आजचे राशीभविष्य- रविवार, २७ जुलै २०२५

२७ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये

1

🔭 ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी, नाशिक  Marathi Rashi Bhavishya
श्रावण शुक्ल तृतीया/चतुर्थी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसूनाम संवत्सर
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्रनक्षत्र – मघा / पूर्वा फाल्गुनी
आज जन्मलेल्यांची राशी – सिंह (वरीया योग, नक्षत्र गंडांत)

“आज चांगला दिवस आहे” (Marathi Rashi Bhavishya)

🔴 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
गृहकर्मे होतील. दिलेला शब्द पाळाल. सौख्य लाभेल. सहलीची शक्यता. तुमचे विचार प्रभाव टाकतील.

🟠 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
अचानक आर्थिक लाभ. येणी वसूल होतील. चविष्ट पदार्थ मिळतील. संपत्ती वृद्धीचा दिवस.

🟡 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह)
नवनवीन कल्पना सुचतील. आवडते छंद जोपासाल. मन प्रसन्न राहील. दिवस रचनात्मक.

🔵 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कौटुंबिक वातावरण आनंदी. धनलाभ होईल. वाचा प्रभावी ठरेल. इच्छित गोष्टी साध्य होतील.

🟣 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
चंद्र तुमच्या राशीत. अध्यात्मिक लाभ. मेहनतीचं चीज होईल. अनेक लाभांची शक्यता.

🟢 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
अचानक खर्च समोर येईल. महत्वाची कामे टाळा. शांतता ठेवा. जुनी कामे पूर्ण करा.

🟤 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
नवीन संधी उपलब्ध. आर्थिक लाभ. प्रवासाचे योग. शिक्षणात यश. उत्तम दिवस.

🔴 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
स्पर्धेत यश. भौतिक सुखात वाढ. कामात समाधान. आत्मविश्वास वाढेल.

🟠 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
स्वजनांचा विरोध कमी. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल.

🟡 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
संमिश्र दिवस. संयम ठेवा. संततीबाबत काळजी घ्या. वाहन हळू चालवा. आजार दूर होतील.

🔵 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
व्यवसायात वाढ. आर्थिक प्रगती. सन्मान मिळेल. संततीसंबंधित शुभवार्ता. विदेश प्रवास संभव.

🟣 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
सकारात्मक ग्रहमान. सहकार्य लाभेल. गृहकृत्यदक्ष राहाल. महिलांसाठी विशेष लाभदायक.

२७ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर मंगळ आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी आहे. अध्यात्मिक वृत्ती अवगत करावी व त्या अनुषंगाने लोकांची दुःख दूर करावी असे तुम्हाला मनातून वाटते. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते. तुम्ही भावनाप्रधान व लहरी असल्यामुळे तुमचे वागणे व विचार अनाकलनीय असतात. तुम्ही स्वातंत्र्याचे भोक्ते असून दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. स्वतःच्या मतांबद्दल दुराग्रही असू शकतात. कल्पनाशक्ती उत्तम असल्याने उत्तम दर्जाचे संगीतकार ,कलाकार, लेखक होऊ शकतात. बहुतेकदा आयुष्यात यश मिळते, परंतु घरात कटकटी चालू असतात. आक्रमकता, प्रतिकार ,धाडस तडफ ,तत्परता ही तुमची वैशिष्ट्य आहेत. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा तुम्ही उत्तम तोंड देऊ शकता. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो परंतु तुमचा उद्देश मात्र चांगला असतो. शक्यतोवर दुसऱ्यावर टीका करू नये. काळजीपूर्वक शब्द वापरावे. तुमच्या स्वभाव तापट व धाडसी आहे. खेळाची व शक्तिशाली व्यायामाचे तुम्हाला आवड असते. स्मरणशक्ती उत्तम असून नातेवाईक प्रिय असतात. झटपट पैसा मिळावा अशी अपेक्षा असते. भूतकाळात रमणारे असून कर्तृत्वाबद्दल भरमसाठ कल्पना असतात .पीडितांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. तुम्ही लहरि व चमत्कारिक असून वागण्यात अनिश्चितता असते .तुमच्या मनाची शक्ती प्रबळ असून त्यानुसार तुम्हाला गूढ अनुभव येतात .तुम्ही विचारवंत व अभ्यासू वृत्तीचे आहे असतात. तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार काळाच्या फार पुढे गेलेले असतात. त्यामुळे इतर लोक तुमच्या सल्ला घेतात. तुमच्या आवडीनिवडी ठाम असतात .तुमची तत्त्वे तुम्ही सोडत नाहीत .पैशाच्या बाबतीत एक तर तुम्ही नशीबवान तरी असता किंवा अपयशी तरी . वृत्ती खर्चिक असून आवडत्या व्यक्तीवर खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाही .आपल्या कामाबद्दल ,परिस्थितीबद्दल आणि मिळालेल्या दर्जाबद्दल तुम्ही सुखी व समाधानी असतात .परिस्थितीशी समझोता करणे तुम्हाला आवडते .तुम्ही उत्तम माता असून घरावर व मुलांवर प्रेम करतात .महत्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकता. स्वतःचा नोकरी धंदा करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता.

शुभ दिवस:- सोमवार मंगळवार ,गुरुवार ,शनिवार
शुभ रंग:- तांबडा, पिवळा पांढरा
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती माणिक.
(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)

🔔 टीप: राशीभविष्य हे सामान्य मार्गदर्शन आहे. अधिक तपशीलवार व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कुंडली परीक्षण आवश्यक आहे.

📞 संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📲 8087520521
📘 आमच्या Facebook पेजला भेट द्या

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशीभविष्य- रविवार, २७ जुलै २०२५ […]

Don`t copy text!