आजचे राशिभविष्य रविवार, २८ सप्टेंबर २०२५

2

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)

अश्विन शुक्ल षष्ठी/सप्तमी. शरद ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

आज वर्ज्य दिवस आहे”

चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.

२८ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची वृत्ती स्वप्नाळू असून वृत्ती गंभीर आहे. शैक्षणिक संस्था, दवाखाने यांच्याशी तुमचा संबंध येतो. तुमच्याभावना तुम्हाला सहजपणे व्यक्त करता येत नाहीत. इतरांचा त्यामुळे गैरसमज होतो. सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. व्यावसायिक जीवनात अनपेक्षित बदल होतात. तुमचा जन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुम्हाला संशोधन करण्याची आवड असते. तुमचं स्वभाव तापट आणि हेक्त असू शकतो. स्वभाव उतावळा असल्याने प्रेमप्रकरणात अपयश येऊ शकते. तुम्हा अधिकार आणि प्रतिष्ठा मिळतात. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही इतरांची परीक्षा उत्तमपणे करू शकतात. मित्र आणि नातेवाईक यांच्या गुप्त गोष्टी तुम्ही बाहेर बोलत नाहीत. तुमचा सल्ला व्यावहारिक असतो. घराकडे फारसा ओढा नसतो. तुमच्या कामात तुम्ही अभयसू असतात. तुमचा स्वभाव धडपड्या, बढाईखोर आणि अति महत्वाकांक्षी असतो. व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला उत्तम यश मिळते. इतरांकडून तुम्हाला योग प्रतिसाद मिळत नाही. तुमची अभिरुची अत्यंत उच्च असते. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्त

व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, स्टुडिओ मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, बँकिंग, औषध, वैद्यकीय क्षेत्र, वकील.

शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.

शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. त्याचा षष्ठ स्थानातील बुधाशी शुभ योग आहे. तुमच्या अधिकाराचा योग वापर कराल. भ्रमंती घडेल. वेळेचा सदुपयोग करा. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पंचम बुध तुमहाला सौख्य प्रदान करेन. आवडत्या व्यक्तीसोबत छोटी सहल घडेल. वाहन सुख लाभेल. नवीन खरेदीचे बेत आखाल. एखादा निर्णय घाईने घेतला जाईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज तुम्हाला निसर्गात भटकण्याची आवड निर्माण होईल. शहरी क्षेत्रापासून दूर जावेसे वाटेल. व्यवसाय मात्र वाढेल. आणि त्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. तरीही तुम्ही वेळेचे योग्य नियोजन कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज फारशी अनुकूलता नाही. तुम्ही जे ठरवणार आहात त्यापेक्षा वेगळे काहीतरी घडेल. आवडत्या छंदासाठी वेळ द्याल. लेखकांना उत्तम दिवस आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्या भोवती आकर्षणाचे जाळे विणले जात आहे. त्यात अडकू नका. तुमचे वक्तृत्व आज गाजणार आहे. नवीन ओळखी होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज अनुकूल ग्रहमान आहे. तुमचा सल्ला नेहमीच प्रामाणिक आणि मोलाचा असतो. आज तुम्ही मित्रांना योग्य मार्गदशन कराल. व्यवसाय वाढीसाठी चांगले वातावरण आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कधीकधी आवडत्या गोष्टींसाठी खर्च झाला तर वाईट वाटत नाही. आज तुम्ही खर्च होऊनही आनंदी असणार आहात. तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी एखादी भेटवस्तू घ्याल. धन संपत्ती वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्या राशीत चंद्र आहे. त्याचा बुधाशी लाभ योग् आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्या कष्टाचे आज चीज होईल. तुम्ही बुद्धिमान आहात. आज त्याचा अधिक लाभ मिळेल. ऐश्वर्य लाभेल. व्यापारात वाढ होईल. सहल घडेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. आज तुमहाला मानसन्मान मिळतील. पावसात फिरण्याचा आनंद घ्याल. दक्षिण दिशेकडून लाभ होतील. परदेश गमन घडू शकते.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. चंद्र अनुकूल आहे. त्यामुळे मन उंच भरारी घेईन. कामानिमित्त प्रवास करावा लागेल मात्र आज तुमचा प्रवासाचा बेत नव्हता त्यामुळे तुम्ही काहीशी चिडचिड कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. आज तुमचा आराम करण्याचा विचार असेल मात्र आज व्यवसायात वाढ होणार आहे. अर्थप्राप्ती होईल. एखादी चांगली बातमी समजेल. सौख्य लाभेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही. काही कटू निर्णय आज घ्यावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] आजचे राशिभविष्य रविवार, २८ सप्टेंबर २… […]

  2. […] आजचे राशिभविष्य रविवार, २८ सप्टेंबर २… […]

Don`t copy text!