आजचे राशिभविष्य गुरूवार, १४ ऑगस्ट २०२५
१४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक ,Marathi Rashi Bhavishya
श्रावण कृष्ण षष्ठी. विश्वावसुनाम संवत्सर. शके१९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे” *पतेती*
चंद्र नक्षत्र – रेवती (सकाळी ९.०६ नंतर) अश्विनी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/मेष. (नक्षत्र गंडांत, शूल योग)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी केंद्र योग्य आहे. सकाळी फारशी अनुकूलता नाही. सरकारी कामे अपूर्ण राहतील. विलंब अनुभवाल. संयम ठेवा. पाळीव पशूंपासून काळजी घ्या. वाहन दुरुस्ती संभवते.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. व्यसने नकोत. प्रेमत अपयश संभवते. लेखक, प्रकाशक यांना अडचणींना सामोरे जावे बाळगू शकते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी चालून येतील. भेटवस्तू मिळतील. शब्द वापरताना काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. भ्रमंती होईल. क्रोधास आवरावे लागेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास होतील. मात्र प्रवासाचे नियोजन काटेकोर करा. मन आनंदी राहील. अडचणी दूर होतील. खर्च मात्र वाढतील. संध्याकाळ आनंदाची.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. काही बाबतीत प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. दुपारनंतर अनुकूलता कमी असणार आहे. योग्य निर्णय घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज कामे पूर्ण करा. मोठी गुंतवणुक आज टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडतील. ग्राहकांशी संवाद साधतांना काळजी घ्या. गैरसमज होऊ शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. शत्रूला कमी लेखू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. गुप्तमाहितीची वाच्यता करू नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन उत्साही राहील. मात्र शत्रूचा त्रास जाणवेल. कोर्टात अपेक्षित यश मिळणार नाही. संयम ठेवावा लागेल. चोरीचे भय आहे. अनोळखी इसमावर विसंबून राहू नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आरोग्य राखण्यासाठी भ्रमंती घडेल. ओळखीतून कामे होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. लॉटरीत यश मिळू शकेल.
१४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला चांगले असून लोकप्रिय आहात. दुसर्यांना ‘न’ दुखवण्याचा स्वभाव आहे. इतरांना सहकार्य देण्याचा कल असतो. कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुमचे व्यक्तिमत्व धीरगंभीर असून आदरास पात्र असते.लोकांची तुमच्यावर भक्ती असते. शब्दात अन कृतित ठामपणा असतो. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुमची स्वतःची स्वतंत्र विचार पद्धती असते. तुम्ही दयाळू आणि स्वातंत्र्य प्रिय असतात. बोलण्यात हुशार असतात. घरातील दुर्बल व्यक्तीची तुंचायवर जबाबदारी असते. इतरांवरहुकूमतगाजवणे तुम्हाला आवडते. तुम्ही कठोर स्वभावाचे असतात आणि इतरांवर टीका करतात. तुम्ही उंच आणि देखणे आहात. इतरांनातुम्ही दुखावत नाहीत.स्त्रिया सुखी असतात मात्र संतती होताना त्रास होऊ शकतो.कोडे सोडवण्याचा, लॉटरी आणि जुगार याचा छंद असू शकतो. इतरांची तुमच्यावर भक्ती असते.
तुम्ही मितभाषी असतात. तुम्ही अत्यंत हुशार, बुद्धिमान, संशोधक, शास्त्राची आवड असणारे, व्यापारी वृत्तीचे आणि व्यवहार चतुर असतात. तुमच्या व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशी पण आवडत नाही. कोणत्याही कामाच्या तुम्ही उत्तम पूर्व नियोजन करतात. अवघड परिस्थितीतून बाहेर कसे पडावे याचे तुम्हाला आपोआप मार्गदर्शन मिळते. तुमच्यात कधी कधी नैराश्य आणि अस्वस्थपणा येतो मात्र तो लवकरच निघून जातो. मनाने तुम्ही विशाल आहात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि सहली यांची आवड आहे. तुम्ही उत्तमपणे प्रशिक्षण वर्ग चालवू शकतात. निसर्गाशी एकरूप होऊन त्याचा आनंद लुटणे तुम्हाला आवडते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमची वृत्ती साशंक असते. तुमची चटकन खात्री होत नाही आणि विश्वास बसत नाही. तुम्ही नेहमीच सावध असतात. तुम्ही महत्त्वाकांक्षा आणि उत्साह आहात. हुशार आणि बुद्धिमान लोकांकडे तुमचा ओढा असतो. धर्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांची तुम्हाला आवड असते.
व्यवसाय:- बँकिंग वैद्यकीय क्षेत्र संशोधन गणित कंपनी सेक्रेटरी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र केमिस्ट
शुभ दिवस:- बुधवार शुक्रवार शनिवार
शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा
शुभ रत्न:- पाचवा आणि हिरा
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
