आजचे राशिभविष्य गुरूवार, २१ ऑगस्ट २०२५

२१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

श्रावण कृष्ण त्रयोदशी/ चतुर्दशी. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

आज वर्ज्य दिवस आहे” *शिवरात्री, गुरुपुष्यमृत*

चंद्र नक्षत्र – पुष्य.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन/ (संध्याकाळी ६.३५ नंतर) कर्क. (व्यतिपात योग शांती, विष्टी करण शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज चतुर्थ स्थानातून चंद्राचा अनेक अनुकूल योग होत आहेत. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. धर्म कार्य कराल. जुन्या वस्तू सापडतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. अचानक लाभ होऊ शकतात. लेखक/प्रकाशक याना उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. वक्तृत्व चमकेल. शब्द भांडार आहेच, त्याचा फायदा होईल. मिश्किल स्वभावाचा लाभ मिळेल. लोकप्रियता वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सकाळच्या सत्रात वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीत वेळ वाया जाईल. खर्चात वाढ होऊ शकते. दुपार नंतर अनुकूलता वाढेल. अवघड प्रश्न सुटतील.

सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. सकाळच्या सत्रात अर्थप्राप्ती होईल. कामे पूर्ण करा. गरजूना मदत करा. आज कठोर बोलणे होईल. कामाच्या ठिकाणी अचानक लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या कडून अपेक्षा वाढतील. संध्याकाळ आनंदाची. मोठी गुंतवणुक करण्यास योग्य दिवस आहे. व्यावसायिक प्रतिस्पर्धी शरण येतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आजचा दिवस कामात व्यतीत होईल. स्थावर संपत्ती बाबत काही मार्ग निघू शकतात. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. विजयश्री खेचून आणाल. गूढ बाबीचे आकर्षण वाढेल.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सकाळी संमिश्र ग्रहमान आहे. शौर्य दाखवण्याची वेळ नाही. अनैतिक कामे टाळा. तुमचा जोडीदार मात्र आज अनाकलनीय वागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. मनाविरुद्ध भ्रमंती घडेल. संगणक क्षेत्रात प्रगती होईल. दुपारनंतर चंद्र अष्टम स्थानी जाणार आहे. महवाची कामे सकाळी पूर्ण करवून घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. पत्नीची साथ लाभेल. कोर्ट कामात यश मिळेल. लक्ष्मी कृपा राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवा आहे. दिवसभर तुम्ही व्यस्त असणार आहेत. प्रवास घडेल. आर्थिक आवक वाढेल. अष्टम भावातील चंद्र आयुष्यात महत्वपूर्ण बदल घडवून आणेल. मोठे परिवर्तन होऊ शकते.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. वाहन सुख लाभेल. व्यापारात लाभ होतील. छोटे प्रवास घडतील. शत्रू पराभूत होतील. कोर्ट कामात यश मिळेल. लहान व्यक्तीकडून/मुलांकडून लाभ होतील.

२१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर गुरु रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही एक प्रेमळ आणि दयाळू पिता असतात. आयुष्यत उशिरा प्रसिद्धी आणि सुख मिळते. तुम्ही अत्यंत गुणवान आहात मात्र स्वभाव संशयी आहे. मान – पान बद्दल तुम्ही जास्त संवेदनशील असतात. तुमच्यात अधिकार वृत्ती, महत्वाकांक्षा, उत्स्फूर्तपणा आणि पोकळ दिखाऊ वृत्ती असते. एकांतवास आवडतो. जीवनाचा आनंद उपभोगता. भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण असते. तुम्ही मनाने हळुवार आणि संवेदनशील असतात. तुम्ही ध्येयवादी आहात. एक उत्तम व्यवस्थापक आणि प्रशासक असतात.कला, साहित्य, मनोरंजन आणि विज्ञान याची तुम्हाला आवड असते. तुम्ही साहित्य निर्मिती आणि कथा लेखक बनू शकतात. तुम्ही शुद्ध प्रेम असणारे, नैतिक, कायदा प्रेमी, दयावान, न्यायी आणि परोपकारी आहात. इतरांना मदत करणे तुम्हाला आवडते. तुम्ही इतरांशी उत्तम संवाद साधू शकतात. दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत घेतात. तुम्ही धार्मिक आहात मात्र भावनाशील नाहीत. तुम्ही संयमी आहात. सहसा भावनेच्या आहारी जात नाहीत. तुमच्यामध्ये अफाट इच्छाशक्ती आणि उत्साह आहे. कामामध्ये सातत्य असते. तुम्ही प्रत्येक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडवतात. स्वतःचे काम स्वत

व्यवसाय:- न्यायमूर्ती, सेक्रेटरी, राजदूत, मुत्सद्दी, उच्चपदस्थ अधिकारी, संरक्षण खाते, प्राध्यापक, धार्मिक प्रवचनकार, डॉक्टर, शिक्षक, मोल्डिंग, तेल गिरण्या, शेती, जंगल, कारखाने, लाकूड, खनिज द्रव्य, खाद्यपदार्थ.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, लसण्या, अमेथीस्ट.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशिभविष्य गुरूवार, २१ ऑगस्ट २०२… […]

Don`t copy text!