ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
श्रावण कृष्ण प्रतिपदा/द्वितीया. वर्षा ऋतू. क्रोधीनाम संवत्सर
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – धनिष्ठा/ (दुपारी १.५३ नंतर) शततारका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अकरावा चंद्र अनुकूल आहे. मात्र हर्षलशी केंद्र योग आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. अनपेक्षित लाभ होतील. मात्र अनैतिक कामे केल्यास मोठा फटका बसेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. चंद्र- हर्षल केंद्र योग आहे. विचारपूर्वक कामे करा. चोरीचे भय आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नवम स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. शेतीतून लाभ होतील. मात्र फळ मिळण्यास विलंब जाणवेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. अष्टमस्थानी चंद्र आहे. अचानक लाभ होतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी आहे. आरोग्य सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नोकरीत उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. मात्र कनिष्ठ सहकार्याकडून अडचणी येऊ शकतात. सामाजिक जबाबदाऱ्या पार पडाल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सिद्धी प्राप्त होतील. कुलदेवतेची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. नात्यात गैरसमज टाळा. प्रवासात त्रास होऊ शकतो.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. धाडस कराल. आर्थिक लाभ होतील. बोलताना काळजी घ्या. अपघाताचे भय आहे. वाहन चालवताना कळजी घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चतुर्थ चंद्र आहे. दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आर्थिक भरभराट होईल. भागीदारी व्यवसायात मतभेद संभवतात. पत्नीशी वादविवाद होऊ शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक यश मिळेल. मेजवानी मिळेल. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. मात्र मौल्यवान वस्तू नादुरुस्त होऊ शकते.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कला प्रांतात उत्तम यश लाभेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून लाभ होतील. बोलण्यास मान मिळेल. खरेदी करताना काळजी घ्या. फसवणूक होऊ शकते. प्रेमात अपयश संभवते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत आज चंद्र आहे. प्रवास घडतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. प्रवासाचा शीण जाणवेल. बागेत फिरताना काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. त्याचा हर्षलशी अशुभ योग आहे. कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. प्रवासाचे नियोजन चुकेल.
१० ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तुमच्या ज्ञानामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे इतरांवर तुमची छाप पडते. नातेवाईकांपासून तुम्हाला फायदा होतो. वयाच्या ४६ पासून तुम्हाला यश मिळते. तुम्ही मोठ्या पदावर असतात. व्यावसायिक यश देखील तुमहाल लाभते. तुमच्यात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असतो. तुमच्या विचारशक्ती मुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळते. तुम्ही सशक्त असतात. तुम्हाला इतरांकडून फारशी मदत मिळत नाही. कल्पकता, चपळता, हुशारी हे गुण तुमच्यात उपजतच आहेत. तुम्ही निसर्गाशी सहज एकरूप होतात. जीवनाचा आनंद उपभोगतात. स्वभाव काहीसा शंकेखोर आहे. निर्णय घेण्यास उशीर लागतो. सामाजिक कामाची तुम्हाला आवड असली तरी जीवनात तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एक नैसर्गिक कलाकार असून स्वभाव हरहुन्नरी आहे. तुम्हाला कोणत्याही विषयाचे चटकन आकलन होते. तुम्ही सभा गाजवू शकतात. तुम्हाला नातेवाईकांमुळे त्रास होऊ शकतो आणि एखाद्या आजारी माणसाची जबाबदारी तुमच्यावर पडते. तुम्ही सुखी, तेजस्वी , साहसवादी आणि ध्येयवादी आहात. तुमच्यात संशोधन करण्याची शक्ती आहे. तुमचा मानसशास्त्राचा अभ्यास चांगला असतो. गूढ गोष्टींची आवड असते. त
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, मंगळवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.
शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
