तुम्ही प्रेमळ आणि दयाळू आहात. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि उच्च ध्येयवादअसतो. इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण असते. समारंभात तुम्हाला मानाचा स्थान असते. सूक्ष्म आणि गूढ बाबींकडे तुमचा ओढा असतो.
मनाची सूक्ष्म शक्ती तुमच्याजवळ असते. पुढे घडणाऱ्या घटना अनेकदा तुमहाला आधीच समजतात. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला समाजापासून एकटे राहणे आणि स्वप्नात रंगणे आवडते. तुमच्यावर प्रतिष्ठा, कल्पकता आणि अधिकार असतो. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. कोणत्याही व्यवसाय मध्ये तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. तुम्हाला थिएटर्स, सहली, प्रवास, सिनेमा, भ्रमंती यांची आवड असते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात.
व्यवसाय:- संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, ज्योतिषी, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, बँकिंग, सर्जरी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, बिस्किटी.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
तुमच्या जन्मतारीखेनुसार वैयक्तिक कुंडली विश्लेषण, जोडीदाराचे स्वभाव, भाग्योदय, आजाराची शक्यता, उपाय योजना, रत्ने याची माहिती हवी असल्यास संपर्क करा:
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

[…] […]
[…] शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यावर मंगळ ग्रहाचा अंमल असल्यामुळे तुमच्यात आक्रमकता, […]