आजचे राशिभविष्य मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५
१२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
श्रावण कृष्ण तृतीया/चतुर्थी. वर्षा ऋतू. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे” *अंगारक चतुर्थी* चंद्रोदय (मुंबई) ९.१७, पुणे – ९.१३, नाशिक – ९.१३
नक्षत्र – पू. भा./उ. भा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. (विष्टी करण शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुध आणि हर्षल शी शुभ योग तर मंगळाशी अशुभ योग आहे. शनिशी युती आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. वाहन जपून चालवा. पाणी, विहीर संबंधित कामे मार्गी लागतील. बँक, पतसंस्था यातून लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दिवसाची सुरुवात अत्यंत अनुकूल आहे. उच्च शिक्षण, दूरचे प्रवास यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. लेखकांना उत्तम यश मिळेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. मात्र सरकारी नियम काटेकोर पाळावेत अन्यथा दंड होऊ शकतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नैतिक मार्ग सोडू नका. नोकरीत स्थिरस्थावर होणास साहाय्यभूत ग्रहमान आहे. नमते घेतल्यास आज नोकरीत दीर्घकाळ फायदा करून देणाऱ्या घटना घडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. सर्व स्वप्ने साकार होतील. वेळ ‘न’ दवडता कामाला लागा. दूरचे प्रवास घडतील. वक्तृत्व चमकेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. अंतर काही काळजीचे कारण नाही. प्रगती साध्य करणारे ग्रहमान आहे. अंतर्मुख व्हाल. जीवनाचा सखोल अर्थ समजेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. आर्थिक भरभराट होईल. मंत्रविद्या सिद्ध होण्याचा दिवस आहे. घरातून जोडीदाराची भक्कम साथ लाभेल. अनुकूल बुध तुमची भरभराट करून देईन.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. अधिकार वाढतील. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेमुळे प्रगती साध्य होईल. भागीदाराशी मतभेद होऊ शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक दृष्टीने यश देणारा कालावधी आहे. शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा. सरकारी कामात प्रगती होईल. वादविवादात यश मिळेल. लहान भाऊ मदत करेन.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्य लाभेल. वास्तू संबंधित अडचणी दूर होतील. पशु लाभ होईल. वाहन सौख्य लाभेल. सरकारी कामे रेंगाळतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमानाचा लाभ उठवा. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. कोर्ट कामात अनुकूलता वाढेल. शत्रू पराभूत होतील. परराष्ट्र, दूरचे गाव या ठिकाणी व्यवहार वाढेल. त्यातून लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. योग्य करणासाठी खर्च कराल. धन धान्य वाढेल. शब्दावर नियंत्रण ठेवावे लागेल. विनाकारण वादविवाद होतील. मात्र त्यात तुमचा विजय होईल. घराच्या जवळपास मतभेदाचे प्रसंग येतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत चंद्र आहे. अनुकूल ग्रहमान आहे. शक्य ती सर्व कामे पूर्ण होतील. बौद्धिक लेखनात लाभ होतील. कामानिमित्त प्रवास घडेल. कोर्ट कामात मात्र अपयश येणार आहे. शत्रू त्रास जाणवेल.
१२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये (Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर गुरु, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात अधिकार वृत्ती आणि प्रामाणिक पणा आहे. तुम्ही ध्येयवादी आहात. तुम्ही कार्यालयीन कामात अग्रेसर असतात. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. तुम्हाला कला, ज्ञान, मनोरंजन यांची आवड असते. प्रतिभाशक्ती उच्च असते. तुम्ही एक चांगले लेखक होऊ शकतात. महत्वाकांक्षा आहे मात्र विनाकारण अहंकार टाळला पाहिजे. तुम्हाला आयुष्यात एकाकीपणा जाणवतो. भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल अधिक आकर्षण असते. ज्यांच्यावर अन्याय झालाआहे आशा लोकांबद्दल तुम्हाला सहानुभती असते. तुमचा स्वभाव हळुवार आणि संवेदनशील आहे. तुम्हाला इतरांशी सहज संवाद साधता येतो. दया, न्याय, सात्विकता, नैतिकता, परोपकार ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही सहसा संयमी असतात मात्र ज्या वेळी शनीचा प्रभाव वाढतो त्यावेळी तुम्ही भावना प्रधान होतात. तुम्हाला स्वतःचे काम स्वतः करायला आवडते. इतरांची ढवळाढवळ चालत नाही. तुम्ही महत्वाकांक्षी असून एखादी योजना पार पाडायची असेल तेव्हा तुम्हाला एकटे राहणे आवडते. तुमचा ओढा बंधुमान , संशोधक, हुशार व्यक्तीकडे असतो. तुम्हा जीवनात चांगले यश मिळते. तुमचा सतत उत्कर्ष होतो. तुम्ही एक उत्तम न्यायाधीश,
व्यवसाय:- न्यायमूर्ती, सेक्रेटरी, राजदूत, मुत्सद्दी, उच्चपदस्थ अधिकारी, संरक्षण खाते, प्राध्यापक, धार्मिक प्रवचनकार, डॉक्टर, शिक्षक, लेखक, मोल्डिंग, तेल गिरण्या, शेती, जंगल, कारखाने, लाकूड, खनिज द्रव्य, खाद्यपदार्थ.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
