ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद पौर्णिमा. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्रनक्षत्र – शततारका/ पूर्वा भाद्रपदा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. (विष्टी करण शांती)
“आज खग्रास चंद्र ग्रहण आहे” *प्रोष्ठपदी पौर्णिमा, खग्रास चंद्रग्रहण*
ग्रहण वेध :- दुपारी १२.३७.
स्पर्श:- २१.५७.
संमीलन:- रात्री ११.००
मध्य:- रात्री ११.४२
मोक्ष:- रात्री १.२७
पर्व काळ:- पहाटे ३.३०
ग्रहण वेध काळात भोजन करू नये. बाकी सर्व नित्य कर्म करू शकतात. देवपूजा, तर्पण, जप, होम , दान अवश्य करावे.
> हे ग्रहण मेष, वृषभ, कन्या, धनु याना शुभ आहे.
लहान मुले, वयस्कर व्यक्ती, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी संध्याकाळी ५.१५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. रात्री ९.५७ ते १.२७ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
संदर्भ – दाते पंचांग.
७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- (Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर बुध आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही मनातून कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीचे असतात. परंपरागत रुढीन बद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. मैदानी खेळ आणि प्रवास यांची आवड असते. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगणे तुम्हाला आवडते. तुम्ही चटपटीत असून तुम्हाला आळशी पण आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि विचार तर्कशुद्ध असतात. तुमचा दूर देशाशी किंवा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकात तुम्ही तासान तास डोकं घालून बसतात. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमची वृत्ती साशंक असते आणि खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. तुमच्यामध्ये धूर्त व्यापार वृत्ती असते. तुम्ही तुमचा अहंकार जोपासतात. मनाने तुम्ही मोकळे असून कृतीत मुक्तपणा असावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांना आवर घातला पाहिजे कारण तुमच्याकडून इतरांना स्फूर्त
व्यवसाय:- दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय क्षेत्र, आयात निर्यात, परदेशाशी संबंधित व्यवसाय.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार
शुभ रंग:- पिवळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या. (Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. चंद्र अनुकूल आहे. मनासारखी कामे होतील. अनपेक्षित लाभ होतील. मात्र अनैतिक कामे केल्यास मोठा फटका बसेल. प्रवासात त्रास होऊ शकतो. तुमच्या अपत्याचा गैरसमज होऊ शकतो.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. चंद्र- रवी प्रति योग आहे. घरातील कामे आणि नोकरीचा ताण यात समन्वय साधावा लागेल. गोड बोलून कामे करून घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नवम स्थानी चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. शेतीतून लाभ होतील. इष्ट देवतेची उपासना केल्यास आज मोठे लाभ मिळतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आणि ग्रहण आहे. आरोग्य सांभाळा. महत्वाची कामे आज करू नयेत. मनावर ताबा ठेवावा. कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाल. मात्र शत्रूचा त्रास वाढणार आहे. स्वतःची गुपिते उघड करू नका. संयम ठेवा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. व्यापार वाढेल. नात्यात गैरसमज टाळा. वाहनांची योग्य निगा राखा अन्यथा आज त्याचा फटका बसू शकतो. चुकीचे निर्णय घेतले जातील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. धाडस कराल. आर्थिक लाभ होतील. बोलताना काळजी घ्या. बुध आणि रवीची अनुकूलता आज कमी अनुभवास येईन.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. बौद्धिक क्षेत्रात गोंधळाची परिस्थिती असेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. नवीन कार्याचा शुभारंभ राज करू नये.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काहीसे आर्थिक यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. मात्र मौल्यवान वस्तू नादुरुस्त होईल. प्रवासात त्रास होऊ शकतो. चोरीचे भय आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कला प्रांतात यश लाभेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल. बोलण्यास मान मिळेल. मात्र राजकीय वक्तव्य टाळा. एखादी संधी हातची जाणार आहे. सूर्य उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत आज चंद्र आहे. आणि चंद्रग्रहण आहे. प्रवास टाळा. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. प्रतिकूल बुध विनाकारण वादविवादात ओढीन. अनुकूल गुरू काही चांगल्या घटना घडवून आणेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्रग्रहण आहे. कोणत्याही भानगडीत पडू नका. पूर्वी केलेल्या चुकांची आज भरपाई करावी लागेल. आरोग्य बिघडू शकते.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
