आजचे राशिभविष्य शनिवार, ६ सप्टेंबर २०२५
६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल चतुर्दशी. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” *अनंत चतुर्दशी*
नक्षत्र: धनिष्ठा/शततारका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर/(सकाळी ११.२२ नंतर) कुंभ. (अतिगंड योग शांती)
६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर शुक्र आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही एक बुद्धिमान कलाकार असतात. तुमच्या कलेचा तुम्ही व्यवसायिक दृष्ट्या पूर्ण वापर करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते आणि त्याचा उपयोग व्यवसायात होतो. तुमचा सहवास इतरांना सुखावतो. नीती आणि अनिती याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळ्या असतात त्यामुळे इतरांना त्या समजत नाहीत. तुम्ही जुन्या परंपरा पाळत नाहीत. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक आणि भौतिक सुखाने पूर्ण असते. उत्तम कपडे, सुगंधीत द्रव्य आणि महागड्या गाड्यांची तुम्हाला आवड असते. प्रेमात तुम्ही संशयी असतात.
व्यवसाय:- संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, बेकरी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकिंग, मेडिकल स्टोअर्स, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:– सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:- पाच मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज चंद्राचा हर्षल शी केंद्र योग आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. धर्मकार्य कर्णयचा इच्छा जागृत होईल. वक्तृत्व चमकेल. मात्र कोणालाही शब्द देताना विचारपूर्वक द्या. आरोग्य जपा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आज नाईलाजाने प्रवास करावा लागेल. मनाचा उतावीळ पणा वाढेल. त्यामुळे एखादा चुकीचा निर्णय होऊ शकतो. प्रवासात त्रास संभवतो. संयम बाळगा.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. चंचलता वाढेल. व्यय स्थानातील हर्षल विनाकारण खर्च वाढवू शकतो. एखादी मन अस्वस्थ करणारी बातमी समजू शकते.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सप्तम स्थानातून चंद्राचा अनुकूल हर्षलशी केंद्र योग आहे. अर्थातच आज फारशी अनुकूलता नाही. नात्यात गैरसमज संभवतात. प्रवासात काही अडचणी येऊ शकतात. पाण्यापासून काळजी घ्या. एखादा सुखद समाचार येऊ शकतो.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यावसायिक लाभाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे मात्र अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. किंवा लाभ मिळण्यासाठी विलंब लागेल. तुमची इच्छा नसली तरीही आज नोकरीसाठी कामावर जावे लागू शकते. तेथे हातून काहीचुका होऊ शकतात.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पंचम चंद्र आहे. काही अनुकूल घटना घडतील. तुमच्या राशीतील मंगळ तुम्हाला क्रोधायमान करू शकतो. हातून देवाचे काम होऊ शकते मात्र त्यात काही चूक होऊ देऊ नका.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरीत कामाचा अतिरिक्त ताण असणार आहे. त्यामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे. नात्यातील व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. अष्टम हर्षल अनुकूल नाही. कार्यतत्परता वाढवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तिसरा चंद्र आहे. नवीन संधी चालून येतील. काहीतरी नवीन घडावे असे वाटेल. मात्र यासाठी ही योग्य वेळ नाही. संयम ठेवावा लागेल. मित्र, सहकारी यांचे सहकार्य मिळणार नाही. भागीदारी व्यवसायात शोक मिळण्याची शक्यता आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज परंपरा पाळणे आणि आरोग्याचे प्रश्न यांच्यात तुम्ही गुरफटून जाल. त्यामुळे विनाकारण गोंधळ वाढू शकतो. घरात विनाकारण कलह होऊ शकतो. परिस्थिती शांतपणे हाताळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. नेहमीची कामे सुरू ठेवा. व्यवसायात सावध पणा ठेवा. निव्वळ नशिबावर अवलंबून राहू नका. अंदाज चुकू शकतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळी व्यय स्थानी चंद्र आहे. चतुर्थ हर्षल आहे. जुनाट आजाराकडे दुर्लक्ष करू नका. साडेसातीचा प्रभाव आज विशेष जाणवेल. गृहकलह टाळा. दुपार नंतर काहीशी अनुकूलता वाढेल. मात्र तरीही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. उत्साही वाटेल. मेजवानी मिळेल. सहलीचे बेत आखले जातील. मात्र हातून काही मोठ्या चुका होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक शांतता धोक्यात येईल असे वागू नका.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य शनिवार, ६ सप्टेंबर २०… […]