
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन कृष्ण पंचमी. विश्वासूनाम संवत्सर.शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.*रंगपंचमी*
नक्षत्र: स्वाती / (दुपारी १.३२ नंतर) विशाखा.(Marathi Rashi Bhavishya)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ.(ध्रुव योग शांती करून घेणे)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी त्रिकोण चंद्र आणि चंद्र त्रिकोण बुधामुळे चांगले निर्णय घ्याल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. सन्मान मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कामात प्रगती होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. वक्तृत्व चमकेल. चंद्र त्रिकोण बुधामुळे विचार स्पष्ट होतील. नवीन संपर्कातून लाभ मिळतील. भावंडांची भेट होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) चांगले अनुभव येतील. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. चंद्र त्रिकोण गुरू असल्याने भाग्याची साथ लाभेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) कामाचा वेग वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. घरात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) चंद्र अनुकूल आहे. आर्थिक लाभ मिळतील. सरकारी कामात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. वाहन सुख मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्याच राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. संशोधन आणि अभ्यासात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. खर्च वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन व्यावसायिक संधी मिळतील. मित्रपरिवारातून सहकार्य लाभेल. समाजकार्यामध्ये सहभाग वाढेल.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. जबाबदारी वाढेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) भाग्याची साथ लाभेल. प्रवासातून लाभ मिळतील. धार्मिक कार्यात मन लागेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. योग्य सल्ल्याने निर्णय घेतल्यास यश मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


