
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
चैत्र पौर्णिमा. वसंत ऋतू. पराभव नाम सनावत्सर. शके १९४८, संवत २०८२.
“आज उत्तम दिवस आहे”
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
*हनुमान जयंती*. वैशाख स्नान आरंभ..
चंद्र नक्षत्र – हस्त / (संध्याकाळी ५.३९ नंतर) चित्रा (Marathi Rashi Bhavishya)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. (ध्रुव योग शांती)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)-षष्ठ चंद्रामुळे जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. नवीन ओळखी होतील. काही शुभ वार्ता समजतील.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)-व्यवसायात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावध रहा. संततीची काळजी घ्या.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) – चतुर्थ चंद्रामुळे बुद्धिमत्तेचा उत्तम उपयोग कराल. अडचणी सहज सुटतील. अधिकार वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) – घरगुती कामात वेळ जाईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मान-सन्मान मिळेल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) – पराक्रम वाढेल. जुने वाद मिटतील. इतरांना मदत कराल. मन एकाग्र राहील.
कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) – तुमच्या राशीत चंद्र असल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. नवीन कल्पनांना वाव मिळेल. गायक आणि कलाकार याना यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) – संमिश्र ग्रहमान आहे. समाजकार्याची संधी मिळेल. बुद्धिमत्तेचा योग्य वापर करा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) – चंद्राची अनुकूलता आहे. भरघोस यश मिळेल. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम आवश्यक आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) – चंद्र-गुरू योगामुळे लाभ होईल. नवीन संधी मिळतील. भागीदारीत यश मिळेल. वाहन सुख लाभेल.
मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) – कामात सातत्य ठेवावे लागेल. यंत्र हाताळताना काळजी घ्या. एकाग्रता वाढवा.
कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) -संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम्स स्थानी चंद्र आहे. अडचणी दूर होतील. प्रवासाचे योग आहेत. मनातील संभ्रम कमी होईल.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) – संयम ठेवावा लागेल. कामात बदल संभवतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


