

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
माघ शुक्ल चतुर्थी श्री गणेश जयंती | विनायकी चतुर्थी
नक्षत्र – शततारका / (दुपारी २.२७ नंतर पूर्वाभाद्रपदा)
योग – वरीया योग करण – विष्टी चंद्रस्थिती – (चंद्र–गुरू त्रिकोण) ऋतू – शिशिर ऋतू | उत्तरायण
दुपारी ३.०० नंतर – पर्यटन / प्रवासासाठी चांगला दिवस
आजचा दिवस श्री गणेश जयंती असल्याने मंगल, अडथळे दूर करणारा व शुभारंभासाठी योग्य आहे.चंद्र–गुरू त्रिकोण योग ज्ञान, योग्य निर्णय, विस्तार आणि सौभाग्य वाढवतो.विष्टी करणामुळे सकाळी काही कामांत विलंब होऊ शकतो; परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होते.(Marathi Rashi Bhavishya)
मेष (Aries)-कामात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांकडून सहकार्य. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दुपारनंतर प्रवास लाभदायक. आरोग्य ठीक.
वृषभ (Taurus)-कुटुंबातील आनंददायी घडामोडी. संपत्ती किंवा वाहनविषयक विचार पुढे जातील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मन प्रसन्न राहील.
मिथुन (Gemini)-बौद्धिक कामे, लेखन, संवाद यात यश. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस. भावंडांशी समन्वय वाढेल. दुपारनंतर शुभ वार्ता.
कर्क (Cancer)-आर्थिक स्थैर्य मिळेल. थकीत रक्कम वसूल होण्याची शक्यता. कुटुंबात समाधान. आहार आणि पचनाकडे लक्ष द्या.
सिंह (Leo)-आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान मिळेल. नवीन कामाची सुरुवात करता येईल. प्रेमसंबंधात विश्वास दृढ होईल.
कन्या (Virgo)-कामाचा ताण जाणवेल. विष्टी करणामुळे सकाळी अडथळे संभवतात; संयम ठेवा. दुपारनंतर कामे मार्गी लागतील.
तुला (Libra)-मित्र, सामाजिक क्षेत्रातून लाभ. आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी. कला-सौंदर्य क्षेत्रात प्रगती. प्रवास सुखद.
वृश्चिक (Scorpio)-कामात जबाबदारी वाढेल. अधिकार प्राप्तीचे योग. गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने करा. आरोग्य सुधारेल.
धनु (Sagittarius)-चंद्र–गुरू त्रिकोण तुमच्यासाठी विशेष शुभ. शिक्षण, अध्यात्म, परदेशी विषय अनुकूल. मन प्रसन्न, आत्मविश्वास वाढलेला.
मकर (Capricorn)-आर्थिक नियोजन आवश्यक. कर्ज-विषयक बाबींमध्ये दिलासा. जोडीदाराकडून पाठिंबा. दुपारनंतर शुभ बातमी.
कुंभ (Aquarius)-भागीदारी, करार, विवाह विषय अनुकूल. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. प्रवासाचे योग. संवादात स्पष्टता ठेवा.
मीन (Pisces)-मेहनत अधिक पण परिणाम समाधानकारक. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबीयांशी संवाद वाढवा. दुपारनंतर दिवस हलका वाटेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य गुरुवार, २२ जानेवारी… […]