ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल त्रयोदशी. शरद ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – शततारका/ (सकाळी ८.०१) पू. भा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
५ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य तुम्ही वापरत असतात. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे.
व्यवसाय:- अकाउंट, बँकिंग, दळणवळण, वाहन विक्री, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने विक्री, कपडे, कॉस्मेटिक्स.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. लाभ स्थानी चंद्र आहे. पंचम स्थानी शुक्र आहे. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगला दिवस आहे. अर्थप्राप्ती होईल. ब्युटीक सुखे प्राप्त होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकामी मन रमेल. व्यवसाय वाढेल. मनासारखी कामे पूर्ण होतील. गृह सजावट कराल. महिलांकडून लाभ होतील. राजकीय यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवास घडतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात भाग घ्याल. संतती बाबत खुश खबर मिळेल. विज्ञान आणि गणित यात पारंगत व्हाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अष्टम स्थानी चंद्र आहे. उत्साह कमी जाणवेल. आज आळस येईल. आराम करावासा वाटेल. कलाकारांना मोठे यश प्राप्त होईल. उत्तम सहकार्य मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सप्तम स्थानी चंद्र आहे. मन उत्साही राहील. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल. आज मेजवानीचा बेत असणार आहे. अनुकूल गुरू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) षष्ठ चंद्र आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात वाढ होईल. आज साचलेली सर्व कामे पूर्ण करा. स्वतःच्या सुखासाठी खर्च कराल. खरेदी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पंचम चंद्र आहे. नवम गुरू आहे. आज धर्म कार्य केल्यास पुण्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थयात्रा घडू शकते. आवडती व्यक्ती भेटेल. मित्रांकडून लाभ होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चतुर्थ चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. अष्टम गुरुची नाराजी काहीशी कमी होईल. आर्थिक लाभ होतील. पत्नीकडून सहकार्य आणि आर्थिक लाभ संभवतात. नवीन ओळखीने फायदा होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तृतीय चंद्र आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. लक्ष्मी मातेची कृपा राहील. कनिष्ठ सहकार्यकडून लाभ होतील. हरवलेली वस्तू सापडेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) द्वितीय चंद्र आहे. आज वारसा हक्काची कामे होतील. नात्यात संवाद साधा. शेतीच्या कामातून लाभ होतील. धन धान्य वाढेल. भावंडांना नाराज करू नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. पंचम गुरू शी शुभ योग आहे. संततीकडून चांगली बातमी समजेल. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. जुन्या ओळखीतून लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही चांगले आणि सुखद घटना घडतील. खर्च वाढेल मात्र त्याचे दुःख होणार नाही. वास्तू आणि शेतीची कामे आज पूर्ण कराल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य रविवार, ५ ऑक्टोबर २०२… […]