आजचे राशिभविष्य गुरूवार, २५ सप्टेंबर २०२५
२५ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल तृतीया/चतुर्थी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज वर्ज्य दिवस आहे” *विनायक चतुर्थी*
चंद्र नक्षत्र – स्वाती/ (रात्री ७.०९ नंतर) विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ.
२५ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर बुध आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव हरहुन्नरी आहे. तुम्हाला प्रवासाची आवड आहे. दूर देशाशी तुमचा संबंध येतो. तुम्ही प्रामाणिक आणि विश्वासू आहात. तुमचा स्वभाव चंचल आहे. मात्र स्मरणशक्ती उत्तम आहे. तुम्हाला इतरांचे वर्चस्व सहन होत नाही. लेखन नी वक्तृत्व तुम्हाला आवडते आणि त्यात तुम्हाला यश देखील मिळते. तुम्ही फार काळ एखाद्या विषयात रमत नाहीत. तुमचा स्वभाव विनोदी असून तुम्ही मनाने उदार आहात. प्रकृती बाबत तुमची सतत कुरबुर चालू असते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जाणवत असते. वरून तुम्ही शांत दिसत असला तरी मनात सदैव खळबळ चालू असते. त्यामुळे अनेकदा थोडासा रागीटपणा वाढतो. इतरांची लुडबुड आणि ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही नम्र आणि विनायशील असून स्वतःच्या अधिकाराचा बडेजाव करत नाहीत. तुमच्या वागण्यामध्ये सावधगिरी असते. तुम्हाला विश्रांतीची गरज असते. कामाबाबत अभ्यासु वृत्ती आणि पद्धतशीर पणा असतो. रहस्य कथा आणि विनोदी चित्रपट तुम्हाला आवडतात. दुसऱ्याच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून बारीक-सारीक गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात राहतात. एक
व्यवसाय:- दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय क्षेत्र, आयात निर्यात, परदेशाशी संबंधित व्यवसाय.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सप्तम चंद्र आहे. मनाची बेचैनी दूर होईल. उत्साह वाढेल. शुभ समाचाहर समजतील. शत्रूचा त्रास कमी होईल. पत्नीची उत्तम साथ लाभेल. काही मोठ्या घडामोडी होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यावसायिक वाढ होणार आहे. काही बाबतीत मात्र संभ्रम निर्माण होईल. आरोग्याच्या समस्या असू शकतील. त्यावर वेळीच इलाज करा. वाहन चालवताना काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पंचम स्थानी चंद्र आहे. तुमचे अधिकार वाढतील. काही अवघड समस्या आज अलगद सुटतील. तुमच्या मूळच्या निरागस स्वभावाला इतरांची दाद मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्या चतुर्थ स्थानी चंद्र आहे. आज आवडत्या घरगुती कामासाठी वेळ द्याल. मन धार्मिक विचारांनी भरून जाईल. देश हिताची कामे कराल. नावलौकिक वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तिसरा चंद्र आहे. जुने वादविवाद मिटतील. पराक्रम गाजवाल. मनाची एकाग्रता वाढेल. सौजन्यशील बनाल. इतरांना तुम्ही आज मदत कराल. तुमची आवडती स्तुती होईल. काटकसर कराल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सध्या तुमच्या राशीत बुधदित्य योग आहे. तुमच्या चौकस बुद्धिमान स्वभावाची आज स्तुरी होईल. नवीन कल्पनांना वाव मिळेल. संशोधन कार्यात यश मिळेल. नाविन्यपूर्ण वस्तूंची खरेदी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) समाजकार्य करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात. मात्र तुमचा स्वभाव कधीकधी अति व्यवहारी होतो. त्यावर आज नियंत्रण ठेवा. तुमच्या बुद्धिमत्तेचा समाजाला फायदा करून द्या. नवीन शोध लावाल. भौतिक सुखाच्या आहारी जाऊ नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अजूनही फारशी अनुकूलता नाही. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांवर विचार करावा लागेल. तुम्हाला चांगल्या आणि वाईट यात फरक करावा लागेल. आज काही निर्णय चुकण्याची शक्यता आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चंद्र अनुकूल आहे. समोर गुरू आहे. काही चांगल्या संधी मिळतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शेअर्स मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमचे कामातील सातत्य कौतुकास्पद आहे. आज तुम्हाला चिकाटी दाखवावी लागेल. यंत्र हाताळताना काळजी घ्या. एकाग्रता वाढवा. दुर्लक्ष करणे महागात पडू शकेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अडचणी दूर होऊ लागतील. नैराश्याचे ढग वितळू लागतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. वाहन चालवण्याची हौस वाढीस लागेल. एखादा मोठा प्रवास होण्याचे योग आहेत. मात्र मनातील संभ्रम तसाच आहे. त्यासाठी राहुचा जप करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अद्याप अनुकूलता नाही. काही काळ संयम ठेवावा लागेल. कामात बदल संभवतो. तुमचे कनिष्ठ तुमच्यापेक्षा पुढे जातील. याची खंत वाटेल. कोर्ट कामात अपयश येईल. वाहन चालवताना अधिक काळजी घ्या.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य गुरूवार, २५ सप्टेंबर … […]