ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल अष्टमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे” *दुर्गाष्टमी, गौरी आवाहन*
नक्षत्र: अनुराधा/ (संध्याकाळी ५.२७ नंतर) ज्येष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृश्चिक. (वैधरुती, विष्टी शांती)
३१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर हर्षल, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव आटोपशीर आहे. आयुष्यात यश आणि कीर्ती झटपट मिळावी अशी अपेक्षा असते. आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. दृष्टीकोन व्यावहारिक असतो. इच्छाशक्ती तीव्र असते. धर्मादाय संस्था, अपंग संस्था यांसाठी काम करणे आवडते. भिन्न लिंगीव्यक्तीबद्दल जबरदस्त आकर्षण असते. स्वतःच्या कल्पना इतरांच्या मदतीने प्रत्यक्षात आणण्यात तुमचा हातखंडा असतो. तुमची शरीरयष्टी उंच असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरताअसते आणि काही वेळेस अकल्पनिय वागणे असते. भिन्न लिंगी व्यक्तींपासून तुम्हला फायदा होतो. कौटुंबिक जीवन सुखाचे असते. आयुष्यातील ४० नंतर भाग्योदय होतो. पूर्वार्ध कष्टाचा असतो. प्रेमात अनेक अडथळे येतात. आयुष्यात काही असाधारण घटना घडू शकतात. जीवनात अनेक बदल घडतात मित्र, मैत्रिणी देखील बदलत राहतात. स्वभाव चिकित्सक आणि तर्कनिष्ठ आहे. शास्त्रीय पुस्तके, वाङ्मय, याची तुम्हाला आवड आहे. तुम्ही स्वभावाने गरीब दिसत असलात तरी आतून तुम्ही हट्टी असतात. विचाराने स्वतंत्र असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या राहतात असावी असे तुम्हाला वाटते. तुमच्या योजना तुम्ही काटेकोरपणे आखतात आणि त्यात तुम्ह
व्यवसाय:- यंत्रसामुग्री, विज्ञान, इलेक्ट्रिसिटी, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, संशोधन, कारखानदारी, हस्तसामुद्रिक, ज्योतिषी, अध्यात्म, बँकिंग सल्लागार.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, पांढरा, मरून.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र केंद्र रवी, लाभ मंगळ, चंद्र त्रिकोण बुध आणि शुक्र आहे. संमिश्र दिवस आहे. यश मिळेल. सन्मान होईल. गुप्तशत्रू पराभूत होतील. पाळीव पशूंचा लाभ होईल. वाहन सुख मिळेल. गृहकलह जाणवेल. सन्मान कार्यक्रम पुढे ढकलले जातील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सप्तम स्थानी चंद्र आहे. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. आज लॉटरी लागू शकते. तुमच्या समाजकार्यातून इतरांना मत्सर जाणवेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. शब्दास मान मिळेल. भौतिक सुखे प्राप्त होतील. वक्तृत्व चमकेल. भावंडांची भेट होईल. इतरांचे म्हणणे ऐकून त्यावर निर्णय घ्याल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. मनासारख्या घटना घडतील. बुद्धिमत्तेचा योग्य वापर कराल. मनाची चंचलता दूर होईल. पित्याशी मतभेद संभवतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चतुर्थ चंद्र भाग्योदय घडवून आणेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. नवीन खरेदी होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. सरकारी अधिकाऱ्यांशी अदबीने वागावे लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तृतीय स्थानी चंद्र आहे. काही चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती होईल. अनुकूल शुक्र तुम्हाला भौतिक सुखे प्रदान करेन. वाहन सुख लाभेल. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धैर्यवान आणि बलवान बनाल. आरोग्य सुधारेल. सन्मान मिळतील. कामाच्या ठिकाणी महिलांकडून सहकार्य लाभेल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. उद्यमशीलता वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाबतीत आज चांगला अनुभव येईल. नवीन संधी मिळतील. व्यवसाय वाढेल. आत्मविश्वास वाढेल. प्रवासात नवीन ओळखी होतील. कुटुंबियांच्या भावनांचा विचार करा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. काही गणिते जुळतील. व्यावसायिक संधी चालून येतील. स्त्री धन वाढेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. वाहन जपून चालवा. पित्याशी मतभेद संभवतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकूल आहे. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला शांतता लाभेल. आरोग्याचे प्रश्न सुटतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अष्टम रवीची नाराजी आहे. स्पर्धक तुमच्यावर कुरघोडी करतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दशम स्थानी चंद्र आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. कलेतून आर्थिक लाभ होतील. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही. अष्टम मंगळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवम चंद्र अनुकूल आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. वादविवादात भाग घ्याल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रवास घडतील मात्र नियोजन बदलेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
