आजचे राशिभविष्य शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५
१८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण द्वादशी विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
चंद्र राशी – सिंह/कन्या
नक्षत्र – पूर्वा/उत्तराफाल्गुनी.
आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस. *शनी प्रदोष, गुरू द्वादशी, धन त्रयोदशी.*
१८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य, सुसंस्कृत आणि मोठ्या मनाचे आहात. तुम्ही मित्रांशी प्रामाणिक असतात. तुम्ही एक विश्वासू आणि जबाबदार नागरिक असतात. वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव, स्वातंत्रपणा, मान सन्मान ही तुमची वैशिष्टये आहेत. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार, कार्यक्षम आणि लढावृ वृत्तीचे आहात. इतरांची कुरापत काढणे तुम्हाला आवडते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून स्वतःच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती असते. तसेच स्वकर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. तुम्ही संभाषणचतुर असतात. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतात. सहसा तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळांची आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. दुर्बल लोकांना वर दया करण्यात तुम्हाला एक सुप्त आनंद मिळतो. आजारी लोकांना बरे करण्याची तुमच्यामध्ये शक्ती असते. तुम्ही तापट असला तरी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःवर ताबा ठेवू शकतात. तुमचे विचार तुम्ही ठामपणे मांडतात आणि तुमच्या मध्ये धैर्य असते.
व्यवसाय:- हॉटेल, बेकरी, संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृह सजावट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजिनिअर, बांधकाम क्षेत्र मिल्ट्री, पोलीस, गुप्तहेर.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:दिवसभर कार्यक्षेत्रात गती राहील. नवीन कामात उत्साहाने पुढे जा. आर्थिक फायदा संभवतो. आरोग्य उत्तम.
वृषभ:कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेले राहाल, पण समाधानही मिळेल. खर्च वाढेल. प्रवास शक्य. शुभ रंग — गुलाबी.
मिथुन:मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य. महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. संध्याकाळी आनंददायी प्रसंग संभवतो.
कर्क:कार्यसिद्धीसाठी आजचा दिवस अनुकूल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आरोग्य ठीक राहील.
सिंह:सामाजिक वर्तुळात सन्मान वाढेल. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. प्रवास यशदायी. आत्मविश्वासात भर पडेल.
कन्या:आज मन थोडं विचलित राहू शकतं. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. दुपारनंतर चांगली बातमी मिळेल.
तुळ:प्रेमसंबंध दृढ होतील. कौटुंबिक विषयात आनंद. आर्थिक व्यवहार लाभदायक. आरोग्य सुधारेल. शुभ रंग — पांढरा.
वृश्चिक:आज तुमचं आकर्षण आणि प्रभाव वाढेल. कामात नवीन दिशा मिळेल. धार्मिक विचारांना चालना मिळेल.
धनु:विद्यार्थ्यांना उत्तम यशाची शक्यता. आर्थिक दृष्ट्या दिवस स्थिर. प्रवास सुखद. नात्यांमध्ये गोडवा वाढेल.
मकर:काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. कामातील ताण वाढेल पण यश मिळेल. संयम ठेवा.
कुंभ:सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल. कला, लेखन, आणि अध्यापन क्षेत्रातील लोकांसाठी शुभ दिवस. संध्याकाळी शांतता लाभेल.
मीन:मन प्रसन्न राहील. घरात शुभ प्रसंग. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत.
आजचा उपाय:
शनिवारी पीपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि “ॐ शं शनैश्चराय नमः” हा मंत्र जपा — तणाव कमी होईल आणि कार्यसिद्धी होईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य शनिवार, १८ ऑक्टोबर २०… […]
[…] आजचे राशिभविष्य शनिवार, १८ ऑक्टोबर २०… […]