आजचे राशिभविष्य – गुरूवार, २४ जुलै २०२५

२४ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
📅 तिथी – आषाढ अमावस्या
🌦️ ऋतू – वर्षा
📜 संवत्सर – विश्वावसु
📆 शके – १९४७
🗓️ संवत – २०८१
☀️ दक्षिणायन
🕜 राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
🌑 विशेष – आज वर्ज्य दिवस आहे – दर्श अमावस्या, दीप पूजन, गुरूपुष्यामृत
🌙 चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (४.४४ पर्यंत) नंतर पुष्य
👶 आज जन्मलेली राशी – मिथुन (१०.५९ पर्यंत), नंतर कर्क
📿 योग – हर्षण, वज्र | करण – चतुष्पाद, नाग (शांती)

🔯 राशिभविष्य 🔯(Marathi Rashi Bhavishya)

♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज चंद्राचे शुभ योग लाभदायक ठरतील. सकाळी ११.०० नंतर विशेष अनुकूल वेळ. व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभ, आणि धार्मिक कार्य संभवतात.

♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
धार्मिक यात्रा अनुकूल. दानधर्म केल्याने समाधान मिळेल. एखादा मोठा खर्च येऊ शकतो. व्यावसायिक दृष्टिकोनाने चांगला दिवस.

♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
नोकरीत अनुभवाचा फायदा. आर्थिक वाद संभवतात, पण कामात आनंद. सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य.

♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
आज अमावस्या तुमच्या राशीत. लाभ होईल पण कोर्ट-कचेरी, वादविवाद टाळावेत. खर्च वाढण्याची शक्यता.

♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
सकाळी लाभदायक, पण नंतरची वेळ खर्चिक. गरजूला मदत करा. पुढील दोन दिवस त्रासदायक ठरू शकतात.

♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
संध्याकाळ सुखद. अपेक्षा वाढतील. मोठ्या गुंतवणुकीपासून आज टाळा. चंद्र-रवी अनुकूल. सन्मान मिळेल.

♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
स्थावर मालमत्तेसंदर्भात चांगली घडामोड. वरिष्ठ खुश होतील. नोकरीत कौतुक. व्यवसायात स्थिरता येईल.

♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
ग्रहमान संमिश्र. आज धाडस टाळा. प्रवासात बदल. शेअर मार्केटमध्ये चांगले अंदाज. दीर्घकालीन गुंतवणूक योग्य.

♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
अमावस्या अष्टमस्थानी. आर्थिक चिंता वाढतील. निर्णय पुढे ढकला. शेजाऱ्यांशी समन्वय ठेवा.

♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
मन प्रसन्न राहील. व्यवसाय फळेल. शत्रू सक्रिय राहतील. कोर्ट प्रकरणात अपेक्षित निर्णय नाही. कायद्याचे पालन करा.

♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
संमिश्र दिवस. व्यवसायात फायदा. कीर्ती वाढेल. लहानसहान कामे करावी लागतील. आर्थिक स्थैर्य चांगले.

♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
ग्रहमान अनुकूल. वाहन लाभ, व्यापारात प्रगती. प्रवास संभवतो. शेअरमधून फायदा.

२४ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात तुम्ही अंतर ठेवतात. गरीब, अपंग व्यक्तीसाठी तुम्ही संस्था काढतात किंव आर्थिक मदत करतात. तुमचा स्वभाव अस्थिर असू शकतो आई वागण्यात विरोधाभास असू शकतो. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि लग्नानंतर भाग्योदय होतो. तुम्हाला शिकणे आणि शिकवणे आवडते.

तुम्ही दिसायला शांत असले तरी कधीही तडजोड करत नाहीत. तुम्ही अति महत्वाच्या पदांवर यशस्वी होतात. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असतो. तुम्ही अनाठायी काळजी करतात.घर, संसार मित्र यांचा बद्दल आपुलकीची नाती जोडली जातात. भाषणे, लेखन, रेडिओ कार्यक्रम यात तुम्ही रस घेतात.

तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुमचा सहवास नेहमीच उत्साह वर्धक असतो. तुम्हाला गायन, नृत्य किंवा इतर कलांची तसेच गूढ विद्यांची आवड असते. आईबद्दल विशेष प्रेम असते तर आई कडील नातेवाईकांशी तुमचे विशेष पटते. तुम्हाला सामाजिक रूढी आणि परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमची ही तारीख सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आकर्षण, आपुलकी दर्शवते. स्वभाव खर्चिक असतो. तुम्ही भावनाप्रधान आहात. तुम्हाला वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने पैसे मिळतो. तुम्ही खर्चिक छंद जोपासतात. श्रीमंती आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्ही व्यवस्थित घालतात. अचानक धनलाभ होणायची शक्यता असते. ज्याचे आकर्षण वाटते त्यावर पैसे खर्च करण्यास तुम्ही मागे पुढे बघत नाहीत.

व्यवसाय:- जमीन खरेदी विक्री, एजंट, शेअर ब्रोकर, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजर, मिठाई, संगीत.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 कुंडली विश्लेषण व सल्ल्यासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
🪔 नाव, नाडी, जन्मतारीख, वेळ, स्थळानुसार सविस्तर मार्गदर्शन.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!