आजचे राशिभविष्य शनिवार, २७ डिसेंबर २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

पौष शुक्ल सप्तमी/अष्टमी.

विश्वावसुनाम संवत्सर.

शके १९४७, संवत २०८२.

हेमंत ऋतू.

राहुकाळ सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

आज वर्ज्य दिवस आहे” (व्यतिपात योग, विष्टी करण शांती आवश्यक)

नक्षत्र पूर्वा भाद्रपदा / उत्तराभाद्रपदा.

चंद्र मीन राशीत.

ग्रहयोग रवी केंद्र चंद्र, चंद्र केंद्र मंगळ, चंद्र केंद्र शुक्र, चंद्र लाभ हर्षल. (Marathi Rashi Bhavishya)

🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) –संमिश्र दिवस आहे. चंद्र केंद्र मंगळ असल्याने उत्साह वाढेल; मात्र उतावळेपणा टाळावा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक सहकार्य लाभेल.

🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-अनुकूल ग्रहमान आहे. चंद्र लाभ हर्षल योगामुळे अचानक लाभ संभवतो. नोकरी-व्यवसायात प्रगती दिसेल. मात्र व्यतिपात योगामुळे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकळलेले बरे.

👥 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) –खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग येतील. मन अस्थिर राहील. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. संध्याकाळनंतर मानसिक शांतता लाभेल.

🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) –आज लाभदायक योग आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. चंद्र केंद्र शुक्र असल्याने सौख्य, आनंद व कौटुंबिक समाधान लाभेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) –संमिश्र दिवस आहे. सूर्य केंद्र चंद्र योगामुळे आत्मविश्वास वाढेल; मात्र अहंकार टाळावा. वरिष्ठांशी संयमाने वागा. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील.

🌾 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-दिवसाची सुरुवात थोडी तणावपूर्ण असू शकते. दुपारनंतर अनुकूलता वाढेल. प्रवासातून लाभ संभवतो. व्यतिपात योगामुळे आरोग्याकडे लक्ष द्या.

⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) –आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. चंद्र केंद्र शुक्र योगामुळे कला, सौंदर्य, प्रेम विषय अनुकूल राहतील. मात्र अति विश्वास टाळावा.

🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)-उत्कृष्ट दिवस आहे. धनलाभ व कौटुंबिक समाधान मिळेल. नोकरीत जबाबदारी वाढेल. सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल.

🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामाचा ताण जाणवेल. मात्र चंद्र लाभ हर्षल योगामुळे अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा.

🐐 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) –आनंदी दिवस आहे. मित्र-परिवारातून लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन योजना आखण्यासाठी योग्य काळ नाही.

🌊 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)- घरगुती बाबींमध्ये वेळ द्यावा लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. संयम ठेवा. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल.

🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-चंद्र तुमच्या राशीत असल्याने महत्त्वाचा दिवस आहे. प्रश्नांची उत्तरे मिळतील. कामे मार्गी लागतील. मात्र व्यतिपात योगामुळे भावनिक निर्णय टाळा. आरोग्य सांभाळा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!