आजचे राशिभविष्य शनिवार, ९ ऑगस्ट २०२५
९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.(Marathi Rashi Bhavishya)
श्रावण पौर्णिमा/कृष्ण प्रतिपदा. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” *रक्षाबंधन, शुक्ल यजु: हिरण्यकेशी तैत्तिरीय श्रावणी.*
नक्षत्र: श्रवण/धनिष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी– मकर.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आहे. तुम्हाला राजकारणात रस असू शकतो. आज त्याबाबत काही महत्वाच्या बैठकी होऊ शकतात. आरोग्याच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष नको. अन्यथा त्याचा दीर्घकाळ त्रास होऊ शकतो. व्यसने टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सुरक्षिततेला आज अधिक महत्व येईन. लहान सहान बाबींमुळे निराश होऊ नका. कामानिमित्त प्रवास घडू शकतात. अनपेक्षित लाभ संभवतात. आज केलेल्या कष्टाचे फळ मिळण्यास विलंब लागू शकतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. तुमच्याकडे बुद्धी चातुर्य आहे. शब्दांचे भांडार आहे. मानसिकतेचा अभ्यास आहे. आज त्याचा योग्य वापर करा. कमी बोलून पण कामे होऊ शकतात याचा आज प्रत्यय येईल. उधारी टाळा. आज कर्जे घेऊ नका.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्या राशीतील रवीशी सप्तम स्थानातून चंद्राचा प्रतियोग आहे. अर्थातच आज अनुकूलता नाही. भावना आणि कर्तव्य यात तुमची मनस्थिती दोलयमान होईल. नात्यात गैरसमज संभवतात. प्रवासात काही अडचणी येऊ शकतात. पाण्यापासून काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यावसायिक लाभाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे मात्र अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. किंवा लाभ मिळण्यासाठी विलंब लागेल. अष्टम शनिशी मंगळाची प्रतियुती आहे. जिभेमध्ये हाड नसते मात्र जिभेत अनेक हाडे तोडून घेण्याची क्षमता असते याचा आज प्रत्यय येईल. शब्द जपून वापरा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पंचम चंद्र आहे. काही अनुकूल घटना घडतील. तसे तुम्ही मान सन्मान यांची पर्वा करत नाहीत. त्यामुळे आज अनुकूल रवीचा फारसा आशादायक परिणाम दिसून येणार नाही. तुमच्या राशीतील मंगळ तुम्हाला क्रोधायमान करू शकतो. मात्र हा प्रयोग वैवाहिक जोडीदारावर करू नका.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज तुमचा ओढा घराकडे असणार आहे मात्र त्याचवेळी नोकरीत कामाचा अतिरिक्त ताण असणार आहे. त्यामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे. नात्यातील व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तिसरा चंद्र आहे. नवीन संधी चालून येतील. आयुष्य एका वेगळ्या वळणावर आल्याचा अनुभव येईल. काहीतरी नवीन घडावे असे वाटेल. मात्र यासाठी ही योग्य वेळ नाही. संयम ठेवावा लागेल. मंगळाच्या अनुकूलतेचा आजफारसा लाभ मिळणार नाही. चुकीच्या मित्रांपासून सावध रहा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्यासाठी कुटुंब हेच सर्वकाही आहे. मात्र आज एखाद्या कौटुंबिक कलहास सामोरे जावे लागू शकते. अष्टम रवी आरोग्याच्या चिंता निर्माण करू शकतो. आज मोठी गुंतवणूक नको. विहीर, पाणी यांसंबंधीत कामात विशेष लक्ष घालावे लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. नेहमीची कामे सुरू ठेवा. व्यवसायात सावध पणा ठेवा. प्रतिस्पर्धी वरचढ ठरू शकतात. अनोळखी इसमावर फार जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा नुकसान होऊ शकते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. षष्ठ स्थानी रवी आहे. आरोग्याच्या प्रश्नावर खर्च करावा लागू शकतो. जुनाट आजाराकडे दुर्लक्ष करू नका. साडेसातीचा प्रभाव आज विशेष जाणवेल. अष्टमात मंगळ आहे. वाहन जपून चालवा. पाण्यापासून काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. उत्साही वाटेल. मेजवानी मिळेल. सहलीचे बेत आखले जातील. मात्र ऐनवेळी नियोजन बदलेल. मत्सरत्रास जाणवेल. कोर्टात अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. औषधें घेताना काळजीपूर्वक तपासून घ्या.
९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर मंगळ, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यावर मंगळ ग्रहाचा अंमल असल्यामुळे तुमच्यात आक्रमकता, प्रतिकार, धाडस, तत्परता असते. तुम्ही लढाऊ वृत्तीचे असतात. तुम्ही ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबत नाही, पराभव ही गोष्ट तुम्हाला मान्य नसते. शक्यतो दुसऱ्यावर टीका करू नये शब्द काळजीपूर्वक वापरावे. मनाने विशाल असून तुम्हाला मानवी जीवनाची उत्तम जाण असते. कोणत्याही समाजात मिसळण्याची वृत्ती, हरहुन्नरीपणा यामुळे इतरांना तुम्ही प्रिय असतात. इतरांना उत्साह जोम या गोष्टी देणे हे तुमचे आयुष्यातील कार्य असते. तुमचा स्वभाव तापट आहे. पण तुम्ही धाडसी असतात. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची, दोन हात करण्याची कुवत तुमच्याकडे असते. खेळाची व शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असते. भांडण सारख्या गोष्टींची भीती वाटत नाही. मित्रांबद्दल आदर असून वेळप्रसंगी त्यांच्यासाठी लढता. दुबळ्या लोकांबद्दल दया व आदर असतो. प्रवास खूप करतात. त्यामुळे सहनशीलता व आपलेपणा निर्माण होतो दृष्टिकोन विशाल होतो. सभोवतालच्या लोकांपेक्षा तुमचे विचार फार पुढे गेलेले असतात त्यामुळे इतर लोक तुमच्या सल्ला घेतात .मित्र नातेवाईकांना मदत पैशाची मदत करण्यापूर्वी विचारपूर्वक करावी. पैशाच्या बाबतीत नशीबवान असून सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो. खर्चिक वृत्ती असून प्रिय लोकांसाठी खर्च करताना मागेपुढे पाहत नाही. महत्त्वकांक्षी माणसाची तुम्ही उत्तम पत्नी होऊ शकतात. विनोदी स्वभाव व कौशल्य असल्याने सार्वजनिक जीवनात यशस्वी होता. घर उत्तम सांभाळतात. उत्साहाने पतीला चांगली साथ देऊ शकता. सहनशीलता ,स्वार्थ त्याग हे तुमची वैशिष्ट्य आहे.
शुभ दिवस:– सोमवार मंगळवार ,गुरुवार ,शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा शुभ्र, तांबडा ,पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज ,मोती माणिक.
(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका तपासून घ्या)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
