
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन कृष्ण दशमी/एकादशी. विश्वावसूनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस आहे.”
नक्षत्र:- उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु / (सकाळी ९.३३ नंतर) मकर.(वरीया योग / विष्टी करण शांती करून घेणे)
विशेष ग्रहयोग :-रवी लाभ चंद्र,
चंद्र लाभ शनी,
चंद्र त्रिकोण हर्षल,
चंद्र लाभ नेपच्यून.
१४ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही दिसायला आकर्षक आणि देखणे आहात. मनमिळाऊ स्वभाव, परोपकारी वृत्ती आहे. मितभाषी आहात. न बोलता काम करण्याकडे तुमचा कल असतो. तुमचे निरीक्षण चांगले असते. तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या विचारांवर तुम्ही ठाम असतात. तुम्हाला कोडी सोडवणे, शब्दकोडी यांचा नाद असतो. जुगारापासून तुम्ही दूरराहिले पाहिजे. लहान वयात एखादे प्रेम प्रकरण होण्याची शक्यता असली तरी एकंदरीत तुमचे वैवाहिक जीवन सुखी असते. घरातील लोकांकडून तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो. तुम्ही यशस्वी उद्योजक होतात.
शुभ रंग – पिवळा
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) ग्रहमान अनुकूल आहे. मित्रांची मदत मिळेल. एखादे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. सामाजिक कामात सहभाग वाढेल. आर्थिक बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबात एखाद्या विषयावर चर्चा किंवा मतभेद होऊ शकतात. संयम ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) प्रवासाचे योग आहेत. नवीन माहिती किंवा ज्ञान मिळेल. मित्रपरिवार वाढेल. खर्च मात्र वाढण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना घाई करू नका.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण टाळण्यासाठी विश्रांती घ्या.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) आज चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय किंवा नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील. जोडीदाराची साथ लाभेल. मात्र अहंकार टाळणे आवश्यक आहे.
कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामात प्रगती होईल. संशोधन, अभ्यास आणि नियोजन यामध्ये यश मिळेल. नवीन योजना आखण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज मन थोडे अस्थिर राहू शकते. निर्णय घेताना संभ्रम निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. शांत राहून काम करा.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मित्रांची मदत मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्रांच्या सहकार्याने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) काही अडथळे जाणवू शकतात. कामात विलंब होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. संयम आणि शिस्त पाळल्यास परिस्थिती सुधारेल.
कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) मित्र आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन योजना तयार होतील. आर्थिक बाबतीत काही लाभ होण्याची शक्यता आहे.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) कामात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे असेल. संयमाने काम केल्यास चांगले यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


