ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
📅 तिथी – श्रावण कृष्ण नवमी/दशमी
🌌 नक्षत्र – रोहिणी
🪐 संवत्सर – विश्वावसु
🌞 ऋतू – वर्षा, दक्षिणायन
⏰ राहुकाल – दुपारी ४:३० ते संध्याकाळी ६:००
✨ आजचा दिवस – “चांगला दिवस आहे”
👶 आज जन्मलेली बाळाची रास – वृषभ (व्याघ्यात योग – शांती)
Marathi Rashi Bhavishya
🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्र-मंगळ-बुधाचा उत्तम योग आहे. रखडलेली घरगुती कामे पूर्ण होतील. थोडी भ्रमंती घडेल. स्पष्टवक्तेपणा वाढेल. वाहन काळजीपूर्वक चालवा.
🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
स्वतःच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चैनीसाठी खर्च होईल. कलाकारांना संधी, लेखकांना उत्तम दिवस. वाहनसुख लाभेल. छोटे प्रवास होतील.
👬 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
व्यय स्थानी चंद्र आहे. फारसे अनुकूल नाही. घरातच सुटीचा आनंद घ्या. चर्चेत भाग घ्याल. तुमची छाप चांगली पडेल. कारखाने व रसायन क्षेत्रातील लोकांना फायदा.
🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
ग्रहमान अनुकूल. आत्मविश्वास व उत्साह वाढेल. प्रेमळ स्वभावाचा फायदा होईल. जुनी ओळख उपयोगी पडेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.
🦁 सिंह (मा, मी, मु, मे, मो, टा, टी, टू, टे)
कामाच्या ठिकाणी अनुभव वाढतील. नेतृत्व सिद्ध कराल. राजकारणात प्रगतीचे योग. अचानक लाभ होईल. इच्छापूर्ती घडेल. रत्ने खरेदीची संधी.
👧 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
नवमस्थानी चंद्र आहे. आर्थिक आवक वाढेल. सन्मान मिळतील. काही सुखद अनुभव येतील. कठोर भूमिका घ्यावी लागेल. अचानक लाभाचे योग.
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
संमिश्र ग्रहमान. अष्टम स्थानी चंद्र असल्याने सावधपणे पावले टाका. कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. वरिष्ठ आनंदी राहतील. प्रवासाचे योग.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
सप्तमस्थानी चंद्र आहे. प्रगती साध्य होईल. छोटी सहल होईल. गोरगरिबांना मदत कराल. मंगळाचा अनुकूल प्रभाव लाभदायी ठरेल.
🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
व्यवसायात लाभाचे योग. छोटे प्रवास होतील. संवाद सकारात्मक राहतील. जमीन व्यवहार पुढे सरकतील. मात्र सूर्य अष्टमस्थानी – आरोग्य जपा. सूर्य उपासना उपयोगी.
🐊 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
व्यवसाय वाढीसाठी चांगला दिवस. अन्नधान्य लाभेल. लॉटरी योग. दानधर्म घडेल. व्यापार वाढेल. स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य दिवस.
🏺 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
संमिश्र दिवस. द्विधा मनस्थिती राहील. घराकडे ओढा राहील. ज्ञान व अधिकाराचा लाभ होईल. शत्रूभय थोडेसे जाणवेल.
🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
व्यवसायवाढीसाठी ग्रहमान अनुकूल. नियोजनाप्रमाणे कामे होतील. सौख्य लाभेल. सहलीचा आनंद. निसर्गात वेळ घालवाल. जुने वाद मिटतील.
१७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शनी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे विचार विधायक आणि क्रियाशील असतात. हिप्नॉटिझम, गूढ विद्या यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही धाडसी, प्रभावी आणि बुद्धिमान आहात. संशोधन, ज्ञान याबद्दल तुम्हाला आवड आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. उथळ संगीतापेक्षा गंभीर संगीत तुम्हाला आवडते. तुम्ही कडक शिस्तीचे भोक्ते आहात आणि कर्तबगार आहात. तुम्हाला शांतता आणि एकांत आवडतो. निसर्ग, फुले, रम्य देखावा, याची तुम्हाला ओढ असते. तुम्ही कधी कधी अति निराशावादी होतात. समाजापासून दूर राहणे पसंत करतात. भविष्याबद्दल तुम्हाला नेहमीच काळजी वाटत असते. तुम्ही अत्यंत धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तसेच महत्त्वाकांक्षी आणि दिर्घउद्योगी देखील आहात मात्र अति महत्त्वाकांक्षा असता कामा नये. तुम्हाला जी गोष्ट हवी असते त्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेतात. तुमच्यामध्ये चिवटपणा आहे मात्र त्याचबरोबर संशय वृत्ती देखील असते. तुम्ही अधिकार गाजवणारे आहात. अनेकदा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला जातो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल आपुलकी असते. तुम्ही न्याय प्रेमी आणि कायदा प्रेमी आहात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये सतत अडचणी आणि विलंब य
व्यवसाय:- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, उच्च गणित, कोळसा, लाकूड, लोखंड, व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, मोती आणि हिरा.
रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
